भालाफेक खेळाची संपूर्ण माहिती Bhalafek Game Information In Marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
Bhalafek Game Information In Marathi

Bhalafek Game Information In Marathi भाला फेक म्हटलं की आपल्याला नीरज चोप्रा हा खेळाडू डोळ्यासमोर येतो.  शिकारीसाठी वापरण्यात येणारा हा प्रकार खेळ प्रकार म्हणून विकसित झाला खरा, मात्र त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन जाण्याचे कार्य नीरज चोप्रा या खेळाडूंनी केले. पूर्वी सैनिकांकडून आणि शिकारी लोकांकडून वापरला जाणारा भाला आज भालाफेक स्पर्धेमध्ये वापरून विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

Bhala fek Game Information In Marathi

भालाफेक खेळाची संपूर्ण माहिती Bhalafek Game Information In Marathi

पूर्वीच्या काळी एका लांब काठीला टोकदार भाला बसवून, शिकारींना मारण्याकरिता त्याचा वापर केला जात असे. तसेच युद्धामध्ये सैनिक देखील शस्त्र म्हणून वापरत असत, मात्र शस्त्र किंवा शिकारीचे साहित्य म्हणून जसजसा हा भाला नामशेष व्हायला लागला, तसतसं तो खेळामध्ये रूपांतरित झाला.

आजकाल हा भालाफेक खूपच स्पर्धात्मक झालेला असून, या खेळामुळे अनेकांनी आपले भविष्य उज्वल केलेले आहे, आणि नाव देखील मोठे केलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण भालाफेक हा खेळ थेट युद्धभूमीवरून खेळाचे मैदानात कसा आला, आणि त्याने ऑलिम्पिक मध्ये कसा प्रवेश केला याबाबतची रंजक माहिती बघण्याबरोबरच इतरही माहिती बघणार आहोत…

नावभालाफेक
प्रकारखेळ
उपप्रकारमैदानी खेळ
उगमयुद्धकलेत वापरल्या गेलेल्या भाल्यापासून
साहित्यभाला
गट प्रकार एकल खेळाडू खेळ
खेळाडूंची संख्याएक खेळाडू

भालाफेक म्हणजे नेमके काय:

भाला फेक म्हणजे भाला जास्तीत जास्त दूर फेकण्याची स्पर्धा होय. मात्र यामध्ये केवळ सर्वात लांब फेकणे हेच अपेक्षित नसून योग्य दिशेने फेकणे देखील महत्त्वाचे समजले जाते. सर्वात प्रथम ग्रीस या देशातील रहिवाशांनी शिकार करण्याकरिता भाल्याचा वापर केल्याचे उल्लेख आढळतात. मात्र शिकारीसाठी आधुनिक तंत्र अवलंबल्या गेल्यामुळे हे भाले फेक कुठेतरी मागे पडले होते.

त्यामुळे त्याला हळूहळू खेळाचा दर्जा प्राप्त झाला, आणि हा खेळ इतका लोकप्रिय झाला की, १९०८ च्या ऑलिंपिक स्पर्धांपासून पुरुषांसाठी; तर १९३८ च्या ऑलिंपिक स्पर्धांपासून महिलांसाठी हा खेळ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये देखील सुरू करण्यात आला. आज ऑलम्पिक स्पर्धांमधील भालाफेक हा एक महत्त्वाचा खेळ झाला असून, अनेक लोक हा खेळ हिरीहिरीने खेळत असतात.

मित्रांनो, पूर्वीच्या काळी यासाठी काही नियम नव्हते. मात्र आज अतिशय नियमबद्ध रीतीने हा भालाफेक खेळ आयोजित केला जातो. त्यामुळे या खेळाची प्रॅक्टिस करणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरते. आणि या प्रॅक्टिसच्या जोरावरच भारताच्या नीरज चोप्रा यांनी भालाफेक स्पर्धेमध्ये भारताची मान गर्वाने उंचावली आहे.

भालाफेक खेळामधील विविध नियम:

भालाफेक हा शिकारीचा प्रकार ज्यावेळी खेळामध्ये रूपांतरीत झाला, त्यानुसार त्याला हळूहळू नियम देखील येऊन चिकटले. ज्यामध्ये मूलभूत नियम, खेळाडूंसाठीचे नियम आणि भाला कसा असावा यासाठीचे नियम देखील समाविष्ट आहेत.

मूलभूत नियम म्हणजे भालाफेक स्पर्धा खेळताना दोन्ही बाजूने किमान ०४ फूट रुंदीची आणि ३३ मीटर लांब धावपट्टी असावी. त्यानंतर या पट्टीच्या समोरच्या भागाला वर्तुळाकार भागाने जोडलेले असावे, ज्याला फाऊल लाईन म्हणून ओळखले जाते.

जर खेळाडूंनी या रेषेच्या पलीकडे जमिनीला स्पर्श केला, तर त्याला बाद केले जाते. मात्र एक खेळाडू किमान सहा वेळेस भालाफेक करू शकतो. या धावपट्टीला दोन्ही बाजूने आखण्यात आलेल्या रेषा या २९ अंशांच्या असतात.

आजपर्यंत भालाफेक स्पर्धेमध्ये सर्वात लांब भाला फेकण्याचा विक्रम हा ९८.२० मीटर इतका असून, आजपर्यंत कोणत्याही खेळाडूंनी हा विक्रम मोडलेला नाही.

खेळाडूंच्या साठी असलेल्या नियमांमध्ये अनेक नियमांचा समावेश होतो, जसे की भाला फेकताना रेषेच्या पलीकडे पाऊल पडता कामा नये. भाला हा नेहमी एकाच हातात धरला पाहिजे, भाला फेक करताना हातामध्ये हातमोजे घालण्यास परवानगी नसते, तसेच हाताला घाम येत असेल तर केवळ खडू वापरता येतो,इतर काहीही नाही.

