चकली रेसिपी मराठी Chakali recipe in Marathi चकली ही रेसिपी सर्वांच्याच परिचयाची आहे, ही रेसिपी केवळ दिवाळीतच नव्हे, तर बारा महिनेही आपण स्टोअर करून नाश्त्यामध्ये खाऊ शकतो. आज काल चकलीचे पीठ किंवा मग रेडीमेड बनवलेल्या चकल्या विकत मिळतात. चकली ही रेसिपी महाराष्ट्रात सर्वांच्या घरी केली जाते. तर येथे आपण चकली ही रेसिपी माहिती जाणून घेऊया.
चकली रेसिपी मराठी Chakali recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
महाराष्ट्रात चकली ही रेसिपी वेगवेगळ्या प्रकारात बनवली जाते. चकली साठी वापरण्यात येणारे पीठ हे वेगवेगळे असू शकते. मात्र आकार चकलीचा एकच असतो. पीठ कोणतेही असो चकली खायला अतिशय चवदार लागते. चकलीचे आपण 4 ते 5 प्रकार जाणून घेऊया. चकलीचे पीठ मळताना त्यामध्ये आपण कोण कोणते घटक पदार्थ घालतो, त्यावर चकलीची चव अवलंबून असते.
विदर्भात तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, मूग डाळ, धने, जिरे तसेच ज्वारी, बाजरी किंवा तूर डाळीचा देखील वापर करून चकली बनवली जाते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेंगदाणे भाजणीमध्ये टाकले जातात. चकली पचायला जड होऊ नये, म्हणून त्यामध्ये ओवा टाकला जातो तसेच हिंगही अनेक भागात टाकला जाते. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की, चकलीचे पीठ बिघडले असता, चकली मधातच तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेच लोक त्यामध्ये चणाडाळ किंवा मग उडीद डाळीचे प्रमाण वाढवतात.
किती लोकांकरिता रेसिपी बनणार आहे?
आपण चकली ही रेसिपी 7 जणांकरिता बनविणार आहोत.
पूर्वतयारी करिता लागणारा वेळ : चकली रेसिपी साठी पूर्वतयारी करता लागणारा वेळ हा 40 मिनिटे आहे.
कुकिंग टाईम :
चकली तळण्याकरता आपल्याला 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
चकली रेसिपी बनवण्याकरता आपल्याला एकूण 65 मिनिटे एवढा वेळ लागेल.
चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
1) एक वाटी तांदळाचे पीठ
2) एक वाटी चणाडाळ किंवा उडीद डाळीचे पीठ
3) पाणी आवश्यकतेनुसार
4) मीठ चवीनुसार
5) एक चमचा जिरे
6) एक चमचा मिरची पावडर
7) दोन चमचे तीळ
8) एक चमचा हळद
9) तेल
चकली बनवण्याची पाककृती :
- पनीर टिक्का मसाला रेसिपी मराठी
- सर्वप्रथम एका भांड्यामध्ये तांदूळ पीठ, चणाडाळ व उडीद डाळ पीठ एकत्र मिसळून त्यामध्ये मीठ, मिरची पावडर, हळद, तीळ, जिरे आणि थोडे तेल टाकून एकत्र करून घ्या.
- नंतर पिठामध्ये एक वाटी पाणी टाका. हे चकलीचे पीठ घट्ट मळून कणिक तयार करून घ्यायचे आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार आपण पाणी घालू शकता.
- आता हे कणिक एका थंड कापडात गुंडाळून अर्धा तास ठेवायचा आहे.
- तोपर्यंत चकली यंत्र स्वच्छ धुऊन त्याला तेल लावून घ्यायचे आहे.
- पिठाचा गोळा करून चकली यंत्रामध्ये भरायचा आहे. आता कच्च्या चकल्या आपण एका पेपरावर बनवून घ्यायच्या आहेत.
- कच्च्या चकल्या बनवताना त्या तुटणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, तसेच व्यवस्थित गोल आकारात या चकल्या तयार करायच्या आहेत.
- आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कच्च्या चकल्या हळुवारपणे सोडायच्या आहेत.
- चकल्या एकदम गरम तेलात टाकायच्या नाहीत त्यामुळे त्या थंड झाल्यानंतर नरम पडतात.
