Basketball Game Information In Marathi प्रत्येकाचा कोणता ना कोणता खेळ हा फेवरेट खेळ असतो. त्यामध्ये हॉलीबॉल, बस्केटबॉल क्रिकेट, टेनिस, खो-खो, कबड्डी आपण बरेच खेळ पाहिले असेल आणि खेळ खेळताना मिळणारी मजा आणि आनंद हा तर आपल्याला माहीतच असेल. खेळ कोणताही असो त्यामध्ये खूप मजा येते आणि विद्यार्थी जीवनात तर खेळणे हा एक छंद असतो.
बास्केटबॉल खेळाची संपूर्ण माहिती Basketball Game Information In Marathi
बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ असून हा खेळ पाच खेळाडूंच्या दोन गटांमध्ये खेळला जातो. हा बॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न दोन गटात मार्फत केला जातो. ज्या गटातील जास्त गुण तो गट विजयी होतो. बास्केटबॉल हा जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे.
बास्केटबॉलचा इतिहास :
बास्केटबॉल, नेटबॉल, हॉलीबॉल आणि केवळ हेच चेंडूचे खेळ आहेत. ज्यांचा शोध नॉर्थ अमेरिकेत लागला असे म्हटले जाते. कॅनडातील शारीरिक शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकांनी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी बास्केटबॉल या खेळाचे प्रथम नियम आणि खेळ पद्धती लिहिली होती.
भारताने 1951 मध्ये दिल्ली येथे आशियाई सामन्यांमध्ये या खेळामध्ये सर्वप्रथम भाग घेतला होता. 1954 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा यशस्वी दौरा केला आणि 1954 पर्यंत राष्ट्रीय अजिंक्य पदाची सामने बाद पद्धतीने घेण्यात येत असे. परंतु त्या वर्षापासून हे सामने बाद आणि साखळी समस्या पद्धतीने घेतले जाऊ लागले. बास्केटबॉलचे स्त्रियांच्या राष्ट्रीय अजिंक्य पदाची सामने 1952 मध्ये प्रथमच बंगलोर येथे झाले.
तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अजिंक्य पदाचे सामने सुद्धा 1955 पासून सुरू करण्यात आले. देशोदेशी पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा या खेळामध्ये सहभाग घेतला आणि हा खेळ त्यांना खेळता येऊ लागला. इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशनच्या नियमानुसार स्त्रियांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने जरी पुरुषांच्या नियमानुसार होत असले, तरी त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे.
बास्केटबॉल या खेळाची मैदान :
बास्केटबॉल या खेळाचे मैदानाची स्वरूप हे सर्वसाधारणपणे 28.66 मीटर लांब आणि 15.24 मीटर रुंद प्रांगणाच्या दोन्ही टोकांना पांढऱ्या आणि दोरखंडाच्या लोंबक कळत सोडलेली असते. त्याच्या कड्याचा व्यास 0.46 मीटर असतो तसेच जमिनीपासून 3.05 मीटर उंचीवर असलेल्या एका पार्श्व फलकाला जोडलेली असते. चेंडू हा गोलाकार असून त्याला बाहेरून कातड्याचे आवरण आणि आत रबराची फुगवलेली पिशवी असते.
त्या बॉलचा परीघ हा कमीत कमी 75 सेंटीमीटर ते जास्तीत जास्त 78 सेंटीमीटर असतो, त्याचे वजन 600 ग्रॅम पेक्षा कमी नसते. एका संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या हद्दीतील टोपलीत चेंडू टाकून गोल करणे आणि गुण मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. ज्याच वेळी प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यासाठी करतो.
बास्केटबॉल या खेळाचे नियम :
बास्केटबॉल खेळामध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या नियमांमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहे. बास्केटबॉलचा सामना प्रत्येकी 20 मिनिटांचा असून मध्यंतरी दहा मिनिटाची विश्रांती असते. या खेळांच्या सुरुवातीला दोन्ही संघाचे मध्यवर्ती खेळाडू वर्तुळामध्ये वर्तुळात एकमेकांकडे व आपापल्या टोपलीकडे तोंड करून उभे राहतात.
पंच मध्यभागी येऊन त्यांच्यामध्ये साधारण दोन ते 2.5 मीटर उंचीवर चेंडू हवेत उडवतो. तो हवेत पूर्णपणे उंच गेल्यावरच खेळाडूला चेंडूला स्पर्श करण्याची किंवा हाताने मारण्याची परवानगी असते. सुरुवातीप्रमाणेच दहा मिनिटांच्या मध्यंतरानंतर तांत्रिक नियम भंग झाले तर त्यामध्ये मुक्त फेक केल्यानंतर ही क्रिया केली जाते. प्रत्येक संघामध्ये पाच खेळाडू असतात.
क्रमांक एक व दोन चे खेळाडू बचावाचे व रक्षणाचे कार्य करतात. त्यांना अनुक्रमे लेफ्ट गार्ड आणि राईट गार्ड असे म्हटले जाते. प्रतीक्षाला आपल्या टोपली चेंडू टाकू न देणे व गोल होऊ न देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असते. क्रमांक तीन चार पाच या खेळाडूंना अनुक्रमे फॉरवर्ड सेंटर राईट फॉरवर्ड अशी नावे असतात.
हे खेळाडू चढाई करतात, याव्यतिरिक्त प्रत्येक संघाला बदली खेळाडू खेळवता येतात. या खेळामध्ये पाच वेळा खेळाडूंची बदली करता येते. प्रेक्षकांनी बचाव करताना हाती आलेला चेंडू आघाडी पैकी जो खेळाडू मोकळा असेल त्याच्याकडे फेकायचा असतो.
चढाई करणाऱ्यांनी चेंडू आपल्या ताब्यात घेऊन तो आपापसात फेकायचा आणि प्रतिस्पर्ध्याच्या प्रांगणात जाऊन त्याच्या हद्दीतील टोपली तो वरून खाली टाकायचा असतो. प्रत्येक खेळाडूस बच्चावाचे व चढायचे कार्य करावे लागते. हा खेळाडू अत्यंत गतिमान असल्याने प्रत्येक खेळाडू दक्ष आणि चपळ असावा लागतो.
हा खेळ खेळत असताना चेंडू प्रांगणा बाहेर गेल्यास, ज्या संघाने तो बाहेर घावला असेल त्याच्या विरुद्ध संघाला तो जिथून बाहेर गेला असेल त्या ठिकाणाहून आत फेकता येतो. तसेच गोल झाला की, चेंडू पुन्हा मध्यभागी न आणता तिकडे प्रांगणातील खेळाडूंपैकी एकाने तो अंतिम पासून तो चेंडू आत फेकायचा असतो. संपूर्ण डाव हा 20 मिनिटांचा असतो आणि खेळाच्या शेवटी जो संघ जास्त गुण मिळेल तो विजयी ठरतो.
बास्केटबॉल या खेळाचे फायदे :
शारीरिक फायदे : बास्केटबॉल खेळणेसाठी फायदेशीर आहे. बास्केटबॉल खेळल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्यामध्ये हालचाल होत असल्याने हृदयाची गती वाढते तसेच हृदय निरोगी राहण्यासाठी फायदा होतो. यामुळे पुढील आयुष्यात स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो.
स्नायूंची सहनशक्ती मजबूत होते : आपल्या स्नायूंच्या सहनशक्तीची शरीरासाठी खूपच आवश्यकता असते. जी स्नायूंची दीर्घ कालावधीसाठी शक्ती वापरण्याची क्षमता असते. बास्केटबॉल या खेळामध्ये खालच्या आणि वरच्या शरीराच्या ताकद वाढवण्यासाठी नियमित हालचाल होते. त्यामुळे शरीराची व्यायाम होते आणि स्नायूंची सहनशक्ती वाढते.
हाडांची रचना मजबूत होते, बास्केटबॉल खेळल्यामुळे हाडांची ताकद वाढते तसेच नवीन हाडांचे उतक तयार होतात व हाडे मजबूत होतात.
मनावरील ताण कमी होतो : बास्केटबॉलच्या खेळामुळे शारीरिक क्रिया कलप निर्माण होतो. त्यामुळे एक आनंदाचा अनुभव देणारा हार्मोन आपल्या शरीरामध्ये तयार होतो. यामुळे वेदना कमी होऊन नैराश्य दूर होते तसेच आत्मविश्वास वाढते व कामाचे कार्यक्षमता सुद्धा सुधारते.
रोगप्रतिकार शक्ती वाढते : नियमित बास्केटबॉल खेळल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. जेव्हा तुम्ही हा खेळ खेळता तेव्हा तुमच्याकडे ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे तुम्हाला इतर गोष्टीचा ताण कमी होतो व आनंदमय वातावरण निर्माण होते.
शरीराची रचना सुधारते : बास्केटबॉल खेळल्यामुळे शरीराची हालचाल होते. त्यामुळे शरीर रचना सुधारली जाते तसेच शरीर मजबूत होते. शरीरातील चरबी कमी होते.
मानसिक विकास होतो : बास्केटबॉल खेळल्यामुळे तुम्हाला शारीरिक कौशल्य प्राप्त होते, मानसिक विकास होतो तसेच पायांच्या बोटांच्या व्यायाम होतो.
FAQ
बास्केटबॉल या खेळाच्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?
बास्केटबॉल या खेळाच्या मैदानाची लांबी 28.66 मीटर व रुंदी 15.24 मीटर असते.
डबल ड्रिब्लिंगग म्हणजे काय?
बास्केटबॉल मधील बेकायदेशीर कृती जेव्हा एखादा खेळाडू एकाच वेळी दोन हाताने चेंडू ड्रिबल करतो, त्याला ड्रिब्लिंग म्हणतात.
बास्केटबॉलचा शोध कोणी लावला?
जेम्स नायस्मिथ यांनी बास्केटबॉल चा शोध लावला.
बास्केटबॉल चा शोध कोणत्या काळात लागला?
बास्केटबॉलचा शोध 1819 मध्ये लागला.
बास्केटबॉल खेळल्यामुळे कोणते फायदे मिळतात?
बास्केटबॉल खेळल्यामुळे शारीरिक फायदे मिळतात, त्यामध्ये तणाव कमी होतो. हृदय विषयीच्या समस्या कमी होतात, चरबी कमी होते.