Dhanurasana Information In Marathi आजचे युग खूपच धावपळीचे युग आहे आणि आजच्या या धावपळीच्या युगामध्ये व्यायाम किंवा आसन हे एक खूप मोठे मानवी जीवनातून सुटलेले भाग आहेत; परंतु आपण आपल्या जीवनात व्यायाम योगासने यांचा उपयोग किंवा सराव नेहमी केला पाहिजे. कारण त्याचा आपल्या शरीराला फायदा होत असतो आणि त्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते .
धनुरासनची संपूर्ण माहिती Dhanurasana Information In Marathi
प्राचीन युग आणि आधुनिक विज्ञान या दोघांमधून योगाचे पुष्टी केली आहे. पाठीचा कणा हा शरीरात सर्वात महत्त्वाचा आहे तशाच प्रकारे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणे आहेत. नंतर करण्यासाठी तसेच धनुरासन मनक्यावरच सर्वाधिक लक्ष केंद्रित करून ते मजबूत बनवते. हे केवळ पाठीचा कणा मजबूत नाही तर लवचिक सुद्धा बनवते.
रोज तरी आपण योगासने करणे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक प्रकारचा काहीतरी एक वेगळा फायदा जर आपल्याला घडून आणायचा असेल तर आपण योगासने नेहमीच केली पाहिजे. आज आपण अशाच योगासनापैकी एक असं म्हणजे धनुरासन या विषयी माहिती पाहणार आहोत.
धनुरासन म्हणजे काय?
धनुरासन हे एक योगासनामधील आसन असून हे केल्याने आपले शरीर मजबूत राहते. हे आसन आपण जेव्हा करतो, तेव्हा आपल्या शरीराचा आकार धनुष्यासारखा दिसतो म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव दिले.
धनुरासन शब्द हा संस्कृतमधून आला असून धनुरासन केल्यामुळे आपल्या शरीरामधील पाचन तंत्र व शरीरातील हाडांमधील तापमान नियंत्रणात राहते. त्याचबरोबर धनुरासन डोकेदुखी आणि मधुमेह कमी करण्यासाठी सुद्धा काम करते. हे आसन कसे करायचे ते आपण जाणून घेऊया.
धनुरासन करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवावे लागतात.
तुम्हाला धनुरासन करायचे असेल तर त्या आधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. धनुरासनाचा सराव करण्यापूर्वी तुमचे पोट नेहमी रिकामे असायला पाहिजे. हे असं सकाळी शौचालयाला जाऊन आल्यानंतरच करावे. हे आसन करण्यापूर्वी कमीत कमी चार ते सहा तासांपूर्वीच तुम्ही जेवण करून घेतलेले असले पाहिजे किंवा मग हे आसन झाल्यानंतर एका तासांनी तुम्ही जेवण करायला पाहिजे. यामध्ये पोटातील अन्न पचायला वेळ मिळतो. सरावासाठी खाली पोट असणे आवश्यक आहे.
हे आसन करण्याची सर्वात चांगली वेळ सकाळची आहे. परंतु काही कारणांमुळे तुम्हाला हे असं सकाळी करता आले नाही तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी सुद्धा करू शकता. धनुरासन हे नेहमी शांतपणे करण्याचा प्रयत्न करा. तसेच हे आसन करताना तुम्हाला शांत व मोकळी जागा हवी असते. जेणेकरून तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होणार नाही.
धनुरासन कसे करावे?
धनुरासन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शांत आणि योग्य जागा निवडायचे आहे. तेथे चढाई किंवा चादर पसरवून पोटावर झोपायचे आहे.
त्यानंतर पोटावर विश्रांती घेतल्यानंतर हे आसन करण्यासाठी आपण आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपले दोन्ही तळवे आणि घोट्याला धरून ठेवायचे आहे.
आता तुम्हाला एक श्वास घेऊन तुमची डोके आणि छातीवर करायचे आहे. त्यानंतर धनुरा सणाची मुद्रा ग्रहण करण्यासाठी तुमचे शरीर मागे आणि पाय पुढे असे करायचे आहे.
तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार जेवढे डोके वर नेता येईल तेवढे द्यावे जास्त जोर लावून वर नेऊ नका पाय बाहेरच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केल्यास हे असं लवकर जमते.
शेवटच्या स्थितीमध्ये दहा ते वीस सेकंद थांबून हे असं सोडून द्यावे. पाय मांड्या आणि छाती खाली आणाव्यात. थोडा वेळ विश्रांती घेऊन हे असं पुन्हा करायचे असेल तर तुम्ही या आसनाची पुन्हा पुनरुक्ती करू शकता.शेवटच्या स्थितीत पोहोचण्यासाठी हात वाकु नये आणि ते सरळ ठेवावेत. पहिल्याच दिवशी पूर्ण असं साध्य होईल असे नाही. हे आसन करण्यासाठी तुम्हाला काही दिवस लागतील तसेच तुम्ही दररोजच्या सरावामुळे हे आसन करू शकाल. तुमची जेवढी लवचिकता वाढेल तेवढे तुम्हाला हे आसन जमेल.
