गाजर हलवा रेसिपी मराठी Carrot Halwa Recipe In Marathi

गाजर हलवा रेसिपी मराठी Carrot Halwa Recipe In Marathi गाजर हलवा हा एक गोड आणि स्वादिष्ट पदार्थ आहे.  जो भारतात मिष्ठान्न म्हणून वापरला जातो, आपल्या घरी पाहुणे आले किंवा सणाला गाजर हलवा जास्त बनवला जातो.  हा एक लोकप्रिय पदार्थ आहे, जो सर्वाना आवडतो.  हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे.  यामध्ये विविध पौष्टिक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.  गाजर हलवा हा शहरी भागात जास्त प्रमाणात मिळतो, आणि गावाकडे कमी प्रमाणात मिळतो.  काही लोकांना गाजर हलवा खूप आवडते.  पण ते बाहेर जाऊन गाजर हलवा खाऊ शकत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम स्वादिष्ट आणि चवदार गाजर हलवा कसा बनवतात.  आता आपण गाजर हलवा रेसिपी पाहणार आहोत.

Carrot Halwa

गाजर हलवा रेसिपी मराठी Carrot Halwa Recipe In Marathi

गाजर हलव्याचे प्रकार :

गाजर हलवा हा एक गोड आणि स्वादिष्ट पदार्थ आहे.  भारतात तसेच अनेक राज्यात गाजर हलवा हा वेग वेगळ्या प्रकारे बनवला जातो.  काही लोक गाजर हलवा हा दूध टाकून बनवतात.  तर काही लोक तूप आणि साखर घालून बनवतात, यामध्ये जास्त प्रकार येत नाही.  गाजर हलवा सारख्याच पद्धतीने बनवला जातो.

गाजर हलवाच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

गाजर हलवा तयार करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करणे महत्वाचे आहे.  यामुळे आपल्याला हलवा करताना लवकर मदत होते.  याच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

गाजर हलवा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

गाजर हलवा बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, आणि नंतर कुकिंग करावे लागते.  यासाठी आपल्याला टोटल टाईम 40 मिनिट वेळ लागतात.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

गाजर हलवा ही रेसिपी आपण 8 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

गाजर हलव्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 किलो गाजर.

2) 50 ग्रॅम तूप.

3)  5 ते 6 इलायची.

4) 400 ml दूध.

5) 250 ग्रॅम साखर.

6) 10 ते 12 काजू.

7) 10 ते 12 बदाम.

8) थोडा मनुका.

पाककृती :

  • बालुशाही रेसिपी मराठी
  • सर्वात प्रथम गाजर स्वच्छ धुऊन घ्यावे, नंतर व्यवस्थित सोलून घ्या.
  • नंतर गाजर खीसनी किंवा फूड प्रोसेसरमध्ये व्यवस्थित बारीक खिसून घ्या.
  • खिसून झाल्यावर गॅस चालू करा, आणि एक खोल तळाची कढई किंवा पॅन ठेवा.
  • नंतर खिसलेले सर्व गाजर पॅनमध्ये टाका, आणि सोबत दूध सुध्दा टाका.  आता गाजर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • हे मिश्रण मध्यम आशेवर शिजवा.  काही मिनिटनंतर दूधाचा फेस येऊ लागेल, आणि नंतर हळूहळू कमी होणार.
  • गाजर आणि दुधाचे मिश्रण वारंवार ढवळत रहा, आणि दूध 80% कमी होईपर्यत गाजर आणि दुधाचे मिश्रण शिजवा.
  • थोडे घट्ट झाल्यानंतर यामध्ये तूप घाला, आणि चांगले मिश्रण करून घ्या, यामुळे हलवा स्वादिष्ट बनतो.
  • नंतर यामध्ये 10 ते 12 चम्मच साखर टाका.  किंवा चवीनुसार साखर टाका, आणि मिक्स करा.
  • नंतर यामध्ये बारीक इलायची पावडर टाका, आणि मनुका, काजू, बदामचे मध्यम तुकडे करून यामध्ये टाका, व मिक्स करा.
  • हलव्याचे मिश्रण कोरडे होईपर्यत उकळवा.  व दूध पूर्णपणे बाष्पीभवन झाले पाहिजे, नंतर तुम्हाला कडेने थोडे तूप सोडलेले दिसेल.
  • नंतर 2 मिनिट होऊ द्या, आणि गॅस गॅस बंद करा, आपला गाजर हलवा तयार आहे.
  • एकदम स्वादिष्ट आणि चवदार गाजर हलवा तयार झाला आहे.  आपण त्यावर थोडे काजू, बदामचे तुकडे टाकून सजवू शकतो.
  • थोडा थंड झाल्यावर एक चम्मच आणि लहान वाटी घेऊन, आपण गाजर हलवा खाऊ शकतो.

गाजर हलव्यात असणारे घटक :

गाजर हलवा आपण अनेक पौष्टिक आहारापासून बनवतो.  यामध्ये गाजर, काजू, बदाम, मनुका, तूप, दूध असते.  यामध्ये कॅल्शियम, फॅट, शुगर, व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन सी, प्रोटीन असे अनेक घटक यामध्ये आहेत.  हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे घटक आहेत.

फायदे :

गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन क आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.  यातील व्हिटॅमिन ए, हे आपली दृष्टी सुधारण्यास मदत करते.

दुधातील कॅल्शियम, फॅट आणि प्रोटीन आपल्या शरीराला अशक्त होय देत नाही, हे खूप फायद्याचे घटक आहेत.

हलव्यात असणारे तूप आणि काजू बदाम आपल्याला शरीराला आवश्यक तेवढे फॅट देते.  यामुळे आपण हृदयरोग पासून दूर राहतो.

गाजर हलवा खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात.  म्हणून आपण हलवा खायला पाहिजे.

तोटे :

गाजर हलवा गोड पदार्थ आहे.  हा आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्या पोट दु:खी होय शकते.

यामध्ये असणारे विविध प्रकारचे पौष्टिक घटक आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून आपण हा योग्य प्रमाणात खाल्ला पाहिजे, यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला गाजर हलवा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment