भटुरे मराठी Bhature Recipe In Marathi

भटुरे मराठी Bhature Recipe In Marathi भटुरे हा पदार्थ बटाटे आणि मैदा यापासून तयार केला जातो. भटुरे आपण छोले सोबत खाऊ शकतो. हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. जो सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. भटुरे हा तळलेल्या पुरीचा एक प्रकार आहे. विविध ठिकाणी छोले आणि भटुरे यांचा उपयोग नाष्टा म्हणून केला जातो. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये पहिले असेल किती स्वादिष्ट भटुरे खायाला मिळतात. भटुरे हा पंजाबचा लोकप्रीय पदार्थ आहे.

काही ग्रामीण आणि शहरी भागात भटुरे सहज मिळत नाही. काही लोकांना भटुरे खूप जास्त आवडतात, पण त्याचा परिसरात हा पदार्थ मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने चवदार भटुरे रेसिपी कशी बनवतात, आता आपण भटुरे रेसिपी पाहणार आहोत.

Bhature

भटुरे मराठी Bhature Recipe In Marathi

रेसिपी प्रकार :

भटुरे हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे, हा सर्वाना आवडतो. यांचे खूप कमी प्रकार पडतात, जसे भटुरे, पुरी, रवा भटुरे, हे सर्व प्रकार खायाला एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
भटुरे ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

भटुरेच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

भटुरे बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो. यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

भटुरे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

भटुरे तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, आणि नंतर कुकिंग करावे लागतात. यासाठी आपल्याला टोटल टाईम 25 मिनिट वेळ लागतो.

भटुरेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 4 बटाटे/आलू.
2) 2 वाटी मैदा.
3) 1 चिमूट सोरा.
4) मीठ.
5) तेल.

पाककृती :

  • सर्वात प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन घ्या, आणी एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • नंतर गॅस चालू करून, एक खोल तळाचे भांडे ठेऊन त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाकून बटाटे उकळू घाला.
  • बटाटे थोडे नरम झाले की, खाली काढून थोडा वेळ थंड होऊ द्या, नंतर त्याची साल काढून घ्या.
  • आता एका प्लेटमध्ये बटाटे बारीक करा, त्यामध्ये मैदा, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चम्मच तेल टाका.
  • नंतर यांचे पुणे मिश्रण करा, यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाकून चांगले मळून घ्या, आणि एक नरम गोळा तयार करा.
  • गोळा तयार झाला की, 10 मिनिट झाकून ठेवा, गोळा चांगला मुरला की भटुरे स्वादिष्ट बनतात.
  • नंतर यांचे लहान-लहान गोळे तयार करा, आणि जाडीला मध्यम व लहान चपात्या तयार करा.
  • नंतर गॅस चालू करा, आणि त्यावर एक खोल तळाची कढई ठेवून त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
  • तेल गरम झाले की गॅस मध्यम आसेवर करा, आणि त्यामध्ये एक-एक चपाती तळून घ्या.
  • चपाती चांगली फुगेल आणि एका बाजूने चांगली लालसर झाली, दुसऱ्या बाजूने उलटा दोन्ही बाजूने झाली की, नंतर चपाती एका पेपर वरती काढा. म्हणजे त्यातील शिल्लक तेल निघून जाईल.
  • आता आपले चवदार आणि गरमा-गरम भटुरे खाण्यासाठी तयार आहेत. छोले मसाल्या सोबत आपण यांचा खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

भटुरेमध्ये असणारे घटक :

भटुरे हा आलू आणि मैदा पासून तयार केलेला एक पदार्थ आहे. यामध्ये विविध घटक असतात, जसे सोडियम, पोटॅशियम, लोह, चरबी, फॅट, व्हिटॅमिन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

भटुरेमध्ये पौष्टिक घटक आहेत, जसे सोडियम, फायबर यामुळे आपले शरीर निरोगी राहते.

यामध्ये असणारे चरबी, फॅट यामुळे आपल्या शरीरावर चरबी आणि मासपेशी वाढतात.

यातील सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

भटुरे हा एक तेलकट पदार्थ आहे, हा आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला मळ-मळ आणि उलटी होऊ शकते.

यामध्ये असणारे घटक आपल्याला शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून भटुरे आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला भटुरे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment