कोळंबी रेसिपी मराठी Kolambi Recipe in Marathi

कोळंबी रेसिपी मराठी Kolambi Recipe in Marathi  कोळंबी हा एक समुद्रात राहणारा प्राणी आहे. कोळंबी या रेसिपीला खूपच लोकप्रियता लाभलेली आहे. कारण कोळंबी ही जेवढी खायला चविष्ट लागते. तेवढीच ती सर्व पोषण तत्त्वांनी भरलेली आहे. कोळंबी ही समुद्रात तसेच आजकाल कोळंबी शेती केंद्र देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. कोळंबी रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व कुरकुरीत लागते. ती लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत पौष्टिक असे पदार्थ आहे. परंतु रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधले महागडे रेट तसेच येथील अस्वच्छता लक्षात घेता, आपण आपल्या घरी स्वतः स्वच्छ पद्धतीने जर ही रेसिपी तयार केली तर खूप छान होईल व खाण्याचा मज्जा देखील येईल. तर आज आपण कुरकुरीत अशी कोळंबी रेसिपी कशी तयार करायची याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

Kolambi Recipe

कोळंबी रेसिपी मराठी Kolambi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

आपण बऱ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहिल्या आहेत. त्यामध्ये कोळंबी रेसिपी ही थोडी वेगळी आहे. ज्याप्रमाणे फिश रेसिपीज वेगवेगळ्या प्रमाणे तयार करता येतात. तसेच आपल्याला कोळंबी ही रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतात. जसे तवा फ्राय कोळंबी, कोळंबी बिर्याणी, कोळंबी भात, कोळंबी सुक, कोळंबी रस्सा, ग्रेव्ही कोळंबी इ. अशा प्रकारचे रेसिपी पाहिल्या आहेत; परंतु कोळंबी ही कुरकुरीत होण्यासाठी तवा फ्राय केली जाते किंवा मग तळली जाते. या सर्व प्रकारांमध्ये तवा फ्राय कोळंबीला जास्त मागणी असते. तवा फ्राय कोळंबी खाण्यासाठी अप्रतिम लागते. आज काल रेस्टॉरंट मध्ये किंवा बाहेर स्टॉलवर देखील आपल्याला कोळंबी खाण्यासाठी अवेलेबल आहेत. परंतु आपण आपल्या घरी ही रेसिपी अगदी कमी वेळात, झटपट व कुरकुरीत तयार करू शकता. तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

कोळंबी ही रेसिपी करण्या अगोदर आपल्या आधी स्वच्छ करावी लागते. तसेच त्यासाठी लागणारे साहित्य देखील गोळा करावी लागतात. कोळंबीला मॅरीनेट करून ठेवावी लागते त्याकरता आपल्याला साधारणतः 15 एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कोळंबी रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

कुरकुरीत व झटपट कोळंबी रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला एकूण 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कोळंबी रेसिपी साठी लागणारे साहित्य :

सर्वप्रथम आपल्याला कोळंबी मॅरीनेट करून ठेवावी लागते त्याबद्दल लागणारे साहित्य :

1) 250 ग्रॅम कोळंबी
2) पाव चमचा हळद
3) चवीनुसार मीठ
4) अर्धा चमचा लाल तिखट
5) एक चमचा लिंबाचा रस

कोळंबी तवा फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य

1) तीन चमचे तेल
2) एक चमचा आले लसूण पेस्ट
3) दीड वाटी बारीक चिरलेला कांदा.
4) एक चमचा लाल तिखट
5) एक चमचा मालवणी गरम मसाला
6) एकदम साधने पावडर
7) चवीनुसार मीठ

कोळंबी रेसिपी तयार करण्याची पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला कोळंबी मॅरीनेट करण्यासाठी एका भांड्यामध्ये कोळंबी घ्या. ती कोळंबी सुरुवातीला स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य घालून घ्या.
  • नंतर हे सर्व मिश्रण एकत्र मिसळून घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.
  • कोळंबी आता तवा फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यामध्ये कांदा घाला चार ते पाच मिनिटे छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट, लाल तिखट, मालवणी मसाला आणि धने पूड तसेच चवीनुसार मीठ घालून घ्या.
  • तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता.
  • हे छान दोन मिनिटे शिजवून घ्या. नंतर कोळंबी मॅरीनेट झालेली आहे त्यामुळे आता फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालून. कोळंबी छान फ्राय करून घ्या. नंतर तयार केलेला मसाला या कोळंबीवर घाला व कोलंबी वर थोडे पाण्याचे शिंतोडे शिकून घ्या म्हणजे मसाला तव्याला चिकटणार नाही.
  • चार ते पाच मिनिटात शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या. अशाप्रकारे गरमागरम कुरकुरीत कोळंबी रेसिपी तयार आहे.
  • आता तुम्ही ही रेसिपी तांदळाच्या भाकरी, तंदुरी रोटी, भातासोबत देखील खाऊ शकता.

कोळंबीमध्ये असणारे पोषक घटक :

कोळंबी मध्ये ब जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते तसेच त्या व्यतिरिक्त रिबोफ्लेवीन, टाइमिंग फॉलिक ऍसिड, पॅन्टोथेनीक ऍसिड, कोबालमिन तसेच कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम आयोडीन आणि सेलेनियम हे खनिजे देखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणून कोळंबी हे एक पौष्टिक पदार्थ आहे.

कोळंबी खाण्याचे फायदे :

आपण पाहिले आहेत कोळंबी रेसिपीज वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतात. कोळंबी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळते त्यामुळे हाडे मजबूत होतात.

कोळंबी खाल्ल्यामुळे दात देखील मजबूत होतात जर हे तुम्हाला बालपणात खायला दिले तर ते तुमच्यासाठी खूपच महत्वाच्या आहेत.

कोळंबीमध्ये बरेच पोषक घटक आहेत, त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता देखील चांगली राहते. अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.

तोटे :

कोळंबीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याने ती कमी प्रमाणातच खावी. अन्यथा तिचे अति सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हृदयविकार वाढेल तसेच त्यापासून एलर्जी होण्याची देखील भीती असते.

कोणत्याही निरोगी फूडचे प्रमाण प्रमाणातच करायला पाहिजे अति प्रमाणात सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला कोळंबी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment