संगणक विषयी संपूर्ण माहिती Computer Information In Marathi

Computer Information In Marathi कंप्यूटर हे एक संगणकीय उपकरण आहे, जे आपण प्रदान केलेल्या गणितीय आणि तारखीक कार्यक्रमांची एक स्वयंचलित मालिका पूर्ण करू शकते तसेच संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, जे वापरकर्त्यांद्वारे इनपुट केलेल्या डेटावर प्रक्रिया करते आणि ती माहिती आपल्याला आउटपुट करते. हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. जे वापरकर्त्यांनी प्रदान केलेल्या आदेशांची अंमलबजावणी करते व यामध्ये डेटा पुनर्प्राप्त प्रक्रिया व संग्रहित करण्याची क्षमता असते.

Computer Information In Marathi

संगणक विषयी संपूर्ण माहिती Computer Information In Marathi

आजकाल संगणकाचा वापर प्रत्येक ठिकाणावर केला जात आहे म्हणजेच आजच्या युगामध्ये संगणक हे अतिशय महत्त्वाचे असे साधन बनलेले आहे. मग ते शाळा असो कॉलेज असो रुग्णालय, ऑफिस किंवा प्रयोगशाळा या ठिकाणी सुद्धा संगणक मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आजच्या या आधुनिक युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला तर संगणकाची माहिती खूपच गरजेचे आहे कारण आजकाल कम्प्युटरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे. आज आम्ही तुमच्याकरिता कम्प्युटर विषयी माहिती घेऊन आलो आहोत जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असेल तर चला मग कम्प्युटर विषयी माहिती पाहूया.

संगणक म्हणजे काय?

संगणक म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे माहितीची देवाणघेवाण करण्याचे एक यंत्र होय. संगणक हे मानवाने तयार केलेले एक विद्युत स्वयंचलित यंत्र असून ते माहिती घेते व त्यावर प्रक्रिया करते व आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने जलद व अचूक उत्तर देते तसेच ती माहिती सुद्धा साठवून ठेवते, यालाच आपण संगणक असे म्हणतो. संगणकामध्ये माहितीवर जर आपल्याला प्रक्रिया करायचे असेल तर त्यामध्ये आपण बदल सुद्धा करू शकतो.

संगणकाचे भाग :

संगणकामध्ये वेगवेगळे भाग असतात ज्याप्रमाणे मानवी शरीराचे काही भाग असतात. तसेच कम्प्युटरमध्ये सुद्धा त्याचे भाग असतात. ते म्हणजे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस हे सर्व आपण हाताने स्पर्श करू शकतो. त्यामुळे याला हार्डवेअर असे म्हणतात. तर त्या व्यतिरिक्त प्रोग्राम सॉफ्टवेअर इत्यादी भाग सुद्धा असतात.

जे आपण स्पर्श करू शकत नाही, त्याला आपण संगणक सॉफ्टवेअर असे म्हणतो. त्याव्यतिरिक्त कम्प्युटरला मदरबोर्ड मेन सर्किट, सीपीयू, रॅम, हार्ड डिव्हाइस, ग्राफिक्स कार्ड सुद्धा जोडले जातात. तसेच कम्प्युटरला कॅमेरा, स्कॅनर, स्पीकर, प्रिंटर मॉनिटर, टच पॅड असते.

संगणकाचा इतिहास :

संगणकाचा इतिहास खूप जुना आहे. संगणकाचा शोध दोन हजार वर्षांपूर्वी लागला होता असे वैज्ञानिक आपल्याला सांगतात. जगातील सर्वात पहिले संगणक हे अबॅकस आहे. हे संगणक लाकडापासून तयार झाले होते किंवा लाकडापासून बनवले होते. गणितीय क्रिया करण्यासाठी याचा वापर तेव्हा करत होते. सतराव्या शतकापासून कंप्यूटर हा विकसित होत गेला व त्यामध्ये अनेक तांत्रिक प्रगती व विकास होउन तसेच अत्याधुनिक संगणक निर्माण झाला.

