संगणक अभियांत्रिकीची संपूर्ण माहिती Computer Engineering Information In Marathi

Computer Engineering Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन आर्टिकल मध्ये आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची संपूर्ण माहिती. तुम्हाला तर माहीतच आहे आजच्या काळात आधुनिक ते मुळे संगणक शास्त्राला आलेले असामान्य महत्त्व  तर माहिती जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल पूर्ण वाचा आज आम्ही तुम्हाला कॉम्पुटर इंजिनीरिंग बद्दल पूर्ण माहिती दिली आहे सिलॅबस कसा आहे , महाराष्ट्रतील व भारतातील सर्व कॉलेजेस व अभ्यासक्रम कसा असेल व विषय कोणते आहेत भविष्यातील संधी व त्याचे नफे तोटे याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे तर मित्रांनो आर्टिकल पूर्ण वाचा व कॉम्पुटर इंजिनीरिंग बद्दल सखोल माहिती जाणून घ्या. चला तर मग सुरू करूया कॉम्पुटर इंजिनीरिंग बद्दल माहिती.

Computer Engineering Information In Marathi

संगणक अभियांत्रिकीची संपूर्ण माहिती Computer Engineering Information In Marathi

कॉम्पुटर इंजिनीरिंग

कम्प्युटर इंजिनिअरिंगला मराठी मध्ये संगणक अभियांत्रिकी असे म्हणतात संगणक अभियांत्रिकी अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे त्यामुळे संगणक अभियांत्रिकेला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. संगणक अभियंता म्हणजे राऊटर ,मदरबोर्ड मेमरी ऑपरेटिंग सिस्टम ,प्रोसेसर आणि इतर घटकांचा संगणकाच्या हार्डवेअर विकास  तपासणारी व्यक्ती संगणक तयार करताना संगणक अभियंता त्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर योग्यरीत्या कार्यरत असल्याची पडताळणी करून घेतो.

संगणक अभियंता हा चार वर्षाचा डिग्री कोर्स आहे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना खाजगी आयटी कंपनी व सरकारी कंपन्यांमध्ये करिअर घडवण्याच्या संधी आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटर भाषा शिकवल्या जातात. चार वर्षाच्या डिग्री कोर्स मध्ये आठ सेमिस्टर असतात दर सहा महिन्याला सेमिस्टर बदलते अशी एकूण आठ सेमिस्टर यामध्ये शिकवले जातात.

कम्प्युटर इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम

कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये एकूण आठ सेमिस्टर आहेत हा अभ्यासक्रम सेमिस्टर वाईज चालतो. हा ग्रॅज्युएट कोर्स आहे. बारावी सायन्स ट्रीम वाले मुलं या कोर्ससाठी ऍडमिशन घेतात. महाराष्ट्रातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र सिइटी म्हणून एक चाचणी घेतली जाते व त्याद्वारे मेरिट लिस्ट मधून मुलांना निवडले जाते. बारावी गणित हा विषय असलेले मुलं या इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी पात्र असतात. अकरावी बारावी पीसीएम ग्रुप असलेले  मुलं पात्र असतात.

कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी कोण कोण पात्र असतात

कम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्ससाठी बारावी विज्ञान शाखेतून फिजिक्स केमिस्ट्री आणि गणित हा विषय असलेले मुलं या कोर्ससाठी अप्लाय करण्यासाठी पात्र असतात. यासाठी महाराष्ट्र सरकार एम एच टी सी इ टी नावाची परीक्षा घेत असते या चाचणी परीक्षेतून जे विद्यार्थी पास होतात व मेरिट लिस्ट मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी सरकारी व खाजगी अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते.

एम एच टी सी इ टी बारावी अकरावी बारावीच्या  अभ्यासक्रमावर होत असते यासाठी विषय भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित असे असते. भौतिकशास्त्र 50 गुणांसाठी आणि रसायनशास्त्र 50 गुणांसाठी व गणित शंभर गुणांसाठी असा हा पेपर दरवर्षी होत असतो.

संगणक अभियांत्रिकीसाठी भविष्यातील असणाऱ्या संधी

संगणक अभियंता शोधणाऱ्या कंपन्यांशी तुमच्या कॉलेजचे कनेक्शन असेल तर तुम्हाला भविष्यात कॉलेजमधून प्लेसमेंट मिळू शकते व भविष्यात करिअर घडवण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. संगणक अभियंता साधारणपणे वर्षाला पाच ते सात लाख कमवतो सुरुवातीच्या पातळीवर संगणक अभियंता दोन ते तीन लाख रुपये कमवतो संगणक अभियंत्याचे सामान्य वर्ष उत्पन्न अनुभवासह 14 लाख रुपये मेसेज जास्त असू शकते. कम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात मागील दोन-तीन दशकात अमोलाग्र क्रांती झालेली असून आजच्या तंत्र आधारित आणि स्पर्धात्मक युगात हे सर्वाधिक आकर्षक क्षेत्र ठरले आहे.

शासकीय आणि खाजगी सार्वजनिक आस्थापना वेगाने संगणीकृत होत आहे. त्यामुळे भविष्यात हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने आघाडीवर राहणार आहे. मोबाईल आणि मोबाईल ॲप द्वारे उपलब्ध सुविधा ऑनलाईन मार्केटिंग ई-कॉमर्स नेट बँकिंग डिजिटल इंडिया नेटवर्क आणि सायबर सेक्युरिटी मॅनेजमेंट अशा विविध ठिकाणी वाढत्या नोकरीच्या संधीमुळे कॉम्प्युटर अभियंता भविष्यात आपले करिअर घडवण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील.

कम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य या पुढील काळात उज्वल असणार आहे आपण स्वतः आपले सॉफ्टवेअर विकसित करून स्वतःचा व्यवसाय पण करू शकता तसेच स्टार्टअप कंपन्यांसाठी सरकारकडून अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकते .किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेल्या अभियंत्यांना सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, जपान ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम ,पोलंड ,मलेशिया ,साऊथ कोरिया या देशात नेहमी संधी उपलब्ध असतात.

या इंजिनिअर्सना भारतातील सरकारी क्षेत्र जसे की राष्ट्रीय बँका सायबर सेल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया या व इतर अनेक सरकारी क्षेत्रात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची मागणी वाढत आहे यामुळे भविष्यात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.

संगणक अभियंत्यांच्या जबाबदाऱ्या

1. विविध ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आणि संगणक प्रोग्राम साठी कोड तयार करणे.

2. कंपनीचा डेटाबेस सुरक्षित स्थिर आणि कार्यक्षम असल्याची खात्री करणे.

3.क्लाइंटला तांत्रिक सहाय्य देणे

4. संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांसाठी सॉफ्टवेअर आणि ॲप्स तयार करणे.

5. संगणक प्रणालीचे आर्किटेक्चर आणि वापर करता इंटरनेट डिझाईन करणे.

संगणक अभियंतासाठी आवश्यक कौशल्य

माहिती तंत्रज्ञान तज्ञ कोडिंग पद्धत वापरून सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम तयार करतात संगणक अभियंता त्याच्या कामात यशस्वी होण्यासाठी कोडींग कौशल्य आवश्यक आहे.

संगणक अभियंते त्याच्या कामात कोणत्या समस्यांना सामोरे जातात ते प्रोग्राम ठिक करण्याचे किंवा कोणत्याही त्रुटी त्वरित ओळखणे आणि त्याचे निराकरण करण्याचे प्रभारी आहेत यांना यावर उपाय सुचवतात . सुरक्षा ते वारंवार संस्था आणि लोकांसाठी प्रोग्राम आणि सॉफ्टवेअर लिहितात जे त्यांच्या डेटाच्या गोपनीयतेला महत्त्व देतात संगणक अभियंत्यांनी सायबर सुरक्षितेबद्दल जागरूक असले पाहिजे त्यामुळे सायबर सुरक्षा बाबतचे ज्ञान संगणक अभियंत्यांसाठी आवश्यक आहे

संगणक अभियंत्यांचे प्रकार

संगणक अभियंता मध्ये दोन प्रकार येतात जसे की सॉफ्टवेअर अभियंता आणि हार्डवेअर अभियंता सॉफ्टवेअर अभियंता हा एप्लीकेशन सॉफ्टवेअर आणि भाषा वापरतो सॉफ्टवेअर अभियंत्यांना संगणक कोडींग आणि संगणक भाषांची सर्वसमावेशक माहिती असते.

तर हार्डवेअर अभियंता इंजिनिअरिंगच्या कामात मदरबोर्ड सीपीयू कीबोर्ड आणि माऊस संशोधन डिवाइस विकास चाचणी आणि सर्व विविध प्रकारच्या संगणक घटकांसाठी काम करतो.

संगणक अभियांत्रिकी म्हणजे कोणत्या प्रकारचे करिअर

संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळून तुम्ही संगणक विज्ञान आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची तुमची समज एकत्र करू शकता संगणक अभियंता म्हणून संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रणाली तयार करण्यात तुमचा सहभाग असेल.

FAQ

संगणक अभियांत्रिकी पदवी चांगली आहे का ?

हो नक्कीच भविष्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे संगणक अभियांत्रिकीला असामान्य महत्त्व प्राप्त झालेले आहे.

संगणक अभियंता काय शिकतो?

संगणक अभियंता कार्यप्रणाली संगणक आर्किटेक्चर संगणक नेटवर्क रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक साहित्य जाईन अशा विविध विषयांचा अभ्यास करतो.

भविष्यात संगणक विज्ञान कसे असेल?

विभिन्न भिन्न मधील संगणक विज्ञानाचे भविष्य भिन्नतेकडे येत असताना रोबोटिक्स गेम डेव्हलपमेंट आणि वर्च्युअल रियालिटी संगणक विज्ञानातील लोकप्रियता आहे.

तर मित्रांनो अशी आपणास पूर्ण संगणक विज्ञान या शाखेची माहिती बघितली तुम्हाला कसे वाटले माहिती आम्हाला कमेंट मध्ये सांगा व इतरांना शेअर करा व असेच नवनवीन आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या साईटला भेट द्या पण नवनवीन माहिती जाणून घ्या आम्ही असेच नवनवीन आर्टिकल तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

Leave a Comment