Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. भारताच्या संविधानामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केवळ संविधानामध्येच नाही तर भारतामध्ये अनेक समाजसुधारणेचे कार्य केले आहे. त्यांनी अस्पृश्य व दलित लोकांसाठी चळवळ उभारले तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे सुद्धा समर्थन केले आहे. देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार या नावाने सुद्धा ओळखले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
डॉ. बाबासाहेबांचे जन्म व बालपण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजीराव सपकाळ असे होते. मालोजीराव त्यांचे आजोबा हे इंग्लिश सत्तेच्या काळात सैन्यामध्ये शिपाई होते. त्यामुळे त्यांचे वडील सुद्धा इंग्रजी शाळेमध्ये शिकून सुभेदार झाले. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई सपकाळ असे होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यामुळे ते संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोकोबा, एकनाथ, तुकाराम महाराज, संत कबीर या संतांचे अभंग पाठ सुद्धा करत होते.
रामजी ज्या पलटणीत राहत होते, ती पलटण मध्य प्रदेशामधील महू येथे लष्करी तळावर आली असताना सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक हे पद मिळाले होते. तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. रामजी यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे परिपूर्ण शिक्षण घेतले होते, त्यामुळे भीमराव हे रामजी सपकाळ आणि आई भिमाबाई यांचे चौदावे आपत्य होते. बाळाचे नाव भीमा असे ठेवण्यात आले होते, त्याची भीम, भीमा, भीमाराव अशी नावे बालपणात रूढ झाली.
त्यांच्या बालपणी हे कुटुंब एक अस्पृश्य जातीमध्ये गणल्या जात होते. हे महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यामधील अंबडवे या गावचे रहिवासी होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक व आर्थिक भेदभाव केला गेला.
काही काळानंतर त्यांचे वडील इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले आणि आपल्या मूळ गावी परत आले व ते दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीमध्ये आपल्या कुटुंबासह राहू लागले. भीमराव हे वयाने सर्वात लहान होते. भीमराव पाच वर्षाचे झाले असता त्यांना शाळेमध्ये दाखल केले अशाप्रकारे त्यांचे बालपण होते.
डॉ. बाबासाहेबांचे शिक्षण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पाच वर्षाचे असताना त्यांना सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले. याच वर्षी त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली नंतर 1896 मध्ये गंभीर आजाराने त्यांच्या आईचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर फक्त 5 वर्षाचे होते. त्यानंतर सर्व मुलांचे संगोपन त्यांची आत्या मीराबाई यांनी खूप कठीण परिस्थितीमध्ये केले होते.
1994 मध्ये रामजी सपकाळ त्यांच्या परिवारासह मुंबईला आले, त्यानंतर त्यांनी एलफिस्टन रस्त्यावरील एका सरकारी शाळेमध्ये यांना दाखल केले. तिथे सुद्धा त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून दूर बसवे लागत होते. शाळेमध्ये हिंदू साहित्याची त्यांना ओळख करून दिली गेली. जेव्हा त्यांना तहान लागत असे तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा प्यायला सुद्धा स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती.
आंबेडकर हे त्यांच्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत होते. त्यांनी या स्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा एसएससी रित्या उत्तीर्ण केली. तेव्हा आंबेडकरांचे अभिनंदन करण्यासाठी एक जाहीर सभा भरविण्यात आली व केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्ध चरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली.
पुढे त्यांनी एलफिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला व पुढे चार वर्षांनी मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बीए पदवी घेतली घेतली. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेतील कोलंबीया विद्यापीठांमध्ये गेले. तिथे त्यांनी नोकरी करून घरचे आर्थिक परिस्थिती सुधारली व एमए व पी. एच. डी. हे पदवीत्तर शिक्षण सुद्धा घेतले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी लंडनमध्ये घेण्याचे ठरवले.