19 व्या शतकामध्ये गणित तज्ञ चार्ल्स बॅबेज एनालिटिकल इंजिनचा निर्माण केलं. हे पहिले यांत्रिक संगणक होते परंतु ते निधी अभावी कधीही बांधले गेले नाही व नंतर दुसऱ्या शतकामध्ये काही शास्त्रज्ञांनी आधुनिक संगणक उद्योगासाठी पाया घालणारे पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक तयार केले.

संगणकाच्या पिढ्यांमध्ये विकास होत गेला व त्यानुसार संगणकाच्या इतिहासाला सुद्धा पाच पिढ्यांमध्ये विभागले गेले. त्या पिढ्यानुसार जर आपण पाहिले तर सर्व पहिल्या पिढीचा कम्प्युटरचा आकार खूप मोठा होता. त्यामानाने पाचव्या पिढीचा कम्प्युटरचा आकार खूप छोटा आहे. आपण कम्प्युटरच्या पिढ्या पाहूया.

  • कम्प्युटरची पहिली पिढी हे 1940 ते 1956 या काळामध्ये होती, त्याचे नाव व्हॅक्युम ट्यूब Vacuum Tubes असे होते.
  • संगणकाची दुसरी पिढी ही 1956 ते 1963 मानली जाते त्या संगणकाचे नाव Transistors होते.
  • संगणकाची तिसरी पिढी हे 1963 ते 1971 सालामध्ये होती आणि त्याचे नाव इंटिग्रिटेड सर्क्युलर (Integrated Circuits) होते.
  • संगणकाची चौथी पिढी 1971 ते 1980 मानले जाते. तिथे मायक्रोप्रोसेसर (Microprosesor) या कम्प्युटरमध्ये विकास करण्यात आला.
  • आणि कॉम्प्युटरची पाचवी पिढी ही 1980 ते आतापर्यंत चालू आहे. जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स(Artificial Intelligence) म्हणून काम करते.

संगणकाचा शोध कोणी लावला :

संगणकाचा शोध लावणारे अनेक शास्त्रज्ञ आहे कारण शोध लावलेल्या शस्त्रज्ञांचे संगणकामध्ये भरपूर योगदान आपल्या दिसते. त्यामुळे नक्की खरे संगणक कोणी तयार केले यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही परंतु संगणकाला शोधाचे महत्त्व चार्ल्स बॅबेज यांना जाते म्हणून त्यांना संगणकाचे जनक सुद्धा म्हटले जाते. यांनी जगातील सर्वात पहिले इंजिन तयार केले आणि 837 मध्ये कम्प्युटर बनवले.

चार्ल्स बॅबेज यांनी बनवलेल्या इंजिन मध्ये बेसिक स्लो कंट्रोल आणि इंटिग्रेटेड मेमरीचा सिद्धांत सुद्धा वापरला गेला होता. जो आजही याच सिद्धांतावर संगणक बनवली जातात व त्यामुळे चार्ल्स बॅबेज यांनाच कम्प्युटरचे जनक मानले जाते.

संगणक कशा प्रकारे कार्य करते :

आपण पाहिले तर संगणक हे मुख्यतः चार कार्यप्रणालीमध्ये विभागणी गेले आहे, त्यामध्ये कम्प्युटर इन्फॉर्मेशन चार भागांमध्ये विभागली आहे. युजर कडून सूचना घेणे, सूचनेनुसार प्रक्रिया करणे आणि सूचनेनुसार प्रक्रिया केलेल्या डाटा युजरला आउटपुटच्या स्वरूपामध्ये प्रदर्शित करणे व डेटा पुन्हा वापरण्यासाठी साठवून ठेवणे या सर्व क्रियांना अनुक्रमे आपण इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट आणि स्टोरेज असे म्हणतो. म्हणजेच कम्प्युटरची कार्यप्रणाली ही या चार विभागांमध्ये विभागलेली आहे.