- तसेच चकल्या तळताना आपल्याला योग्य प्रकारे काळजी घ्यायची आहे. कच्च्या चकल्यांचा रंग थोडा बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत.
- चकल्या तळत असताना जळू देऊ नका. तळलेल्या चकल्या व्यवस्थित तेल निथळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या तेलकट लागणार नाही.
- नंतर सर्व चकल्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवू शकता. तर गरमागरम मिश्र पिठाच्या चकल्या तयार आहेत. आता तुम्हाला आवश्यकता पडल्यास या चकल्या केव्हाही खाऊ शकता.
- वरील प्रमाणेच आपण आता चकलीचा आणखीन एक प्रकार म्हणजे मूग डाळ चकली रेसिपी पाहणार आहोत. या चकल्यांनादेखील तेवढाच वेळ लागतो, जेवढा वरील रेसिपीसाठी लागला.
मूग डाळ चकली रेसिपी करता लागणारे साहित्य :
1) एक वाटी मूग डाळ
2) तीन वाट्या मैदा
3) दोन चमचे पांढरे तीळ
4) एक चमचा ओवा
5) एक चमचा जिरं
6) चवीनुसार मीठ
7) लाल मिरची पावडर आवश्यकतेनुसार
8) तळण्यासाठी तेल
पाककृती :
- सर्वप्रथम कुकरच्या एका डब्यामध्ये मूग डाळ टाका व त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचे आहे. तर दुसऱ्या डब्यामध्ये तीन वाट्या मैदा पाणी न घालता घट्ट झाकून ठेवा. किंवा मग एखाद्या सुती कापडामध्ये बांधून ठेवला तरी चालेल.
- आपण नेहमीप्रमाणे वरण भाताचा कुकर लावतो तेवढाच वेळ आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे.
- कुकर थंड झाल्यानंतर मूग डाळ घोटून घ्यायचे आहे तसेच मैदा देखील आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यामध्ये एकही गुठळी राहायला नको.
- आता मैद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, तिखट, ओवा, पांढरे तीळ, तसेच आपल्याला आवडत असेल तर जिर्याचा देखील आपण वापर करू शकतो.
- नंतर त्यामध्ये दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून शिजवलेली मूग डाळीचे वरण त्यामध्ये टाकून पीठ घट्टसर भिजवून घ्यायचे आहे.
- नंतर चकली यंत्राला तेल लावून त्यामध्ये या पिठाचा गोळा टाकून आपल्याला दोन ते तीन वेढ्याच्या चकल्या गोल आकारात पाडायचे आहेत.
- चकल्या पाडून झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करण्याकरता ठेवायचे आहे व ह्या चकल्या एकेक करून सर्व तळून घ्यायच्या आहेत.
- अशाप्रकारे तुम्ही चकल्या घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर तुम्ही नक्की ही रेसिपी तयार करून बघा व आम्हाला नक्की कळवा.
चकलीतील पोषक घटक :
चकली ही डाळीपासून बनवली जाते तसेच डाळीमध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. डाळींमध्ये फॉलिक ऍसिड, लोह, फॉस्फरस, कोलीन, मॅग्नेशियम तसेच बी जीवनसत्वे, सी व के विटामिन आणि जस्त याचे प्रमाण भरपूर असते.
फायदे :
चकली खाण्याचे बरेच फायदे आपल्याला जाणवतात कारण चकल्या बनवण्यासाठी ज्या विविध डाळींचा उपयोग केला जातो, त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्वच घटक असतात.
जसे हरभरा डाळीमध्ये असणारे सी व के विटामिन आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. या डाळीमध्ये असलेले कॅल्शियम शरीरातील हाडे व दात यांना मजबूत करतात.
चकली खाल्ल्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते. चकली खाल्ल्यानंतर जेवण झाल्याचे समाधान वाटते.
शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांची संरक्षण करायला देखील डाळीतील पोषक घटक मदत करतात.
तोटे :
चकली खाणे तसेच शरीरासाठी पोषक आहे परंतु ते तळलेली असल्यामुळे त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.
खाणाऱ्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर तळलेले पदार्थ त्याला वर्ज असतात.
तसेच ते इतर डाळींचे मिश्रण असल्यामुळे आपण जर चकली जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यापासून अपचन सारखा होऊ शकते.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांनाही शेअर करा.