त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये तेथे प्रवेश घेतला. त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा कालावधी संपल्यामुळे अर्धवट शिक्षण लंडन सुनील परत यावे लागले. नंतर अर्धवट राहिलेले शिक्षण करण्यासाठी त्यांनी 1920 मध्ये लंडन येथे प्रवेश घेतला. एम.एस.सी.च्या पदवीसाठी विद्यापीठांमध्ये एक शोध निबंध प्रस्तुत केला. तिथूनच त्यांना बॅरिस्टर कायद्याची पदवी सुद्धा मिळाली नंतर त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीसाठी लंडन विद्यापीठांमध्ये पुन्हा प्रवेश घेतला. काही काळाने त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी सुद्धा प्राप्त केली.
डॉ. बाबासाहेबांचे वैयक्तिक जीवन :
भीमरावांचे लग्न हे 1960 साली रमाई यांच्यासोबत झाले तेव्हा भीमरावांचे वय केवळ 14 वर्षे तर रमाईचे वय हे नऊ वर्ष होते. रमाबाईंना बाबासाहेबांनी लिहायला वाचायला शिकवले. रमाबाई व बाबासाहेबांना एकूण पाच अपत्य होती. त्यामध्ये यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू ही मुलगी व राजरत्न . त्यामध्ये चार अपत्य वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच मरण पावली यशवंत हा एकमेव त्यांचा मुलगा होता.
1935 मध्ये दीर्घ आजाराने आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांच सुद्धा निधन झालं. आंबेडकरांनी 15 एप्रिल 1948 रोजी नवी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने डॉ. शारदा कबीर यांच्याशी लग्न केले. तेव्हा बाबासाहेबांचे वय 57 वर्ष तर शारदा तिचे वय 39 वर्षे होते. विवाह नंतर शारदा कबीरांनी त्यांचे नाव सविता असे स्वीकारले व लग्नानंतर पूर्वीच्या शारदा नावावरून आंबेडकर त्यांना प्रेमाने शारू या नावाने हाक मारत असत. सविता आंबेडकर यांना मात्र कोणतेही अपत्य नव्हती.
यशवंत यांचा विवाह मीरा यांच्याशी झाला. त्यांना एकूण चार अपत्य होती. प्रकाश रमाबाई भीमराव व आनंदराज प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांच्याशी झाले असून त्यांना सुजाता एक मुलगा आहे. तर रमाबाईचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक असे आनंद तुंबडे यांच्याशी झाला त्यांना दोन मुले आहेत. भीमरावांना एक मुलगी आहे व आनंदराज यांना दोन मुले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास खूपच खडतड असा होता.
संविधान निर्मितीविषयक कार्य :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष मिळवले. भीमराव आंबेडकरांना शिक्षा, सरकारी नोकऱ्या आणि सिव्हिल सेवांमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांना आरक्षण सुरू केले. त्यांनी संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने व 7 दिवस एवढ्या कालावधी लागला संविधान तयार करून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या काळामध्ये हे संविधान लागू केले.
पुरस्कार आणि सन्मान :
डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न, डॉक्टर ऑफ लिटरेचर व बौद्ध उपध्या प्राप्त झाल्या आहेत. तसेच 20 मार्च हा म्हाडाचा सत्याग्रह दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. टपाल तिकिटे, नाणे, तैलचित्रे द कोलंबस अहेड ऑफ देअर टाईम, ट्विटर इमोजी तसेच समर्पित विशेष दिवस म्हणून बाबासाहेबांना आदर व सन्मान दिला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू :
डॉ. भीमराव आंबेडकर यांना अनेक रोगांनी ग्रासले होते, त्यामुळे त्यांचे आरोग्य हे दिवसेंदिवस खालावत गेले. 6 डिसेंबर 1956 रोजी दीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या घरी दिल्लीमध्ये बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला.
FAQ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते?
महू, मध्य प्रदेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
रामजी मालोजी सपकाळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते?
सविता आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण कोठे घेतले?
अमेरिकेतील कोलंबीया विद्यापीठ
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला?
6 डिसेंबर 1956