खांदे, कंबर व गुडघे यांच्या संध्याना व स्नायूंना सवय झाल्यावर ते मळकट होतात. त्यावेळी हे आसन पूर्णपणे तुम्हाला जमेल असं झाल्यावर मकरासनात किंवा नुसते पडून राहून विश्रांती घेणे फायद्याचे ठरते.
हे आसन नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच काळजीपूर्वक करणे गरजेचे असते किंवा मग एखाद्या प्रशिक्षित व्यक्तींकडून शिकून घेऊनच या आसनाचा सराव घरी करावा.
धनुरासनाचे अनेक फायदे होतात :
धनुरासन हे असे आसन आहे, ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. हे आसन केल्यामुळे आपल्या शरीराचा आकार हा धनुष्यासारखा दिसतो म्हणून त्याला धनुरासन असे म्हटले जाते.
तणाव कमी होतो : धनुरासन हे तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. दिवसभराच्या थकानामुळे किंवा इतर कारणांमुळे जर आपल्याला ताण तणाव आला असेल तर तुम्ही धनुरासन करा. त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा मिळेल.
लठ्ठपणा कमी होतो : तुम्ही नियमित धनुरासन करत असाल तर त्यामुळे तुमचे शरीर संतुलित राहते आणि लठ्ठपणा कमी होतो.
शरीर संतुलित ठेवते : धनुरासन हे शरीरावरील चरबी कमी करते तसेच पोटाचे स्नायू आणि शरीराच्या बळकटीसाठी धनुरासन प्रभावी आहे. या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे स्नायू व हाडे लवचिक बनतात. तसेच पाठ दुखी कंबर दुखी यासारख्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो. हे आसन केल्यामुळे शरीरातील परिसंचारण संस्था सुद्धा सुधारण्यास मदत होते. धनुरासनाच्या नियमित सर्वांमुळे मूत्र रोगावर आराम मिळतो.
अपचन व पोटाचे विकार दूर होतात : तुम्हाला नियमित अपचनाची किंवा पोटदुखीचे त्रास असतील तर हे आसन नियमित केल्यामुळे तुम्हाला या त्रासापासून मुक्ती मिळेल तसेच हे आसन नियमित केल्यामुळे तुमची भूक सुद्धा वाढते. धनुरासन केल्यामुळे संपूर्ण शरीराच्या सर्व नसांना व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर चपळ बनते तसेच शरीरावर जमा झालेली चरबी सुद्धा कमी होते.
महिलांसाठी फायदेशीर आहे : धनुरासन हे असं महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे. कारण महिलांमध्ये पाठ दुखीची समस्या नेहमीच उद्भवते. त्यामुळे ही हे आसन केल्यामुळे पाठदुखी पासून मुक्ती मिळते. धनुरासन नियमित केल्यामुळे महिलांच्या मासिक पाळीतील समस्या सुद्धा दूर होतात.
हे आसन कोणी करू नये?
धनुरासन ज्या लोकांनी करू नये ज्यांना पाठ दुखीची, पोटदुखी, अल्सर, मायग्रेन किंवा डोकेदुखीची समस्या आहे तसेच उच्च आणि निम्मत रक्तदाबाची समस्या असेल तर त्यांनी हे आसन करणे टाळले पाहिजे. त्या व्यतिरिक्त गर्भवती महिलांनी सुद्धा हे आसन करू नये. ज्यांना हृदयविकार असेल त्यांनी सुद्धा हे आसन करू नये. धनुरासन क्षमतेनुसार आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे फायद्याचे ठरेल.
FAQ
धनुरासन केल्यामुळे शरीराला कोणते फायदे मिळतात?
धनुरासन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात, त्यामध्ये शरीर लवचिक होते. मानसिक लाभ होतो, मधुमेहासारख्या रोग यासाठी फायदेशीर आहे. पोटावरील चरबी कमी होते, महिलांसाठी फायदेशीर आहे.
धनुरासन कोणी करू नये?
धनुरासन हृदयरोग, गर्भवती महिला,पाठ दुखीचा अति त्रास असल्यास अशा व्यक्तींनी धनुरासन करू नये.
धनुरासन केव्हा करावे?
धनुरासन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तसेच दिवसभरात कधीही करू शकता.
धनुरासन हे नाव कसे पडले?
हे आसन करताना मनुष्याच्या शरीराचा आकार हा धनुष्याप्रमाणे होतो, त्यामुळे त्याला धनुरासन असे नाव पडले.