दाबेली रेसिपी मराठी Dabeli recipe in Marathi

दाबेली रेसिपी मराठी Dabeli recipe in Marathi बरेचदा आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते.  किंवा मग मुलांना एकच एक रेसिपी बनवून दिल्यानंतर खाण्याचा कंटाळा आला असेल,  तर काही नवीन बनवून देऊन   त्यामध्ये तिखट आंबट-गोड अशी चव असेल तर प्रश्नच उरत नाही.  तर आम्ही खास तुमच्याकरता दाबेली ही रेसिपी घेऊन आलो आहोत.  जी खाण्यामध्ये चविष्ट व आंबट गोड तसेच चटपटीत डिश आहे.  ज्या लोकांना रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही.  त्यांच्याकरिता खास सोप्या सरळ भाषेमध्ये दाबेली ही रेसिपी आपल्या घरच्या घरी अगदी कमी वेळात बनवू शकता.  तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

Dabeli recipe

दाबेली रेसिपी मराठी Dabeli recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

दाबेली हे एक गुजराती स्ट्रीट फूड असून आता ते सर्व देशभर प्रसिद्ध झाले आहे.  दाबेली हा रेसिपीचा प्रकार खायला चविष्ट व छानदार लागतो.  ज्यांनी एकदा दाबेली रेसिपी खाल्ली त्यांची पुन्हा खाण्याची इच्छा होईलच.  त्याचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते.  गरमागरम बटरवर भाजलेली दाबेली आणि त्यावर मुरमुरेत शेव तसेच तिखट शेंगदाणे हे जरी डोळ्यांसमोर आले तर लगेच खावीशी वाटते.  परंतु बरेच जणांना दाबेली ही रेसिपी माहीत सुद्धा नाही.  आणि काहींना माहित आहे, परंतु कशी बनवायची हे माहित नाही, म्हणून तुमच्याकरिता खास हे माहिती घेऊन आलो आहोत.  ही रेसिपी करून बघा व आम्हालाही कमेंट करू नक्की कळवा तुमची रेसिपी कशी झाली.

ही रेसिपी किती व्यक्तींकरिता आहे?

ही रेसिपी आपण सहा व्यक्तींकरता करणार आहोत

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या   पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम   :

दाबेली रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

हे रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

सामग्री  :

1) चार मोठे उकडलेले बटाटे

2) दाबेलीचे पाव

3) एक चमचा लाल तिखट

4) दोन चमचे दाबेली मसाला

5) एक कांदा बारीक चिरून

6) कोथिंबीर बारीक चिरून

7)  तीन चमचे डाळिंबाचे दाणे

8) चवीनुसार मीठ

9) एक चमचा दाबेली फ्राय करण्यासाठी तूप

10) एक चमचा बारीक शेव

11)  एक चमचा गोड चटणी

12)  दोन चमचे हिरवी तिखट चटणी

13)  दोन चमचे तेल

पाककृती  :

  • धपाटे रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम आपल्याला बटाटे उकळून घ्यायचे आहे बटाटे चांगले छान उकळून घ्या.
  • नंतर एका कढाई मध्ये तेल गरम करण्यासाठी टाकावं त्यामध्ये दाबेली मसाला, मीठ, लाल मिरची पावडर घालून मसाला मंद आचेवर परतून घ्या.
  • आता त्यामध्ये उकडलेले बटाटे व्यवस्थित एकजीव करून घाला.
  • तयार झालेले बटाट्याचे मिश्रण एका ताटात काढून घ्या.  नंतर त्यामध्ये इतर साहित्य कांदा, डाळिंबाचे दाणे, मसाला, शेंगदाणे व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • आता दाबेलीच्या पावाच्या एका बाजूने थोडा कापून त्यामध्ये एका बाजूने गोड चटणी व दुसऱ्या बाजूला तिखट हिरवी चटणी लावून त्या चटणीवर बटाट्याचे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्या.
  • जर तुम्हाला चीझ आवडत असेल, तर त्यामध्ये चीझ किसून घालू शकता.
  • अशाप्रकारे सगळेच दाबेली पाव भरून घ्यावे.  आता तवा गरम करून त्यावर तूप किंवा बटर टाकून दाबेली पाव दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे.
  • दाबेली भाजून झाले की, त्याच्या प्रत्येक कडेने बारीक शेव दाबून घ्यावी व गरमागरम दाबेली सर्व्ह करायला तयार आहे.

पोषक घटक  :

दाबेलीमध्ये शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, शेव, आलू मसाला वापरण्यात येतो त्यामुळे प्रोटीन कॅल्शियम विटामिन अ, तांबे लोहा शरीरासाठी आवश्यक असणारे घटक असतात.

दाबेली खाण्याचे फायदे  :

दाबेली मध्ये विविध घटकांचा वापर केला जातो त्यामुळे त्यात पोषक तत्वे निर्माण होतात.

दाबेली खाल्ल्यामुळे आपल्याला शरीरात प्रथिने, ऊर्जा मिळते.  त्यामुळे आपली काम करण्याची शक्ती वाढते.

दाबेली खाल्ल्यामुळे आपल्याला जेवण झाल्यासारखे वाटते, भूक लागत नाही.

तोटे  :

दाबेली ही पाव पासून तयार केली जाते, पाव खाल्ल्यामुळे रक्तातील शुगर वाढवण्याचा धोका वाढू शकतो.

वडापाव, दाबेली किंवा जंक फूड मध्ये लॅक्टोज अधिक असल्याने समस्या उद्भवू शकते.

म्हणून दाबेली ही रेसिपी सुद्धा आपण प्रमाणातच खायला पाहिजे.  ज्यांची पचनक्रिया चांगली नाही त्यांना पाव पचवायला कधी कधी तीन दिवसही लागू शकतात.

पावमध्ये अति प्रमाणात साखर फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते.  त्यामुळे वजन देखील वाढू शकते.

तर मित्रांनो, दाबेली या रेसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment