संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi

Sant Tukaram Maharaj Information In Marathi महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत होऊन गेले, त्यामुळे महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकामधील महाराष्ट्राच्या भक्त चळवळीतील एक महान संत होऊन गेले.

Sant Tukaram Maharaj Information In Marathi

संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi

संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे संत होते. त्यांनी अनेक अभंग व भक्ती कविता रचल्या तसेच त्यांनी त्यांच्या समाजामध्ये देवाच्या भक्तीसाठी अनेक आध्यात्मिक गाणी सुद्धा गायली आहेत. त्यांनी स्थानिक लोकांना त्यांच्या भाषेमध्ये कीर्तन सांगितले आहे. विठ्ठलाच्या आणि विठोबाला समर्पित अशा कविता त्यांनी रचलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे विचार जगासमोर मांडले आहेत. त्यांच्या मते, संसारिक जीवन जगत असतानाही सामान्य माणूस संत कसा बनतो, मग कोणत्याही जाती, धर्माचा किंवा अमर्याद भक्ती आणि नैतिक तिच्या बळावर आत्मविश्वास कसा साधला जातो हे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट सुद्धा आहेत.

संत तुकाराम महाराज यांचे जन्म व बालपण :

संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1520 या साली पुणे जिल्ह्यातील देहू या गावांमध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबामध्ये विठ्ठलाची पूजा अर्चना प्रचलित होती. त्यामुळे संत तुकाराम महाराज सुद्धा विठ्ठलाचे महान भक्त बनले. त्यांच्या कुळातील सर्वच लोक पंढरपूरची यात्रा नियमितपणे करत असत देहुगावचे सावकार असल्यामुळे त्यांचे कुटुंब तेथे प्रतिष्ठित असे मानले जात होते. संत तुकाराम महाराजांच्या आई कनकाई व वडील बल्होबा असे होते. अशाप्रकारे त्यांची बालपण त्यांच्या आई-वडिलांच्या प्रेमाच्या सावलीखाली गेले.

संत तुकाराम महाराजांचा जीवनप्रवास :

संत तुकाराम यांचा व्यवसाय हा परंपरागत सावकारीचा होता परंतु एकदा दुष्काळ पडला असताना सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून त्यांनी मुक्त केले व जमिनीची गहाण वटीची कागदपत्रे इंद्रायणी मध्ये सुद्धा टाकून दिली. त्यांचे घराणे हे मोरे असून आडनाव अंबिले असे होते. त्यांना मोठा भाऊ सावजी व कान्होबा धाकटा भाऊ होता. संपूर्ण जबाबदारी मात्र तुकोबांवर होती.

तुकोबा हे 18 वर्षाचे असताना त्यांचे वडिलांचे निधन झाले, त्याच वेळी देशांमध्ये भीषण दुष्काळ सुद्धा पडला होता. त्यांची पहिली पत्नी आणि लहान मुल सुद्धा मरण पावले. तुकाराम महाराजांचा विवाह 14 वर्षाचे असताना झाला होता. संत तुकाराम महाराजांचा पहिला विवाह हा लोहगाव येथे पार पडला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुक्मणी असे होते.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये बरेच संघर्ष सहन करावे लागले. त्यांना प्रापंचिक दुःख खूप होते. त्यांना भयंकर दुष्काळाचा सुद्धा सामना करावा लागला. त्यांची गुरेढोरे तसेच त्यांचा व्यवहार सुद्धा डुबला त्यांना संसारात विरक्ती वाटू लागले. ते श्री विठ्ठलावरची त्यांची भक्ती कायम ठेवून देऊ गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना सुरू केली व निरंतर चिंतन त्यांनी केले तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला व परब्रम्ह स्वरूप श्री विठ्ठल यांनी त्यांना दर्शन दिले.

तुकारामांचे वैयक्तिक जीवन :

संत तुकाराम महाराजांचा पहिला विवाह हा लोहगाव येथे पार पडला होता त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुक्मणी असे होते. काही कारणास्तव तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रुक्माई हिचा आकस्मात मृत्यू झाला व तिच्या पहिल्या मुलाचा म्हणजे तुकाराम महाराजांच्या पहिला संतू नावाचा मुलगा सुद्धा याच काळात मरण पावला. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाऊ यांच्याशी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने तिखट होती परंतु सती सावित्री सारखी सज्जन शील होती.

तुकाराम महाराजांना चार मुले होती. त्यांची कन्या भागीरथी व काशी तसेच एक मुलगा नारायण आणि दुसरा मुलगा महादेव अशी त्यांची नावे होती. यापैकी दोन आजाराने मरण पावली होती. तिने संत तुकारामांचा संसार सांभाळला त्यांची विभक्ती सुद्धा तिने सांभाळले संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसून राहिले. ईश्वरांचे त्यांनी चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली होती. संत तुकाराम महाराज स्वतः संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून त्यांनी अभंग वाणी रचली लोक हितार्थ त्यांनी कीर्तने केली.

संत तुकाराम महाराजांची कार्य :

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी मानवी जीवनाला विशिष्ट आकार देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी आपल्या अभंग आणि कीर्तनातून समाज प्रबोधनाची कार्य केले आहे. संत तुकाराम महाराजांनी सामान्य लोकांना अभंगातून व कीर्तनातून ईश्वर भक्तीचा सोपा सरळ मार्ग दाखवला आहे तसेच वारकरी संप्रदायाची एक अखंड अशी परंपरा निर्माण केली आहे. त्यांचे अभंग केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही आज गायले जातात व त्यावर अभ्यास केला जातो.

संत तुकाराम महाराजांचे साहित्य :

संत तुकाराम महाराज आपल्या वाणी मधून व कीर्तनातून लोकांना अनेक प्रबोधनी दिलेत. त्यांच्या संत तुकाराम गाथा अभंग, संत तुकारामांचे चरित्र, संत तुकारामांचा हरिपाठ, संत तुकाराम यांच्या आरती, संत तुकाराम यांचे तीर्थक्षेत्र व संत तुकाराम अभंग गाथा इत्यादी खूप प्रसिद्ध आहेत. संत तुकारामांची भावकविता हेच त्यांचे अभंग होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे हे महान कवी संत होऊन गेले. संत तुकारामांची अभंगवाणी ही भक्ती ज्ञान व वैराग्य यांनी भरलेली आहे. त्यांचे सर्वस्व हे विठ्ठल चरणी अर्पित आहे. म्हणूनच त्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणून ओळखले जाते.

संत तुकाराम यांच्या बाबतीत झालेला चमत्कार

संत तुकाराम महाराज हे एक महान संत होते. तुकारामांचे अभंग खूप आज प्रसिद्ध आहेत. परंतु त्यावेळी बऱ्याच लोकांनी संत तुकाराम महाराजांना त्रास दिला. संत तुकारामांचे अभंग हे इंद्रायणी नदीमध्ये बुडाल्यावर काही दिवसांनी पाण्यावर ते अभंग कोरडे तरंगून आले असे म्हटले जाते.

संत तुकाराम महाराजांचे स्वर्गरोहण

बऱ्याच कथांमध्ये आपण ऐकलं आहे की संत तुकाराम महाराज हे चार वेळा स्वर्गामध्ये गेल्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे महाराज प्रथम स्वर्गामध्ये गेल्यानंतर संताजी जगदाळे या वारकऱ्यांना टाळ दिंडीत येण्यासाठी त्यांनी पुन्हा पृथ्वीवर बोलावले होते. त्यानंतर दुसऱ्या वेळी बारा अभंग लिहिण्यासाठी ते पुन्हा पृथ्वीवर आले आणि तिसरे स्वर्गरोहण झाले तेव्हा शिष्य निळोबाराया आणि कानोबाराय यांना उपदेश करण्यासाठी पुन्हा देहू मध्ये अवतरले होते.

चौथ्या प्रणायानंतर ते भगीरथीसाठी पुन्हा देहू गावी येथे उतरले होते. महाराजांचे चौथे स्वर्गारोहण हे शेवटचे स्वर्गावर होते. चौथ्या प्रणायच्या वेळी महाराज लोकांना स्वतः सांगत होते. “आम्ही जातो आमच्या गावा | आमचा राम राम घ्यावा ||”. म्हणजेच मी चाललोय कृपा असू द्या. माझी विनंती सगळ्या लोकांना सांगा. शेवटच्या कीर्तनाला म्हणजेच फाल्गुन कृष्णपक्ष तृतीयेला संत तुकाराम महाराजांचे स्वर्ग रोहन झाले आणि दुपारी बारा वाजता महाराज वैकुंठाला गेले.

ही बातमी भगीरथीला कळाली यानंतर तिने तुकाराम महाराजांच्या नावाचा जप केला म्हणून महाराज चौथ्यांदा पृथ्वीवर आले होते. त्यामुळे याच दिवशी महाराजांच्या नावाने त्यांच्या नावाचा गजर सुद्धा केला जातो. त्यांच्या नावाने तुकाराम बीज सुद्धा साजरी केली जाते.

FAQ

संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय आहे?

तुकोबा बोल्होबा आंबिले.

संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते?

रुक्मणी.

संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे?

देहू.

संत तुकाराम महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला

तुकारामाची गाथा

संत तुकाराम कोणाचे भक्ती करत होते?

विठ्ठलाची

Leave a Comment