फींगर चिप्स मराठी Finger Chips Recipe In Marathi

फींगर चिप्स मराठी Finger Chips Recipe In Marathi  फींगर चिप्स हा पदार्थ बटाटे पासून बनवला जातो. हा पदार्थ चवीला मसालेदार आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी फींगर चिप्स वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. यांचा उपयोग उपवास असताना फराळ म्हणून सुध्दा केला जातो. फींगर चिप्स भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ मानला जातो. यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

आपण हॉटेल किंवा बेकरीवरती पाहतो किती स्वादिष्ट आणि चवदार फींगर चिप्स मिळतात. काही लोकांना फींगर चिप्स खूप आवडतात, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट आणि मसालेदार चिप्स मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आली आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट फींगर चिप्स कसे बनवतात यांची रेसिपी, आता आपण फींगर चिप्स रेसिपी पाहणार आहोत.

Finger Chips

फींगर चिप्स मराठी Finger Chips Recipe In Marathi

फिंगर चिप्सचे प्रकार :

फींगर चिप्स हा मसालेदार पदार्थ आहे, जो बटाटे पासून बनवला जातो. फींगर चिप्स वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात, जसे फींगर चिप्स, बटाटे चिप्स, बटाटे टोमॅटो चिप्स, केला चिप्स, बटाटे शेव, हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
फींगर चिप्स रेसिपी ही आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

फींगर चिप्सच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

फींगर चिप्स तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर फींगर चिप्स बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

फींगर चिप्स कुकिंग करण्यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

फींगर चिप्स बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 25 मिनिट वेळ लागतो.

फींगर चिप्ससाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 5 ते 6 मोठे आलू/बटाटे.
2) अर्धी वाटी कॉन फ्लॉवर पावडर.
3) 2 चमचे चाट मसाला.
4) तेल तळण्यासाठी.
5) चवीनुसार मीठ.

पाककृती :

  • सर्वात प्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्या, आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • नंतर बटाटेची पूर्ण साल काढून घ्या, नंतर बटाटे उभे चिप्स कटरने सर्व बटाटे उभे कापून घ्या.
  • नंतर एका प्लेटमध्ये काढून, त्यावर चवीनुसार थोडे मीठ, आणि कॉन फ्लॉवर पावडर टाका, आणि मिक्स करा.
  • नंतर यावर थोडा चाट मसाला टाका, आणि पूर्ण मसाला बटाटेला लागेल अशा प्रकारे मिक्स करा.
  • आता गॅसवरती एक कढई ठेऊन, त्यामधे आवश्यक तेवढे टाकून गरम करा, तेल गरम झाले की त्यामध्ये
    थोडे-थोडे फींगर चिप्स टाका.
  • आणि चांगले तळून घ्या. चिप्स चांगले कुरकुरीत होये पर्यत तळून घ्या.
  • नंतर एका पेपरवरती काढा, म्हणजे शिल्लक तेल निघून जाईल, अशा प्रकारे सर्व चिप्स तळून घ्या.
  • आता आपले स्वादिष्ट आणि मसालेदार फींगर चिप्स खाण्यासाठी तयार आहेत. आपण एका प्लेटमध्ये घेऊन फींगर चिप्स खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

फींगर चिप्समध्ये असणारे घटक :

फींगर चिप्स हा एक स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे. हा बटाटे पासून बनवला जातो, यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, शुगर, मॅग्निशियॅम, पोटॅशियम, व्हिटॅमिन, प्रथिने, चरबी, फॉस्फरस, लोह, फॅट, कॅलरी हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

फींगर चिप्स सेवन केल्याने आपल्याला मॅग्निशियॅम, पोटॅशियम, प्रथिने सारखे घटक मिळतात.

यामुळे आपल्या शरीरात रक्त भिसरण शक्ती चांगली राहते, आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

यामध्ये असणारे फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन हे घटक आपले शरीर निरोगी ठेवतात.

फींगर चिप्समध्ये असणारे सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

फींगर चिप्स हा एक मसालेदार पदार्थ आहे, आपण हा पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटात जळ-जळ होऊ शकते.

हा एक तेल तेलकट पदार्थ आहे, यामुळे आपल्याला उलटी होऊ शकते.

म्हणून फींगर चिप्स आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला फींगर चिप्स रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment