बालुशाही रेसिपी मराठी Balushahi Recipe in Marathi

बालुशाही रेसिपी मराठी Balushahi Recipe in Marathi  आपल्याकडे कोणताही धार्मिक सण किंवा कार्यक्रम त्यामध्ये गोड पदार्थांची रेलचेल असतेच व सर्व भारतामध्ये मिठाई आवडीने खाल्ली जाते.  गोड पदार्थांमध्ये लाडू, जिलेबी, काजू कतली, बेसन वडी इत्यादी पदार्थांसोबतच बालुशाही ही देखील केली जाते.  बालुशाही ही उत्तर भारतातील पारंपारिक मिठाईचा प्रकार असून आता तो संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे.  बऱ्याच ठिकाणी याला खुरमि या नावाने देखील ओळखला जातो.  बालुशाही मैद्यापासून व साखरेपासून बनवली जाते.  तिच्या खुसखुशीतपणामुळे सर्वांनाच ती आवडते.  बालुशाही ही रेसिपी सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये कशी बनवायची ते आपण पाहूया.  जेणेकरून तुम्हाला नेहमी बाजारातून बालुशाही विकत आणण्याची गरज भासणार नाही आणि बाजारातील भेसळयुक्त अशी बालुशाही तुम्हाला खरेदी करण्याची देखील आवश्यकता पडणार नाही.

 Balushahi Recipe

बालुशाही रेसिपी मराठी Balushahi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

बालुशाही ही उत्तर भारतीय गोड पदार्थ प्रकार असून ती मैद्यापासून बनविली जाते, तसेच तुपामधून तळून ती साखरेच्या पाकात टाकली जाते.  त्यामुळे बालुशाही प्रेमींना ती खूपच आवडते.  बालुशाही गव्हाच्या पिठापासून देखील बनवली जाते.  तसे पाहिले तर बालुशाही दोन प्रकारे बनवली जाते एक म्हणजे गोड बालुशाही आणि दुसरी म्हणजे खारी बालुशाही तर आज आपण येथे तुपातील तळलेली गोड बालूशाही रेसिपी पाहणार आहोत.

ही रेसिपी किती जणांंकरता बोलणार आहे?

ही रेसिपी आपण 4 लोकांकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ  :

बालुशाही रेसिपी तयार करताना पूर्वतयारीसाठी आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

बालुशाही शिजण्यासाठी तसेच तोडून पाकामध्ये टाकण्याकरिता त्याला आपल्याला 30 मिनिटे  लागतात.

टोटल टाईम  :

बालुशाही रेसिपी बनवण्याकरता आपल्याला एकूण 50 मिनिटे एवढा वेळ लागतो.

बालुशाही रेसिपी करता लागणारे साहित्य  :

1)  दोन कप मैदा

2)  एक कप तूप

3)  थंड पाणी अर्धा कप

4)  बेकिंग सोडा  पाव चमचा

5)  मीठ चिमूटभर

पाक बनवण्याकरिता लागणारे साहित्य :

1) साखर  2 कप

2)  पाणी  1 कप

3)  पाव चमचा इलायची पावडर

4) 10 ते 12 केशरच्या काड्या

बालुशाहीची पाककृती  :

