कोल्ड कॉफी रेसिपी मराठी Cold Coffee Recipe in Marathi

कोल्ड कॉफी रेसिपी मराठी Cold Coffee Recipe in Marathi उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला थंड पेय घ्यावेसे वाटते. कारण उन्हामुळे आपल्याला गरमीचा त्रास सहन करावा लागतो. तर आम्ही तुमच्या करता अशीच एक उन्हाळ्यामध्ये मनाला शांतता लाभणारी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, कोल्ड कॉफी रेसिपी जिचे नाव आहे. कोल्ड कॉफी ही अतिशय सोपी व कमी वेळामध्ये तयार होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आईस्क्रीम, शरबत, ज्यूस, बर्फ गोळा सर्वांनाच आवडतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी माहिती.

Cold Coffee

कोल्ड कॉफी रेसिपी मराठी Cold Coffee Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

भारतामध्ये कॉफी बऱ्याच लोकांचे आवडते पेय आहे. चहाच्या नंतर दुसरा क्रमांक भारतात कॉफी पिणाऱ्यांचा लागतो. आपण कॉफी पासून आईस्क्रीम, चॉकलेट, कॉफी पेय, कॉफी केक अशा विविध रेसिपीज बनवू शकतो. कोल्ड कॉफी उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला आवर्जून आठवणारा हा प्रकार आहे. बाहेर प्यायला गेलो तर 50 ते 100 रुपये जातातच. पण घरच्या घरी स्वच्छता राखत ही कोल्ड कॉफी आपण स्वत:च्या हाताने करुन प्यायलो तर?
किती आनंद वाटेल तसेच घरच्या सर्व फॅमिली मेंबरला देखील आनंद होईल. आपल्याला पाहिजे तेव्हा अगदी 10 मिनीटांत आपण कॅफेसारखी कॉफी घरी करु शकतो. तिही केवळ दहा मिनिटातच. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात कोल्ड कॉफी खाल्ल्यामुळे आपले मूडही फ्रेश होईल व थकवा निघून जाईल.
तर चला मग बघूया कोल्ड कॉफी रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता बनणार आहे ?
ही रेसिपी आपण 3 व्यक्तींकरिता बनवणार आहोत.

रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

कोल्ड कॉफी तयार करण्याकरिता आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. त्याकरता आपल्याला 5 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कोल्ड कॉफी तयार करण्यासाठी लागणारा वेळ :

कोल्ड कॉफी तयार करण्यासाठी आपला 5 मिनिटे एवढा वेळ लागतो.

एकूण वेळ :

कोल्ड कॉफी रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला ऐकून 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) 2 चमचे कॉफी पावडर
2) चार चमचे साखर
3) अर्धी वाटी मिल्क पावडर
4) पाच ते सहा क्यूब बर्फ
5) अर्धा लिटर दूध
6) चॉकलेट सॉस अर्धी वाटी
7) दोन चमचे कोको पावडर

पाककृती :

  • कोल्ड कॉफी बनवण्याकरता सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कॉफी पावडर घालायची आहे. ही फिल्टर कॉफीची किंवा इन्स्टंट कॉफी पावडर सुद्धा असू शकते, नंतर तुमच्या आवडीनुसार साखर आणि बर्फाचे तुकडे घाला. हे सर्व मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • त्यानंतर याच भांड्यात थोडे दूध घालून पुन्हा हे मिश्रण फिरवून घ्या.
  • हे मिश्रण छान एकजीव झाले की, त्यामध्ये चॉकलेट सॉस, मिल्क पावडर आणि उरलेले दूध घाला आणि पुन्हा सगळे चांगले मिक्सर मधून फिरवून घ्या.
  • दूधाची कोल्ड कॉफी करत असलो तरी मिल्क पावडरमुळे या कोल्ड कॉफीला थोडा घट्टपणा येतो. तसेच चॉकलेट सॉसमुळे कॉफीच्या चवीत फरक पडतो.
  • एका ग्लासला कडेने चॉकलेट सॉस आणि कोको पावडर लावून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधली कॉफी ओता.
  • यामध्ये तुमच्या आवडीनुसार चोको चिप्स, कोको पावडर किंवा कॉफी पावडर वरुन घालू शकता. त्यामुळे ती दिसायला तर कॅफे मधल्या कोल्ड कॉफीसारखी खूप छान लागेल यामध्ये गार होण्यासाठी दोन क्युब बर्फ घाला.
  • तीन वेळा वेगवेगळे पदार्थ घालून मिक्सर केल्याने या कॉफीला ग्लासमध्ये ओतल्यावर फेसही चांगला येतो.
  • कोल्ड कॉफीमध्ये दूध घेताना ते कच्चे घेतले तर त्यामधील स्निग्नतेमुळे कॉफीचा घट्टपणा आणखीन वाढतो.
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये व्हॅनिला किंवा चॉकलेट आइस्क्रीमचा गोळाही घालू शकता.
    तर अशाप्रकारे कोल्ड कॉफी रेसिपी तयार आहे आता तुम्ही सर्व्ह करू शकता.

पोषक तत्व :

कोल्ड कॉफीमध्ये बरेच पोषक तत्व असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. कोल्ड कॉफीमध्ये असणारे पौष्टिक घटक पाणी, ऊर्जा, कॅलरीज, चरबी, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, थायमीन, विटामिन बी 6, कॅफिन इ.

फायदे :

कोल्ड कॉफी पिल्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा तसेच चपळता वाढवते. ऑफिसमध्ये असलेले कॅफिन मेंदू आणि मज्जा तंतू संस्थेची क्रिया वाढवते. त्यामुळे आपल्याला उत्साही व फ्रेश वाटते.

वजन कमी करण्यासाठी देखील कॉफी उपयोगी आहे. कारण कॉफीमध्ये कॅफिन नावाचे घटक असतात. ती शरीरातील चयापचय क्रिया वाढवते.

म्हणजेच अन्नपचविण्याची प्रक्रिया सुरळीत चालते लठ्ठपणा नियंत्रित करते.

कॉफी पिण्यामुळे मधुमेह सारखा धोका देखील कमी होऊ शकतो.

तोटे :

कॉफीची जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्याला खालील प्रकारचे दुष्परिणाम आढळतात.

अतिरिक्त कॉफी घेतल्यामुळे आपल्याला झोप लागत नाही, अस्वस्थता वाढते तसेच वजन खूप कमी होते.

कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे हृदयाचे ठोके वाढतात. मळमळ, डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे आपण कोल्ड कॉफीचे मर्यादित प्रमाणात सेवन करायला पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला कोल्ड कॉफी ही रेसिपी कशी वाटली, ते मला कमेंट करून नक्की सांगा व ही रेसिपी तयार करून बघा.

Leave a Comment