इनपुट : जेव्हा युजर संगणकाला सूचना देतो किंवा आदेश देतो, त्यांना इनपुट असे म्हणतात.
जसे आपल्याला जर पेंट सॉफ्टवेअर ओपन करायचे असेल तर आपण सर्वात पहिले सर्च बॉक्समध्ये पेंट टाईप करतो आणि नंतर एंटर करतो म्हणजे संकल्पना पेंट सॉफ्टवेअर ओपन करायचा आपण आदेश देतो, त्यामुळे ते इनपुट प्रोसेस झाले.

प्रोसेसिंग : यामध्ये जेव्हा संगणकाला दिलेल्या इनपुट प्रक्रिया करणे म्हणजेच प्रोसेसिंग करणे जेव्हा प्रिंट एंटर केल्यानंतर संगणक प्रक्रिया करते म्हणजे संगणक स्वतःच्या मेमरीमध्ये पेंट हे स्वप्न आणि ते आपल्यासमोर स्क्रीनवर दाखवते.

आउटपुट : जेव्हा प्रक्रिया झाल्यानंतर सर्व डेटा सीपीयूद्वारे आउटपुट डिवाइसमध्ये ट्रान्सफर केला जातो. आपण उघडलेले पेंट सॉफ्टवेअर आपल्याला एका स्क्रीनवर दर्शविली जाते म्हणजेच प्रिंट हे एक आउटपुट डिवाइस मानली जाते.

स्टोरेज : आपण सर्व माहिती व प्रक्रिया होत आहे. हे आपल्याला कळते त्यासाठी आपल्याला मेमरीची गरज असते, जर आउटपुट द्वारे मिळवताना, डाटा आपल्याला पुन्हा पाहायचा असेल किंवा वापरायचा असेल तर तो मेमरीमध्ये साठवून ठेवला जातो, त्याला स्टोरेज म्हणतात.

संगणकाचे प्रकार :

डेस्कटॉप संगणक : हे कम्प्युटर केवल टेबलावर ठेवले जाणारे होते तसेच याला मॉनिटर माऊस कीबोर्ड हे डेस्कटॉप संगणकाचे पाठ जोडलेले होते. हे चालवण्यासाठी कम्प्युटर माऊस व कीबोर्डचा वापर केला जातो आणि आपल्याला मॉनिटर स्किन वर दर्शवली जाते.

लॅपटॉप : लॅपटॉप चा वापर सर्वजण करतात हे सुद्धा डेस्कटॉप कॉम्प्युटर सारखेच असते. ज्यामध्ये माऊस व कीबोर्डची गरज नसते. कीबोर्ड आणि टचपॅड यामध्ये दिलेले असते तसेच डेस्कटॉपच्या तुलनेमध्ये लॅपटॉप लहान व हलके असते तसेच वापरायलाही सोपे जाते. लॅपटॉपमध्ये बॅटरी असते. ते चार्जिंग केल्यानंतर काही तासासाठी सुद्धा वापरता येते.

टॅबलेट : टॅबलेट हे तर लॅपटॉप पेक्षा सुद्धा आकाराने लहान व स्मार्टफोनपेक्षा मोठे असते. टॅबलेटमध्ये टच स्क्रीन दिलेला असतो. या टच पॅडला इनपुट देण्यासाठी बोटाने टच करावे लागते.

FAQ

कम्प्युटरचा जनक कोणाला मानले जाते?

चार्ल्स बॅबेज याला कम्प्युटर जनक मानले जाते.

संगणकाच्या एक हार्डवेअर चे नाव सांगा.

माऊस.

सर्वात जास्त वापरला जाणारा कम्प्युटर कोणता?

लॅपटॉप.

डेटाचे किती प्रकार आहेत?

चार.

कंप्यूटरचा उपयोग कोठे केला जातो?

शाळा, ऑफिस, रुग्णालय, बँक इत्यादी ठिकाणी कम्प्युटरचा वापर केला जातो.

Leave a Comment