  • दाबेली रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम बालुशाही बनवण्याकरता आपल्याला मैदा चाळणीने चाळून घ्यायचा आहे.
  • नंतर त्यामध्ये तूप बेकिंग सोडा आणि मीठ घालून हे मिक्स करायचे आहे आणि नंतर पाणी घालून एकत्र मिक्स करायचं आहे.  हे मिश्रण मळायचं नाही.
  • जेव्हा सर्व पीठ ओलं होईल तेव्हा एकत्र करून ओल्या कपड्याने दहा ते पंधरा मिनिटं असंच बांधून ठेवा.
  • नंतर ती कणिक सपाट पसरवून घ्या तसेच त्याचे दोन भाग करून एकावर एक ठेवा.  पुन्हा सपाट करा आणि परत दोन भाग करून एकावर एक भाग ठेवा.
  • आपल्याला असेच साधारण कृती सहा ते सात वेळा करायची आहे.  यामुळे कणकेच्या लेयर बनतील आणि जेव्हा तुम्ही बालुशाही तळाल तेव्हा बेकिंग पावडरच्या मदतीने ह्या सर्वच लेयर फुलण्यास मदत होऊन डिझाईन तयार होईल.
  • आता पण तिला हलक्या हाताने मळा आणि दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचे आहे.
  • पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी आणि दोन कप साखर घालून गरम करण्यासाठी ठेवा मधोमध पाक हलवत रहा जेव्हा साखर विरघळेल तेव्हा वेलची पावडर आणि केशर घाला.  गॅस स्लो करून पाक आटेपर्यंत शिजवायचा आहे.
  • पाक घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि दहा मिनिटानंतर कणकेचे एका आकारात गोळे बनवून घ्या.  त्याला मेंदू वड्यासारखा आकार द्या मेंदू वड्या सारखे मधोमध होल करणे आवश्यक आहे.  कारण यामुळे आजपर्यंत बालुशाही तळली जाईल.
  • आता एका कढईमध्ये तूप घालून गरम करण्यासाठी मंद आचेवर गॅसवर ठेवा.  तूप गरम झाल्यावर गॅस स्लो करून त्यामध्ये आपल्याला बालुशाही घालून ती वर येईपर्यंत तळायचे आहे.
  • जेव्हा बालुशाहीवर येईल तेव्हा पलटून घ्या.  दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.  तुपातून काढून नंतर बालुशाही साखरेच्या पाकात टाका.   अशाप्रकारे सर्व बालुशाही पाकामध्ये बुडवून ठेवा.
  • बालुशाही पाकामध्ये किमान 15 ते 20 मिनिटं ठेवायची आहेत.  जेणेकरून बालुशाहीमध्ये पूर्ण पाक आतमध्ये जाईल व ती खायला गोड लागेल.
  • बालुशाहीला पाकात राहून 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर बालुशाही पाकातून काढून मोठ्या ताटात वेगवेगळ्या पाक सुकेल.
  • अशाप्रकारे तुमची चविष्ट आणि खुसखुशीत अशी बालुशाही रेसिपी तयार आहे तुम्हाला हवं वाटलं तर बालुशाही फ्रीजमध्ये ठेवून आरामात 15 दिवसांपर्यंत देखील तुम्ही खाऊ शकता.

पोषक घटक :

मैद्यामध्ये प्रोटीन, शर्करा युक्त पदार्थ, स्निग्धांश, कोलेस्ट्रॉल, पिष्टमय पदार्थ, जीवनसत्वे, खनिज द्रव्य, उत्प्रेरके, तंतुमय पदार्थ पाणी हे रासायनिक घटक आढळतात.

फायदे  :

बालुशाही ही मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून बनवली जाते.  तसेच ती तुपातून तळून साखरेच्या पाकात टाकली जाते त्यामुळे एक गोड पदार्थ तयार होतो.  ती खाल्ल्यामुळे शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.

बालुशाही खाल्ल्यामुळे आपल्याला ग्लुकोज प्रोटीन मिळते, त्यामुळे आपली भूक भागते व आपल्याला जेवण केल्याचा भास होतो.

आपली दिवसभरातील ऊर्जा देखील कायम राहते कामांमध्ये आपल्याला

तोटे  :

मैदा खाने शरीरासाठी आणि कारक आहे कारण मैद्यामध्ये ग्लूटन असते आणि ती फूड एलर्जी निर्माण करते.  फूड ऍलर्जी मधून आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते.

ग्लुटन जेवणाला लवचिक करून त्याला मोस्ट स्ट्रक्चर देते.  त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात तेच जर आपण गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं.  मात्र मैद्यामध्ये दोन्हीही कमी प्रमाणात असते.  त्यामुळे आपले हाड कमजोर बनतात.

तसेच बालुशाही हा पदार्थ गोड असल्यामुळे रक्तातील साखर देखील वाढण्याची शक्यता जास्त असते.  रक्तात जेव्हा ग्लुकोज जमा होते, तेव्हा शरीरामध्ये केमिकल रिएक्शन होते आणि त्यापासून हृदयाचा त्रास देखील आपल्याला होऊ शकतो.

तर मित्रांनो, बालुशाही रेसिपी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment