बटर नान रेसिपी मराठी butter Nan Recipe in Marathi आपण बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर पनीर भाजी, छोले मसालेदार भाजी मागवत असतो. त्यासोबत आपल्याला बटर नान, तंदुरी नान अशा प्रकारची मिळत असतात. बटर नान खाण्यासाठी अतिशय चविष्ट व खमंग लागतो. तवा नान देखील आपण घरच्या घरी बनवू शकतो. आपल्या घरी विशेष भाजी बनवली तर त्यासोबत पोळी खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो. म्हणून आपण नान रेसिपी बनवू शकतो. त्यामुळे जेवणाचा आनंद द्विगुणीत होईल. व घरचे सदस्य देखील आनंदीत होतील. नान रेसिपी तयार करण्यासाठी अत्यंत सोपी आहे. तसेच ती तयार करण्यासाठी वेळही कमी लागतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
बटर नान रेसिपी मराठी butter Nan Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
नान रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. कोथिंबीर नान, बटर नान, लसूण नान, तंदुरी नान या पद्धतीने तयार करून पनीर भाजी मसाले छोले तेव्हा मसालेदार भाजी सोबत खाल्ले जातात. आपण हे नान रेसिपी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भाज्यांसोबत खाऊ शकतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला किमान 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
या रेसिपीला कुकिंग करण्याकरता आपल्याला किमान 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
नान ही रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.
नान रेसिपीसाठी लागणारे साहित्य :
1) दोन वाटी मैदा
2) पाव वाटी दही
3) अर्धा चमचा बेकिंग पावडर
4) एक चमचा तेल
5) चवीनुसार मीठ
6) पाणी काळे जिरे
7) कोथिंबीरचे पाने
8) लोणी
नान बनवण्याची पाककृती :
- पालक पराठा मराठी
- सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दही घ्या नंतर त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा आणि तेल घाला तसेच हे मिश्रण छान मिसळून घ्या.
- नंतर त्यामध्ये मैदा व मीठ घालून हे मिश्रण पुन्हा एकदा छान मळून घ्या. तसेच थोडे पाणी घालून त्याचे घट्ट असे पीठ मळून घ्या.
- हे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे ते चपातीच्या पिठासारखे असावे.
- नंतर हे पीठ एका भांड्यात काढून ठेवा व तेल लावून दोन ते तीन तास उबदार ठिकाणी झाकून ठेवा.
- तीन-चार तासानंतर हे पीठ पुन्हा बाहेर काढा व एकदा छान असे मळून घ्या. पिठाचे गोळे बनवून घ्या नंतर पिठाचा एक गोळा घेऊन तो उभा रोल करा.
- पीठ छान मळले गेले असेल तर कोरडे पीठ वापरण्याची त्याला गरज पडत नाही.
- नानला एका बाजूला थोडेसे पसरवून घ्या व त्याला यांचा छान असा आकार मिळेल.
- नानची जाडी तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे ठेवू शकता.
- नंतर नानवर थोडी कोलोंजी आणि कोथिंबीर पसरून द्या.
- तुम्हाला हवे असेल तर थोडे लसूण देखील तुम्ही घालू शकता नंतर मध्यम आचेवर पॅन गरम करा.
- तव्यावर नान दोन्ही बाजूंनी थोडे थोडे भाजून घ्या. नंतर एका बाजूने दोन मिनिटे भाजल्यानंतर त्याला पलटी करा तसेच दुसऱ्या बाजूनेही थोडे भाजून घ्या.
- नंतर गॅस वरून पॅन कार्ड व त्यावर एक जाळी ठेवा तसेच गॅसवरून पॅन काढा आणि त्यावर जाळी ठेवा.
- दोन्ही बाजूंनी नान छान भाजून घ्या. आता एका ताटामध्ये काढा व त्यावर तुम्ही थोडे बटर पसरवून घ्या.
- अशाप्रकारे सर्व नान तुम्ही भाजून घ्या. आता तुम्ही ही रेसिपी नॉनव्हेज किंवा इतर मसालेदार भाज्या सोबत करू शकता.
पोषक घटक :
नान हा एक चवदार पदार्थ आहे. यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. फॅट, चरबी, शुगर, कॅल्शियम, लोह, प्रोटीन, व्हिटॅमिन, मॅग्निशियॅम हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
फायदे :
बटर नान खाल्ल्याने आपल्याला प्रोटीन, आणि कॅल्शियम मिळते, ज्यामुळे आपली भूक होते.
यामध्ये असणारे चरबी, फॅट, शुगर आपल्या शरीरावर चरबी आणि फॅटचे प्रमाण वाढवते.
बटर नानमधील व्हिटॅमिन, मॅग्निशियॅम असे इतर घटक आपले शरीर निरोगी ठेवतात.
तोटे :
बटर नान ही मैद्यापासून बनवलेली असते. यामुळे आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपल्याला उलटी होऊ शकते.
म्हणून बटर नान आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला बटर नान रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.