Dr. Jagdishchandra Bose Information In Marathi जगदीशचंद्र बोस भारतीय डॉक्टर पदवी प्राप्त केलेले जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व वनस्पती शास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्व तज्ञ आहेत. वनस्पती सजीव आहेत की निर्जीव हा शोध जगदीश चंद्र बोस यांनी लावला आहे. त्यांनी एका यंत्राचा शोध लावला, ज्यामुळे वनस्पतीची वाढ मोजली जाते. त्या यंत्राचे नाव क्रेस्कॉग्रफ असे आहे. या यंत्राच्या मदतीने सर्वात प्रथम जगाला अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती उपलब्ध करून देणारे जगदीश चंद्र बोस हे आहेत. त्यांनी वनस्पती सजीव असतात हे सुद्धा सांगितले ज्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना सर ही पदवीसुद्धा दिली होती.
डॉ. जगदीशचंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Dr. Jagdishchandra Bose Information In Marathi
जगदीश चंद्र बोस यांचा जन्म व बालपण :
जगदीशचंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी बंगालच्या डाक्का या जिल्ह्यातील राणीखल या खेड्यामध्ये झाला होता. जगदीश चंद्र बोस यांचा जन्म हा एका उच्च घराण्यामध्ये झाला होता. त्यांचे वडील भगवानचंद्र बसु हे सब डिव्हिजनमध्ये ऑफिसर होते. त्यांची वडिलांची सरकारी नोकरी चांगली होती. त्यांची आई मात्र एक गृहिणी होती.
जगदीश चंद्र बोस हे लहान असताना त्यांच्या वडिलांना वाटले मुलगा काहीतरी बनेल अगदी लहान वयापासूनच जगदीश चंद्र बोस यांना निसर्गा विषयी प्रेम वाटू लागले तसेच त्यांची ती आवड वाढत गेली. त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा असणारी झाडे त्यांना आकर्षित करत होते. प्रत्येक झाडांवरील गोष्टीचे जगदीश चंद्र बोस हे बारकाईने निरीक्षण करत असतात.
सर्व झाड एकत्र का वाढत नाही तसेच सर्व झाडांना सारखी फुले का येत नाहीत? एका झाडाचे पान हिरवे दुसऱ्या झाडाचे पान पिवळे असं का होतं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत होते? त्यामुळे या प्रश्नांमध्ये ते गुंतून राहायचे याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला.
जगदीशचंद्र बोस यांचे शिक्षण :
जगदीशचंद्र बोस यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्याच खेड्यातील शाळेमध्ये घेतले. त्या पुढे शिक्षणासाठी त्यांनी कोलकत्यामधील सेंट झेवियर या शाळेमध्ये प्रवेश घेतला. सेंड झेवियर या महाविद्यालयातून त्यांनी कॉलेजचे सुद्धा शिक्षण पूर्ण केले. पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर तेथील क्राईस्ट चर्च या महाविद्यालयांमधून त्यांनी भौतिक रसायन वनस्पतीशास्त्र व निसर्ग विज्ञानाचा अभ्यास केला तसेच त्यानंतर ते भारतात परत आले.
इंग्लंडमध्ये असताना, त्यांना भौतिक शास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर जगदीश चंद्र बोस यांनी केंब्रिज विद्यापीठातून बीएची पदवी पूर्ण केली आणि लंडन विद्यापीठातून बीएससी ही पदवी प्राप्त केली आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून डी एस सी ही पदवी त्यांनी मिळवली.
जगदीश चंद्र बोस यांचे वैयक्तिक जीवन :
जगदीशचंद्र बोस यांनी इंग्लंडमधून भौतिक रसायन वनस्पतीशास्त्र व निसर्ग विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर भारतामध्ये परतले त्यांनी लंडन मधून बीएससी ही पदवी सुद्धा मिळवली त्यानंतर त्यांनी समाजसेवक अबला बोस यांच्याशी विवाह केला. त्यांनी विज्ञानाच्या प्रसार व प्रचारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी भारतात विज्ञानाच्या आधारे वेगवेगळे शोध लावले तसेच त्यांनी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. विज्ञान क्षेत्रात त्यांनी विकास करून त्या क्षेत्राची ख्याती वाढवली.
जगदीश चंद्र बोस यांचे कार्य :
जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पती विज्ञानमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. जगदीश चंद्र बोस यांनी 1897 मध्ये मायक्रोवेव उपकरणाची सुद्धा त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्या आधी 1885 मध्ये जगदीश चंद्र बोस यांनी रेडिओचा शोध लावला होता. त्यांनी लावलेल्या या महत्वपूर्ण शोधामुळे त्यांना फादर ऑफ रेडिओ सायन्स असे संबोधले जाऊ लागले होते. त्यांनी 1875 ते 1915 मध्ये कोलकत्ता आणि इंग्लंड येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्र हा विषय सुद्धा शिकविला होता.
या काळामध्ये जगदीश चंद्र बोस यांनी विद्युत शक्तीवर संशोधन करून त्यामधील काही नवीन गोष्टी जगासमोर आणल्या होत्या. त्यांनी विद्युत चुंबकीय अंतरंगाचा शोध घेत बॅटरीचा शोध लावला होता. वनस्पती हा जगदीश चंद्र बोस यांचा आवडता विषय होता तसेच वनस्पतींवर विचार करणे आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर निरीक्षण करणे, वनस्पती बद्दल जेवढी माहिती त्यांना घेता येईल तेवढी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न ते करत होते. हा त्यांचा एक छंदच होता.
वनस्पतीचा अगदी बारकाईने अभ्यास करून त्यांनी अनेक प्रश्न पडलेल्याचे उत्तर शोधले तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी वनस्पतीसाठी वेगवेगळ्या उपकरणांची सुद्धा निर्मिती केली.
वनस्पतीची प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करण्यासाठी सुद्धा त्यांनी उपकरण निर्माण केली. डायमेट्रिकल कंट्रक्शन ऑपरेटर्स आणि रेझोनंट रेकॉर्ड्स या दोन यंत्रणांचा त्यांनी शोध लावला.
ही दोन्ही यंत्र थंडी प्रकाश उष्णता विद्युत या घटकांचा वनस्पती व प्राण्यांवर काय परिणाम होतो. हे जाणून घेण्यासाठी उपयोगी पडले वनस्पती श्वसन कसे करतात? वनस्पतीचे हृदयाभिसरण कोणत्या पद्धतीने होते तसेच त्यांची अन्न ने आन प्रक्रिया करणे, निरोपयोगी वस्तूंची निसाराग ही सर्व जगदीश चंद्र बोस यांच्या संशोधनाचे विषय होते. त्यांनी वनस्पतींमध्ये होणाऱ्या हालचालींचे निरीक्षण करून तसेच त्यांच्यामध्ये नियमित होणारे बदल या सगळ्यांची नोंद करून ठेवली.
1917 मध्ये त्यांनी कलकत्त्यात बॉस रिसर्च युनिव्हर्सिटी नावाची संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये त्यांनी शेवटपर्यंत संचालक म्हणून कार्य केले तसेच त्यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये अजब पदार्थ विविध उद्दीपनांना देत असलेल्या प्रतिसादांचे जैव प्रतिसादांशी असलेले सामना याचे निरीक्षण करून प्राणी आणि वनस्पती मधील असलेल्या समान कार्य व रचनांवर संशोधन केले.
जगदीश चंद्र बोस यांचे साहित्य लेखन :
जगदीश चंद्र बोस यांनी त्यांच्या जीवनात बरीच पुस्तके लिहिले आहेत. त्यांची पुस्तके वनस्पतींच्या नसानसांवर लिहिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रोफिजीयोलॉजी, एरितीबिलिटी ऑफ प्लांट्स, मेकॅनिझम ऑफ प्लांट्स, रिस्पॉन्सिओलॉजी ऑफ प्लांट्स, फोटोसिंथेसिस ऑफ प्लांट्स लिहिलीत.
जगदीश चंद्र बोस यांची निधन :
जगदीश चंद्र बोस हे जीव शास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ व पुरातत्त्व होते. त्यांना लहानपणापासूनच वनस्पती विषयी माहिती गोळा करण्याची आवड होती. त्यांनी वनस्पती विषयी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधले तसेच त्यांनी शोध लावले. वनस्पतींवर शोध करण्यासाठी अनेक यंत्रांची निर्मिती केली व अभ्यास केला. त्यांची वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून विज्ञान क्षेत्रात ख्याती आहे. वनस्पती सजीव निर्जीव ह्या संकल्पना सुद्धा त्यांनी जागृत केल्या. वयाच्या 79 व्या वर्षी म्हणजेच 23 नोव्हेंबर 1937 रोजी भारतातील झारखंड मधील गिरीडीह येथे त्यांचे निधन झाले.
FAQ
जगदीश चंद्र बोस यांचा जन्म कधी झाला?
30 नोव्हेंबर 1858 रोजी.
जगदीश चंद्र बोस हे कोण होते?
भारतीय महान शास्त्रज्ञ होते.
जगदीश चंद्र बोस यांनी कशाचा शोध लावला?
जगदीश चंद्र बोस यांनी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र या मध्ये विविध शोध लावले.
जगदीश चंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय होते?
भगवान चंद्र बसू.
चंद्र बोस यांचा मृत्यू कधी झाला?
23 नोव्हेंबर 1937.