Balapur Fort Information In Marathi बाळापुर हा किल्ला अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. या किल्ल्याविषयी इतिहासामध्ये असे सांगितले जाते की, हा किल्ला मुघल साम्राज्यातील औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहाजादा अझमशहा यांनी 1712 मध्ये बांधायला सुरुवात केली होती. त्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम 1757 मध्ये नवाब इस्माईल खान यांनी पूर्ण केले होते. बाळापुर हा किल्ला दोन नद्यांचा संगम जिथे पावतो, त्या ठिकाणी बांधण्यात आले आहे. नद्यांची नावे म्हणजे मान नदी आणि महषी नदी. बाळापुर हा किल्ला गजानन महाराजांच्या शेगाव या ठिकाणावरून 19 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला 29 ऑगस्ट 1912 मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता मिळालेली आहे.
बाळापुर किल्याची संपूर्ण माहिती Balapur Fort Information In Marathi
किल्ल्याचे नाव | बाळापुर किल्ला |
स्थापना | 1712 |
संस्थापक | शहाजादा अहमदशहा मुगल साम्राज्य |
ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्हा |
बांधकामची शैली | इंडो इस्लामिक |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाण | तहसील कार्यालय, दर्गा, प्रवेशद्वार, मारुतीची मूर्ती, विहीर, बुरुंज, छत्री, वाडा, मशिद, बालादेवी मंदिर. |
बाळापुर किल्ला कुठे आहे :
बाळापुर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील बाळापुर याच तालुक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. हा किल्ला मान व महिषी नदीच्या जिथे संगम आहे तेथे बांधलेला असून या संगमापासून हा किल्ला थोड्या उंचीवर बांधलेला आहे. या किल्ल्याची बांधणीची शैली ही इंडो इस्लामिक स्वरूपाची आहे. हा किल्ला मुघलांच्या काळामध्ये बांधण्यात आलेला आहे. हा किल्ला 250 वर्ष जुना आहे तसेच हा किल्ला अकोल्याच्या आक्रमण कर्त्यांपासून संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेला होता.
या किल्ल्याचे बांधकाम हे 1712 मध्ये सुरू झाली होते आणि 1757 मध्ये ते बांधकाम पूर्ण करण्यात आले म्हणजेच हा किल्ला पूर्ण बांधकाम करण्यासाठी 45 वर्ष लागले. बाळापूरचा किल्ला 33 फूट एवढ्या उंचीवर बांधलेला आहे. या किल्ल्यामध्ये दुहेरी बांधणीची भक्कम अशी तटबंदी बांधलेली आहे.
बंदीचे भिंतीची रुंदी तीन मीटर आहे आणि तटावर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत तसेच तटबंदीच्या भिंतीला पाच गुण आहेत. या किल्ल्याचे प्रवेशद्वार पश्चिम उत्तर दिशेला आहे. हा किल्ला शेगाव येथून केवळ 19 किलोमीटर अंतरावर आहे.
बाळापूर किल्ल्याचा इतिहास :
बाळापुर या किल्ल्याचा इतिहास पाहिला तर 250 वर्ष जुना आहे. हा किल्ला मुघल साम्राज्यातील औरंगजेबाचा दुसरा मुलगा शाहजादा अहमदशहा याने 1712 मध्ये बाळापूर येथे बांधायला सुरुवात केली होती. त्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम 1757 मध्ये नवाब इस्माईल खान यांनी पूर्ण केले. या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 45 वर्ष लागले त्याचबरोबर पुरंदरच्या तहामध्ये ठरल्याप्रमाणे संभाजी महाराजांना बाळापूर परगना देण्यात आला होता.
पुरंदरची लढाई ज्यावेळी झाली तेव्हा खूप सैनिक विनाकारण मारले जात होते. त्यांनी पुरंदरचा तह करायचा ठरवला आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तहाची बोलणी केली. या बोलाणीच्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना 7000 ची मना सबादारी देण्यात आली होती आणि या मनसबाबदारीमध्ये असणाऱ्या सैन्य खर्चासाठी औरंगजेबाने 15 लाख होण्याची जहांगीर आणि खानदेश वराड हे भाग दिले होते. या वरण भागामध्ये बाळापुर हे सुद्धा होते.
