श्री संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती Shri Sant Dnyaneshwar Information In Marathi

Shri Sant Dnyaneshwar Information In Marathi संत ज्ञानेश्वर महाराज हे महान असे संत होऊन गेले आहे. हे एक प्रसिद्ध मराठी कवी सुद्धा होते. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये महान संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायाला महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्व दिले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंदिराला सुद्धा परमार्थाचा कळस लावून अलौकिक पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी “ज्ञानेश्वरी” हा ग्रंथ रचला तसेच अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व हरीपाठाचे अभंग ह्या काव्यरचना त्यांनी रचल्या. जगाला पसायदान दिले आहे. जे खूपच महत्त्वपूर्ण आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ह्या काव्यरचना त्यांचे विठ्ठल व रुक्माई यांच्यावर केल्या आहे.

Shri Sant Dnyaneshwar Information In Marathi

श्री संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती Shri Sant Dnyaneshwar Information In Marathi

संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म व बालपण :

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म 1275 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मधील आपेगाव येथे झाला. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे. त्यांचा जन्म हा श्रावण कृष्ण अष्टमीला झाला होता. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कुलकर्णी घराण्यामध्ये जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत व आईचे नाव रुक्मिणी असे होते. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी असे होते.

ज्ञानेश्वरांची वडील हे आधीपासूनच संन्याशी होते. त्यांनी त्यांच्या संसारी जीवनाचा त्याग करून काशीला निघून जाण्याचा निर्णय घेतला होता; परंतु त्यांच्या गुरूंना जेव्हा समजले की, ते विवाहित असून संन्यासी झाले आहेत. तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना गृहात श्रमात पुन्हा पाठवले व गुरूंच्या आज्ञेचे पालन त्यांनी केले. परत आल्यानंतर त्यांना चार मुले झाली, त्यांची नाव निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी नावे होती.

संत ज्ञानेश्वरांना मोठा भाऊ निवृत्तीनाथ होते व सोपानदेव मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होती. यांच्यासोबत त्यांचे बालपण गेले. विठ्ठल पंत तीर्थयात्रा करत करत आळंदी येथे मुक्कामी येऊन राहू लागले. त्यावेळी संन्यासाची मुले म्हणून या चौघाही भावंडांना लोक बोलत होते. गावातील लोकांनी त्यांना वाडीमध्ये टाकले होते. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना ओळखले जात होते.

ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी सुद्धा नाकारले होते. त्यावर विठ्ठल पंत यांनी एखादा उपाय सांगा म्हणून धर्मशास्त्रींना विचारले, त्यावर केवळ देह दंडाची शिक्षा आहे असे धर्मशास्त्रींनी विठ्ठल पंतांना सांगितले. त्यांची मुले संस्कारापासून वंचित राहू नये म्हणून विठ्ठल पंत व रुक्मिणी यांनी आत्महत्या करून देहांत प्रायचित्त केले.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना व त्यांच्या भावंडांना लोकांकडून खूपच त्रास होत होता त्यांना कोणी अन्न पाणी देत नव्हते. ही भावंडे नंतर पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये शब्दरचना केली भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह भागवत असत. पैठण मधील ब्राह्मण या चौघा भावांची कुशाग्र बुद्धी व शस्त्र ज्ञान पाहून खूप दुःखी होत असतात त्यांनी विचार केला की, आई-वडिलांच्या प्रधानचे दंड मुलांना देणे अन्याय आहे. तेव्हा त्यांना 1288 मध्ये पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ-बहिणी यांना शुद्ध करून पुन्हा समाजात घेतले.

संत ज्ञानेश्वर महाराजांची कार्य :

संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या कृपेने नेवासा या क्षेत्रामध्ये गीतेवर प्रख्यात टीका लिहिली. संत ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली आहे. याच ग्रंथाला ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका असे सुद्धा म्हणतात. त्यांच्या माध्यमातून संस्कृत भाषेचे ज्ञान हे मराठी भाषेमध्ये आणले आहे.

संत ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांना गीतेचे ज्ञान हे सरळ सोप्या रसिक शब्दांमध्ये सांगितले आहे. त्यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला आहे तसेच कर्मयोग ज्ञानयोग व भक्तीयोग अशा सांगणाऱ्या ज्ञानेश्वरी मध्ये 9000 ओव्या त्यांनी सांगितले आहेत. हा ग्रंथ त्यांनी 1290 मध्ये लिहिला.

त्यांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव हा आहे. या ग्रंथामध्ये 800 ओव्या आहेत तसेच हा ग्रंथ तत्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यानंतर चांगदेव पासष्टी हा ग्रंथ सुद्धा त्यांनी दिला आहे. यामध्ये चांगदेवाचे गर्वहरण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उपदेश केला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची जीवन व चमत्कार :

ज्ञानेश्वर महाराजांच्या 21 वर्षाच्या या छोट्याशा आयुष्यामध्ये बरेचशे बद्दल घडलेले आहे तसेच त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक चमत्कार सुद्धा घडवून आणले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांना शुद्ध पत्र मिळवण्याकरता पैठणला गेले असता, त्यांना नाग घाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते. तेव्हा त्यांना शुद्ध पत्र मिळाले. तेथे सुद्धा काळानुसार परंपरेनुसार वसंत पंचमी हा उत्सव साजरा केला जातो व रेड्याच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो.

चांगदेव हा एक महान योगी होते. जो चौदाशे वर्ष जगला असे मानले जाते, परंतु त्याला त्याचा अहंकार होता. जेव्हा चांगदेव हे वाघावर बसून आले तेव्हा संत ज्ञानेश्वर यांनी चांगदेवाला भेटण्यासाठी भिंत चालून नेली व त्यावर तिघे भावांसोबत स्वार होऊन गेले. एकदा संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांना भाकरी करण्यासाठी खापर उपलब्ध झाले नव्हते तेव्हा त्यांनी स्वतः आपल्या पाठीवर भाकरी शेकल्या हा सुद्धा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे.

चांगदेवाचे गर्व हरण.

संत ज्ञानेश्वर महाराज हे संन्याशाची मुलं असताना सुद्धा महान योगी तपस्वी चांगदेव याची त्यांनी गर्वहरण केले चांगदेव हे एक महान योगी व त्यांनी चौदाशे वर्ष तप केले असे मानले जाते परंतु त्यांचा अहंकार तरीसुद्धा गेला नव्हता संत ज्ञानेश्वरांनी त्यावर चांगदेव पासष्टी हा ग्रंथ सुद्धा लिहिला आहे. चांगदेव जेव्हा संन्याशाच्या मुलांना भेटण्यासाठी आपल्या वाघावर बसून गेले तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या तिघा भावांना सोबत चांगदेवाला भेटण्यासाठी भिंत चालून नेली.

अमृतानुभव या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रेदरम्यान ते पंढरपूरला गेले. त्यानंतर त्यांची भेट संत नामदेव यांच्याशी झाली. हे ज्ञानेश्वरांचे सर्वात जवळचे मित्र भरले न्यानेश्वर आणि नामदेव यांनी देशभरात विविध ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली.

ज्ञानेश्वरांच्या अभंग नावाच्या भक्तीरचना सुद्धा याच काळात रचल्या गेल्या असे मानले जाते पंढरपूरवरून परतल्यानंतर ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी ज्ञानेश्वरांना सन्मानित केले. तेथे गोरोबा, सावता माळी, अस्पृश्य असलेली संत चोखोबा सुद्धा सहभागी झाले होते.

संत ज्ञानेश्वराची समाधी :

संत ज्ञानेश्वरांनी भागवत व वारकरी संप्रदायाचा पाया रचला याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. हे सर्व कार्य संपल्यानंतर त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर संजीवनी समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर आणि समाधी घेतल्यानंतर त्यांचे भावंड निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई यांनी सुद्धा त्यांची यात्रा संपवली.

इंद्रायणीच्या काठावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सोहळा कार्तिक वैद्य षष्ठीपासून अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यामध्ये प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा :

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा पालखी सोहळा आषाढ महिन्यात आळंदीवरून दरवर्षी पंढरपूरकडे नेल्या जातो. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. त्यामुळे मंदिराचा कळस सुद्धा हल्ल्याशिवाय माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होत नाही.

FAQ

संत ज्ञानेश्वराची पूर्ण नाव काय आहे?

श्री ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी.

संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय?

संत मुक्ताबाई

संत ज्ञानेश्वरांच्या जन्म कधी झाला?

श्रावण कृष्ण अष्टमीच्या रात्री शके 1197 मध्ये झाला.

संत ज्ञानेश्वरांनी कोणाच्या मुखातून वेद बोलवला?

रेड्याच्या.

संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण?

संत निवृत्तीनाथ.

Leave a Comment