भालाफेक करताना संपूर्ण शरीर थाळी फेक किंवा गोळा फेक स्पर्धेसारखे फिरवावे लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यावेळी भाला शेवटच्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेस तो टोकावर उभा राहिला पाहिजे, अन्यथा बाद ठरविले जाते.

त्याचबरोबर भाला कसा असावा यासाठीच्या नियमांमध्ये त्याच्या लांबीचा आणि वजनाचा उल्लेख आढळून येतो. पुरुषांकरिता १२० पासून १०६ इंचापर्यंत लांबीचा व ८०० ग्रॅम वजनाचा भाला; तर महिलांकरिता ९० इंच लांबीचा आणि ५०० ग्रॅम वजनाचा भाला वापरला जातो. या भाल्याच्या पुढील बाजूला धातूचे टोक लावले जाते, आणि मध्यभागी हातामध्ये ग्रीप धरणे सोपे जावे म्हणून थोडासा खडबडीत भाग बनवला जातो.

भालाफेक स्पर्धेमधील फाऊल:

खेळाडूला बाद करण्यासाठी फाऊल चा नियम वापरला जातो. जर भालाफेक खेळणाऱ्या खेळाडूच्या शरीराचा कुठलाही भाग रेषेला स्पर्शून गेला, तर ते चूक समजून बाद समजले जाते. मग ते भाला फेकण्यापूर्वी असो किंवा भाला फेकल्यानंतर असो…  त्याच प्रकारे भाला फेकल्यानंतर तो शेवटच्या ठिकाणावर टोकाने उभा राहिला पाहिजे, अन्यथा फाऊल समजले जाते.

निष्कर्ष:

खेळ हा मानवाला आनंद देण्याचे कार्य करण्याबरोबरच शारीरिक बळकटी मिळवण्याचे देखील साधन समजला जातो. आजच्या भागांमध्ये आपण भाला फेक या खेळाविषयी माहिती बघितली. त्यामध्ये तुम्हाला भाला फेक म्हणजे काय, याविषयी वाचायला मिळाले.

सोबतच या भालाफेक खेळाचे नियम, तसेच मूलभूत व खेळाडूंसाठीचे वेगवेगळे नियम, आणि भाला कसा असावा याचे नियम तसेच फाऊल म्हणजे काय, याविषयी माहिती बघितली. सोबतच काही प्रश्न उत्तरे देखील बघितली ,आणि नीरज चोप्रा विषयी देखील माहिती बघितलेली आहे.

FAQ

भाला फेक या खेळामध्ये वापरण्यात येणाऱ्या भाल्याची लांबी साधारणपणे किती असते?

भालाफेक या खेळामध्ये वापरण्यात येणाऱ्या भल्याची लांबी पुरुषांकरिता सुमारे १०२ ते १०६ इंच पर्यंत आणि महिलांकरिता ९० इंचापर्यंत असते.

भालाफेक या खेळामध्ये वापरण्यात येणाऱ्या भाल्याचे वजन साधारणपणे किती असते?

भाला फेक या खेळामध्ये वापरण्यात येणाऱ्या भाल्याचे वजन साधारणपणे महिलांकरिता ५०० ग्रॅम तर पुरुषांकरिता सुमारे ८०० ग्राम इतके असते.

आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात लांब भाला फेकणारा खेळाडू म्हणून कोणाला ओळखले जाते?

मित्रांनो, भालाफेक या खेळाच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी देखील याचा विश्वविक्रम १९९६ यावर्षी जर्मनीच्या स्पर्धेमध्ये नोंदवला गेला होता. जो सुमारे ९८.४८ मीटर इतका लांब फेकला गेला होता. आणि हा भाला फेकणाऱ्या खेळाडूचे नाव जॉन झेलेझनी असे होते.

नीरज चोपडा या भारतीय खेळाडूंने भालाफेक स्पर्धेमध्ये कोणता विक्रम केलेला आहे?

मित्रांनो, भाल्याचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर केला गेला असला, तरी देखील सर्वात पहिले भालाफेक स्पर्धेतील पदक हे नीरज चोप्रा यांनी ऑगस्ट २०२१ यावर्षी मिळवले होते. जे त्याला टोकियो ऑलिंपिकच्या अंतिम फेरीमध्ये मिळाले होते, यावेळी त्यांनी ८७. मीटर इतका लांब भाला फेकला होता. त्यांनी सुवर्णपदक व रौप्यपदक असे दोन्हीही पदके मिळवली होती. त्यानंतर त्याने २०२२ या वर्षी ८९.३० मीटर इतका लांब भाला फेकून स्वतःचाच २०२१ सालचा जुना विक्रम मोडीत काढला.

नीरज चोप्रा यांनी आजपर्यंत फेकलेल्या भालाफेक मध्ये सर्वात उत्कृष्ट भालाफेक कोणता समजला जातो?

नीरज चोप्रा यांनी झुरीच डायमंड लीग या स्पर्धेचा फायनल फेरीमध्ये २०२२ या वर्षी ८८.४४ मीटर भाला फेकून अतिशय नयनरम्य रित्या ही ट्रॉफी मिळवली होती. हा क्षण त्याच्यासह संपूर्ण भारतीयांसाठी गौरवाचा क्षण होता.

आजच्या भागामध्ये आपण भाला फेक या खेळाविषयीची माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला अवश्य आवडली असेल, कारण विषय हा खेळाचा आहे. तसेच या माहितीविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, आणि सोबतच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना आणि खेळाची आवड असणाऱ्या व्यक्तींना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment