बोंबील फ्राय रेसिपी मराठी Bombil fry recipe in Marathi बोंबील ही एक समुद्रात राहणारी फिश असून तिचा खाण्यासाठी वापर केला जातो. अत्यंत चविष्ट व स्वादिष्ट अशी बोंबील फ्राय रेसिपी तयार होते. बऱ्याच लोकांना मासे खायला आवडतात. त्यामध्ये बोंबील हा माशांचा एक प्रकार आहे. जी मासे प्रेमीच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी पुरेशी आहे. आज काल बाहेर स्टॉलवर किंवा रेस्टॉरंटमध्ये आपल्याला बोंबील फ्राय रेसिपी उपलब्ध आहे. ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व कमी वेळातही आपण आपल्या घरी तयार करू शकतो. ही रेसिपी रेस्टॉरंटमध्ये तर उपलब्ध आहेच. परंतु आपण आपल्या स्वतःच्या हाताने जर करून ही रेसिपी खाल्ली तर मजा वेगळीच राहते. तसेच स्वतः आपल्याला तयार करून बघायचे असेल तर ही माहिती खास तुमच्याकरिता आहे. तर चला मग या रेसिपी विषयी सविस्तर माहिती पाहूया.
बोंबील फ्राय रेसिपी मराठी Bombil fry recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
बोंबील ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बोंबीलच्या विविध डिशेस आपल्याला पाहायला मिळतात. जसे बोंबील फ्राय, बोंबील करी, ग्रीन बोंबील करी, बोंबील कालवण इ. बोंबील ची रेसिपी तयार झाल्यानंतर अतिशय चविष्ट व अप्रतिम लागते. आपणही हॉटेल सारखी बोंबील रेसिपी घरच्या घरी तयार करू शकतो. तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे सामग्री व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार करणार आहोत?
ही रेसिपी आपण 5 व्यक्ती करता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करताना लागणारा वेळ हा 15 मिनिटे एवढा आहे.
कुकिंग टाईम :
ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
बोंबील फ्राय रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) चार मोठ्या आकाराचे बोंबील
2) एक चमचा हळद एक लिंबू
3) तीन हिरव्या मिरच्या
4) एक चमचा आलं-लसूण पेस्ट
5) तेल
6) एक वाटी रवा
7) अर्धी वाटी तांदळाचे पीठ
8) चार चमचे मालवणी मसाला
9) मीठ
बोंबील फ्राय तयार करण्याची पाककृती :
- कुर्मा मराठी
- सर्वप्रथम आपल्याला बोंबील साफ करून घ्यायची आहे. तसेच त्याच्या पोटातील भागाकडून मध्यभागी चीर देऊन ते उघडून स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.
- जर आपल्याला मासे स्वच्छ करता येत नसेल तर मासे विक्रेत्याकडूनच बोंबील साफ धुवून घ्यावी.
- स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर बोंबील एका कोरड्या फडक्याने कोरडी करून घ्यावीत. बोंबीलला हळद आणि मीठ तसेच लिंबाचा रस चोळून लावावा व हे 10 मिनिटे असेच ठेवून द्यावे.
- बोंबील मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे बोंबीलला काही मिनिटे मीठ लावून ठेवल्यानंतर त्यातील पाणी सर्व बाहेर काढून टाकायचे आहेत.
- त्या करता एका कापडावर बोंबील ठेवून वरून दुसरे कापड ठेवावे व चॅटिंग बोर्ड, कुकर किंवा पाट्यासारखी वजनदार वस्तू ठेवून 30 मिनिटे असेच ठेवून द्या. म्हणजे बोंबील मधील सर्व पाणी बाहेर पडून जाईल.
- आता बोंबीलला लावण्यासाठी आले लसूण पेस्ट हिरव्या मिरचीची जाडसर ठेचा वाटून घ्या. तसेच पाणी फार कमी वापरून मसाला तयार करावा.
- आता बोंबीलमधील पाणी कमी झाले व आता ती एकदम झपाट झाली असेल त्यांना वाटलेला ठेचा लावून फ्रिजमध्ये दहा मिनिटे ठेवावेत असे केल्यामुळे बोंबील छान चुरचुरीत तळले जातात.
- बोंबलांना तळण्यापूर्वी घोळवण्यासाठी एका ताटात मालवणी मसाला, रवा, तांदळाचे पीठ आणि मीठ एकत्र मिक्स करून घ्या व त्यामध्ये फ्रीजमधून बाहेर काढलेली बोंबील मिश्रणात छान घोडवून घ्या.
- आता एक नॉनस्टिक तवा गॅसवर तापण्यासाठी ठेवा तवा गरम झाला की, त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून बोंबील मध्यम आचेवर कळणार आहोत. तेल छान गरम होऊ द्यायचे आहे, नाहीतर बोंबील तव्याला चिटकून तुटतील.
- ही बोंबील तव्यावर दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्या. माशांची एक बाजू कुरकुरीत तळायला जवळजवळ आपल्याला तीन मिनिटे एवढा वेळ लागतो.
- बोंबील तळायला थोडे जास्त तेल लागते म्हणून व्यवस्थित तेल घालून बोंबील तळून घ्यावेत.
- तळून झाले की, हे बोंबील एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.
आता तुम्ही भातासोबत पोळी सोबत किंवा तशीही ही बोंबील खाऊ शकता.
पोषक घटक :
बोंबील आशा मध्ये अनेक प्रकारचे घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी असतात तसेच बोंबील खाणे पौष्टिक आहे. त्यामध्ये अमेगा 3 फॅटी ऍसिड असते. कॅल्शियम जीवनसत्वे, प्रथिने, लोह हे घटक असतात. याशिवाय त्यामध्ये चरबीचे प्रमाण देखील भरपूर असते.
बोंबील खाण्याचे फायदे :
बोंबील खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्याची तेजी चांगली राहते.
बोंबील रेसिपी खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे कारण बोंबीलमध्ये इतर माशांच्या तुलनात अधिक लोहाचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.
ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींना देखील बोंबील ही रेसिपी खूप महत्त्वाची ठरते. तसेच ही रेसिपी आरोग्यदायी आहे.
बोंबील नियमित खाल्ल्यामुळे आपले केस, त्वचा, डोळे चांगले राहतात . बोंबीलमध्ये भरपूर प्रमाणात आवश्यक घटक असतात. त्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहते.
तोटे :
बोंबील जेवढी आरोग्यदायी आहे, तेवढीच ते हानिकारकही ठरू शकते. गर्भवती स्त्रियांनी जर बोंबील खाल्ली तर गर्भातील चुकीचा विकास पूर्णता होत नाही तसेच त्याच्या विकासामध्ये व्यक्ती निर्माण होतो.
बोंबील रेसिपीचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे आपल्याला मळमळ तसेच पोट दुखी होऊ शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला बोंबील फ्राय ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.