बदक पक्षाची संपूर्ण माहिती Duck Bird Information In Marathi

Duck Bird Information In Marathi बदक हा पक्षी उभयचर पक्षांचा वर्ग आहे जो पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी संचार करू शकतो. हा पक्षी अँनॅटीडी कुळाच्या अँनॅटीडी उपकुळात येतो. बदकाला पानपक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते. बदक नद्या, तलाव, नाले या ठिकाणी आढळून येतात तसेच बदक हे पक्षी पाण्याजवळ राहणे पसंत करतात. बदकांचे शरीर खूप मजबूत असते तसेच त्यांची मान लहान असून त्यांची पंख सुद्धा असतात. बदकाच्या मादीला कोंबडी म्हणून ओळखले जाते.

Duck Bird Information In Marathi

बदक पक्षाची संपूर्ण माहिती Duck Bird Information In Marathi

हा पक्षी ध्रुवीय प्रदेश सोडला तर जगभरात आपल्याला सगळीकडे दिसून येतो. या पक्षाचा आकार 55 ते 60 सेंटिमीटर आणि वजन एक किलो पर्यंत असते. या पक्षाची विशेष म्हणजे या पक्षांच्या पंखांना एक प्रकारचा तेलकट पण असतो, त्यामुळे त्यांचे पक्ष पंख पाण्यामध्ये सुद्धा ओले होत नाहीत. बऱ्याचदा बदकाला आपण पोहताना पाहिले असेल हे दृश्य पाहण्यास अत्यंत सुंदर दिसते. जगभरात बदकाच्या 120 प्रजाती आढळून येतात. भारतामध्ये सिलेटा-मेटा आणि इंडियन रनर या बदकांच्या प्रजाती प्रसिद्ध आहे.

बदक या पक्षाची शरीर रचना :

बदक या पक्षाच्या प्रजातीनुसार त्यांच्या शरीराच्या आकारमानात व रंगांमध्ये विविधता आढळून येते. बदक हे पक्षी हंसापेक्षा दिसायला आकाराने लहान आणि शरीराने मजबूत असतात. त्यांची मान आणि पाय आखूड असतात. बदकांचे पाय हे त्यांच्या शरीराच्या मागच्या बाजूला असतात. त्यांचा रंग पिवळा असून पुढे तीन व मागे एक बोट असे असते पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेले असतात.

त्यांची चोच मोठी रुंद चापट आणि पिवळी असते तसेच ती पातळ त्वचेने झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात. नर आणि मादी यांच्या शरीराची रंग व्यवस्था मात्र वेगवेगळी असते. पाळीव बदकांचा रंग सामान्यपणे पांढरा असतो. काही बदक काळे काही तपकिरी तर काही हिरवट चमकदार असतात.

बदकांच्या अंगावरील विषय खूप दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेल ग्रंथींचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडत असतात. त्यामुळे त्यांचे शरीर पाण्यामध्ये सुद्धा ओले होत नाही आणि त्यांच्या शरीरावर मऊपिसांचे आवरण असल्यामुळे त्यांची थंडीपासून सुद्धा बचाव होतो. त्यांच्या शरीराची उष्णता कायम राहते. दरवर्षी त्यांच्या शरीराची पिसे बढून जातात आणि त्या जागी नवीन येतात.

बदक हा पक्षी कोठे राहतो?

बदक हे पक्षी बऱ्याचदा आपण पाण्यामध्ये पोहताना पाहिले असेल या पक्षांना पाण्यात पोहणे खूप आवडते. त्यामुळे हे पक्षी नेहमी तलाव, नदीनाले, समुद्रकिनारी किंवा दलदलीच्या प्रदेशांमध्ये येथे राहतात. जेथे त्यांना अनुकूल वातावरण असेल अशा प्रदेशांमध्ये हे पक्षी वास्तव्य सुद्धा करतात.

पक्षाचा आहार :

बदक हे पक्षी सर्व आभारी आहेत हे पक्षी शाकाहारी आणि मांसाहारी सुद्धा आहे. या पक्षांना पाण्यामध्ये राहून पासून तास आपली शिकार साधण्यात खूप मज्जा वाटते. हे पक्षी बेंडूक, मासे, पाण्यातील वनस्पती आणि गवत सुद्धा खातात.

बदकांचा उपयोग :

बदक या पक्षांचा उपयोग कोंबड्यांप्रमाणे अंडी व मास मिळवण्यासाठी केला जातो. त्यांच्या उत्पादनासाठी बदक पालन हा व्यवसाय जगामध्ये अनेक ठिकाणी केला जातो. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतामध्ये बदके मुख्यतः अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येतात. साधारणपणे दमट हवामानामध्ये हा व्यवसाय केला जातो.

हा व्यवसाय सर्व सामान्य व्यक्तीला सुद्धा परवडणार आहे. कारण या या पक्षांना कोंबड्या पेक्षा कमी खाद्य लागते. बदकांचे पालन पिंजऱ्यात न करता साचलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये सुद्धा केले तरी चालते कारण त्यांना पाण्यातच बरेचसे खाद्य सापडते. कोंबड्यांपेक्षा बदकांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा जास्त असते.

बदक या पक्षाचे प्रकार :

बदक या पक्षाच्या अनेक प्रजाती व जाती आढळून येतात या जाती भारतात तसेच विदेशात सुद्धा आढळून येतात. त्यापैकी पाळीव बदकांच्या 18 जाती आणि 34 प्रजाती आढळून येतात. हे सर्व दक्षिण अमेरिकेतील मस्कोव्हि आणि उत्तर गोलार्धात मॅलार्ड या रानटी बदकांच्या दोन जातीपासून उत्पन्न झाले आहेत.

नॉर्थेर्ण पेनटेल बदक : या बदकाच्या प्रजाती हा भारतामध्ये आढळून येतात. या प्रकारचे बदक हे धरणांमध्ये तलावांमध्ये तसेच मुखेड आणि गोड्या पाण्याच्या तलावा नदीच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तसेच हे त्यांचे आवडते ठिकाण आहे. हे बदक राखाडी रंगाचे असून त्यांच्या पंखावर काळ्या रंगाची शेड असतात या पक्षांची शेपूट एकदम टोकदार असल्यामुळे या बदकाला पिनटेल असे नाव पडले आहे. या बदकाच्या मानेचा थोडासा भाग आणि डोक्याचा भाग तपकिरी रंगाचा असतो या बदकाचे वजन एक किलो ते दीड किलोपर्यंत असते.

इंडियन स्पॉट बिल बदक : इंडियन बॉडी बदक ही पक्षी स्थलांतरित नाही किंवा हे पक्षी दुसरीकडे प्रवास सुद्धा करीत नाहीत. हे भारतातील स्थानिक बदल आहेत. या प्रकारचे बदक हे भारतीय उपखंडात गोड्या पाण्यात असे ओल्या जागेत आढळून येतात. इंडियन स्पॉट बिल बदक हे भारतातील सर्वसामान्य बदकांची एक प्रजाती आहे.

हे बदक जिथे राहतात त्यांना तेथे जर अन्न, निवारा आणि व्यवस्था चांगले वातावरण मिळाले तर त्यांची राहण्याची जागा सारखी बदलत नाही हे त्याच ठिकाणी वास्तव्य करतात. या पक्षांचे शरीर हे पांढरे आणि काळ्या रंगाचे असून त्यावरती पांढऱ्या रंगाचे असते. या पक्षांच्या चोचीचे टोक पिवळ्या रंगाचा असते आणि चोच काळ्या रंगाचे असते. दोन्ही डोळ्याजवळ लाल रंगाचा स्पॉट असतो. या पक्षाचा आकार 55 ते 65 सेंटिमीटर एवढा असतो, त्यांचे पंख 85 ते 95 सेंटीमीटर लांब पसरतात. या पक्षांचे वजन 700 ते 1500 ग्रॅम असते.

टफ्टेड बदक : या बदकाला मराठीमध्ये शेंडी बदक या नावाने ओळखले जाते. ही बदकाची एक छोटी प्रजाती आहे. या बदकाचा रंग काळा असतो तसेच त्यांच्या पंखाच्या मधला भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि या पक्षाच्या डोक्यावर पाठीमागे काड्या रंगाची शेंडी असते. हे पक्षी पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच या पक्षांना थंड पाण्यामध्ये किनारपट्टीची सरोवर किंवा दलदलीच्या प्रदेशांमध्ये राहायला खूप आवडते आणि तिथेच हे पक्षी राहतात.

माल्लार्ड बदक : मालार्ड हे बदक दिसायला इंडियन स्पॉट बिल बदकांसारखे असतात आणि हे पक्षी कमीत कमी दहा वर्षांपर्यंत जगतात. यामध्ये नर आणि मादी दिसायला थोडे वेगळे दिसतात. नर बदकाचे डोके चमकदार हिरव्या रंगाचे असते आणि पंख दुसर असतात. तर मादी बदकाचा पिसारा तपकिरी रंगाचा असतो.

हे पक्षी भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या पक्षांना ओल्या प्रदेशांमध्ये राहायला आवडते. उत्तर काश्मीरमध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये हे पक्षी आढळून येतात. त्या व्यतिरिक्त भरतपूर पक्षी अभयारण्यामध्ये सुद्धा यांच्या संख्या खूप मोठ्या आहेत.

गारगने बदक : ही प्रजाती ह्या स्थलांतरित आहेत आणि हे बदक हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भारतात प्रवेश करतात. मुख्यतः हे पक्षी संत्रांगाची झील येथे मोठ्या संख्येने आढळून येतात. त्या व्यतिरिक्त आशिया आणि युरोपमध्ये सुद्धा या पक्षांच्या प्रजाती आढळून येतात. गारगाने हा बदक दुसऱ्या बदकाच्या तुलनेत खूप छोटा असतो.

FAQ

बदक या पक्षाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

बदक या पक्षाला इंग्लिश मध्ये डक म्हणतात.

बदका पासून काय मिळते?

बदका पासून अंडी आणि मास मिळते.

बदक कोठे राहतात?

बदक हे पाण्यात आणि पाण्याजवळ राहतात.

बदक ही पक्षी काय खातात?

बदक हे पक्षी बेडूक, मासे, शेवाळ इत्यादी खातात.

बदकांचा अंड्यांचा रंग कोणता असतो?

बदकांची अंडी सर्वसाधारणपणे पांढरी असतात; परंतु काही प्रजातींमध्ये फिकट हिरवी आणि निळी अंडी असतात.

Leave a Comment