बाळापुर या किल्ला पाहण्यासारखे ठिकाणे :
बाळापुर या किल्ल्यावर पाहण्यासारखे अनेक ठिकाणी आहेत ते खालील प्रमाणे पाहूया.
प्रवेशद्वार : बाळापूर किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पश्चिम उत्तर दिशेला आहे आणि या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे लाकडी असून त्याला छोटासा दिंडी दरवाजा सुद्धा आहे. आपल्याला घोडा आणि हत्ती या प्राण्यांच्या चित्राचे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. दरवाजाच्या आत मध्ये आल्यानंतर दरवाजाला लागून असणाऱ्या तटबंदीला पायऱ्या असून त्यावरती जळून गेल्यानंतर दरवाजावर केलेले नक्षीकाम अगदी जवळून पाहता येईल. या किल्ल्याचे प्रवेशद्वार एवढे उंच आहे की, त्यामधून हत्ती सुद्धा सहज जाऊ शकतो.
वाडा : विहिरीजवळ असणाऱ्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर पडलेल्या अवस्थेत आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
विहीर : दरवाजा मधून आत गेल्यानंतर तुम्हाला एक कोरडी विहीर पाहायला मिळते. त्या विहिरीवर एक सुंदर पोत तयार केलेली आहे. जी विटांनी बांधलेली असून ही पोत पंधरा फूट उंच आहे.
ध्वजस्तंभ : ध्वजस्तंभ किल्ल्यावर पाहू शकतो कारण या किल्ल्यावर ज्याचे वर्चस्व आहे, त्याचा ध्वज फडकवण्याची स्तंभ ध्वजाची ही परंपरा आहे. आपल्याला या किल्ल्यावर महषी नदीकडे असणाऱ्या बुरुजावर ध्वज स्तंभ सुद्धा पाहायला मिळतो.
मारुती मूर्ती : बाळापुर या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शेंदूर लावलेली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते.
तहसील : कार्यालय या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समोर एक भव्य इमारत पाहायला मिळते आणि ती इमारत म्हणजे तहसील कार्यालय आहे. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज या इमारतीचा वापर करीत कैदखाना म्हणून करत होते.
दर्गा : या किल्ल्यावर कार्यालयाच्या पाठीमागच्या उजव्या बाजूला एक दर्गा सुद्धा आहे.
छत्री : शहराच्या दक्षिण दिशेला महषी या नदीच्या काठावर आपल्याला मुघलांचे सरदार मिर्झाराजे जयसिंग यांचे बांधलेले छत्रीचे शिल्प सुद्धा पाहायला मिळते. हे छत्र मिर्झाराजे जयसिंग यांनी बनलेले आहे.
बाळापुर या किल्ल्यावर कसे जाल :
बाळापुर हा किल्ला पाहण्यासाठी जायचे असेल तर तुम्हाला हा किल्ला शेगाव रेल्वे स्टेशन पासून केवळ एकोणावीस किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही शहरातील कोणत्याही भागापासून शेगाव रेल्वे स्टेशन पर्यंत येऊ शकता किंवा मग बस स्टॉप सुद्धा आहेत. तुम्हाला जर बसने यायचे असेल तर शेगाव बस तुम्हाला कोणत्याही मुख्य शहरापासून मिळू शकते. तेथून तुम्ही टॅक्सी किंवा स्थानिक बस पकडून सुद्धा बाळापुर येथे जाऊ शकता.
FAQ
बाळापुर या किल्ल्याचे बांधकाम कोणी केले?
बाळापुर या किल्ल्याचे बांधकाम हे औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहादा यांनी केले.
बाळापूरचा किल्ला बांधण्यासाठी किती वर्ष लागले?
बाळापुरचा किल्ला बांधण्यासाठी 45 वर्ष लागले.
बाळापूरच्या किल्ल्याचे उरलेले बांधकाम कोणी केले?
नवाब इस्माईल खान.
बाळापुर या किल्ल्याचा इतिहास किती जुना आहे?
बाळापुर या किल्ल्याचा इतिहास 250 वर्ष जुना आहे.
बाळापुर या किल्ल्यावर आपल्याला काय पाहायला मिळते?
बाळापुर या किल्ल्यावर तुम्ही प्रवेशद्वार विहीर, वाडा, मारुतीची मूर्ती, ध्वजस्तंभ, तहसील, दर्गा, छत्री इत्यादी ठिकाण पाहू शकता.