भुजंगासनची संपूर्ण माहिती Bhujangasan Information In Marathi

Bhujangasan Information In Marathi आज-कालचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे तसेच या जीवनामध्ये प्रदूषण, नैराश्य, रोग किंवा इतर आरोग्य विषयक समस्या यांना आपल्याला सामोरे जावे लागते तसेच आरोग्याविषयीच्या समस्या पासून जर तुम्हाला वाचायचे असेल किंवा ह्या समस्या कमी व्हाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दररोज योगा करणे गरजेचे असते.

Bhujangasan Information In Marathi

भुजंगासनची संपूर्ण माहिती Bhujangasan Information In Marathi

जर तुम्ही नियमित व्यायाम योगा केला तर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे आजार होणार नाहीत व तुमचे आरोग्य चांगले राहील. योगा ही एक जुनी कला आहे, यामध्ये आपले शरीर मनाशी जोडलेले असते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. ज्याद्वारे शरीरातील सर्व घटक ध्यान आणि विश्रांतीच्या मदतीने मनाशी जोडले जातात. योगाचे अनेक प्रकार आपण पाहिले असेलच त्यामध्ये प्राणायाम, अनलोक, विणलोक, भस्त्रिका, पद्मासन, चक्रासन, सवासन, भुजंगासन, वज्रासन आणि इतर असे काही प्रकार आहेत.

आपले शरीर स्वस्त चांगले राहण्यासाठी व आरोग्य संतुलित राहण्यासाठी आपण दररोज योगा केला पाहिजे. हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आपण बनवून घेतला पाहिजे. दररोज योगा केल्यामुळे शरीर स्वास्थ्य चांगले तर राहतेच तसेच मन आणि बुद्धी सुद्धा चांगली राहते.

शरीरामध्ये रक्ताचा संचार व्यवस्थित रित्या होतो. चांगले विचार करण्याची शक्ती स्मरणशक्ती वाढते व नैराश्य दूर होते. भुजंगासन मराठी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. भुजंगासनामध्ये आपल्याला नागाच्या उभारलेल्या फुलासारखा आपल्या शरीराचा आकार दिसतो. त्यामुळे या आसनाला भुजांगासन असे नाव दिले आहे. या आसनामुळे आपल्या शरीराला काही फायदे व शरीरामध्ये काही बदल होतात ते आपण येथे जाणून घेऊया.

भुजंगासन म्हणजे काय?

भुजंगासन हा एक योगासनाचा प्रकार आहे या आसनाला कोब्रासन किंवा सर्पासन म्हटले जाते. हे आसन एक सूर्यनमस्कार मधीलच प्रकार आहे आणि या योगासनामध्ये श्वासाचे नियमन केले जाते तसेच हे असं नियमित केल्यामुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढते तसेच खांदे, शरीर व मन सुदृढ होते.

भुजंगासनाचे प्रकार :

भुजंगा सणाचे मुख्यता तीन प्रकार पडतात म्हणजेच भुजांगा असतात. हे तीन प्रकारे आपल्याला करता येते.

  1. या आसनासाठी तुम्हाला पोटावर झोपावे लागते. नंतर दोन्ही हात पाठीच्या दिशेला घेऊन पण एकमेकांमध्ये जोडून घ्यावेत. संपूर्ण शरीराचा भार आता उचलून घ्यावा. ही आसनाची कठीण अशी स्थिती आहे कारण हा जमिनीवर न टाकता तुम्हाला संपूर्ण शरीर यामध्ये उचलायचे असते.
  2. या आसनासाठी तुम्हाला सर्वप्रथम पोटावर झोपावे लागते. त्यानंतर तुम्हाला कपाळ ज्या ठिकाणी टाकले आहे. त्याच्या खाली दोन्ही हात घेऊन एकमेकांमध्ये बोट अडकून घ्यावेत. नंतर अलगद तुम्हाला तुमचे शरीर उचलायचे आहे. यामध्ये तुमचे शरीर दोन्ही हाताच्या तुमच्या समोरच्या बाजूला असते.
  3. भुजंगासन क्रमांक तीन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पोटावर झोपावे लागेल. दोन्ही हात छातीच्या खाली समांतर ठेवायचे आहेत. त्यानंतर शरीराचा संपूर्ण भाग उचलायचा आहे, यामध्ये तुमच्या पाठीच्या वरच्या भागाला ताण जाणवतो.

भुजंगासन कसे करावे कृती जाणून घेऊया :

  • भुजंगासन करण्यासाठी आपल्याला पोट जमिनीला टेकून हे आसन करावे लागते, त्यामुळे सर्वप्रथम आपण जमिनीवर पालथे झोपायचे आहे.
  • त्यानंतर हनुटी छातीला टेकवा आणि तुमचे कपाळ जमिनीला टेकवा.
  • त्यानंतर सर्व शरीर हलके करा. हाताचे म्हणजे हातांच्या पंजावर शरीराचा पूर्ण भार देऊन बेंबीपासून ते डोक्यापर्यंतचा भाग हळूहळू वर उचला.
  • त्यानंतर आपल्याला कमरेखालचा भाग अजिबात हलू द्यायचा नाही. नंतर पायाची बोटे आणून जमिनीवर टेकवा.
  • हे आसन केल्यामुळे पाठ आणि छातीमधील भागातील स्नायू व्यवस्थित आणले जातात. तसेच पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्थित ताण पडतो आणि या आसन स्थितीमध्ये श्वास सुद्धा रोखून धरायचा आहे.
  • हे आसन आठ ते दहा सेकंद असे केल्यानंतर हळूहळू श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचे आहे. हे आसन दररोज चार ते पाच वेळा करायचे आहे.

भुजंगासनाचे फायदे :

  • भुजंगासन हे नियमित केल्याने आपले छाती, खांदे, मान आणि तसेच मस्तकाचा भाग हा मजबूत राहतो.
  • या आसनाच्या सरावाने पाठीचे दुखणे व इतर विकार सुद्धा नष्ट होतात.
  • या आसनामुळे पोटाच्या समस्या वारंवार होत नाहीत. पोटावर खूप दाब पडत असल्यामुळे पचनक्रिया व मलाशय विषयीचे त्रास सुद्धा नाहीसे होतात तसे शरीरात उष्णता वाढते .
  • या आसनाच्या नियमित सरावामुळे ज्यांना दम आहे. त्यांचा दम सुद्धा बऱ्याच प्रमाणात कव्हर होतो.
  • स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी सुद्धा हे आसान दररोज केल्यामुळे दूर होतात.
  • या आसनाच्या नित्य सरावाने स्त्रियांचे बिजाषय आणि गर्भाशय सुद्धा कार्यक्षम राहते.
  • हे आसन केल्यामुळे गर्भाशयातील रक्तभिसरण चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे प्रसूती नैसर्गिक रित्या किंवा विनासायास होण्यास मदत होते.
  • हे असं नियमितपणे केल्यास हृदय आणि फुफ्फुस उघडण्यास मदत करते तसेच फुप्पुसांमध्ये रक्त संचय रोखण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचे आहे.
  • हे असं नियमित केल्यामुळे रक्तप्रवाह चांगला वाढतो. तुमच्या हृदयावर थेट परिणाम होत असल्यामुळे नकारात्मक भावना सुद्धा दूर राहतात.
  • हे आसन फिटनेसच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे तसेच तुम्ही हा व्यायाम नियमित केला तर पोटावरची चरबी कमी होते.
  • भुजंग असल्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुद्धा सुरळीत चालते. त्याचबरोबर मुद्रा मानवी शरीरावर अनेक मार्गाने चांगला प्रभाव करते. अशा प्रकारे या आसनाचे अनेक फायदे तुम्हाला होतात.
  • हे आसन नियमित केल्यामुळे मनुष्य तणाव मुक्त राहतो तसेच दिवसभराचा थकवा सुद्धा दूर होतो.

हे आसन कोणी करू नये :

  • भुजंगासन करण्यासाठी काही व्यक्ती अपवाद ठरतात. त्यामध्ये सर्वप्रथम गरोदर स्त्रियांनी हे असं करू नये. तसेच एखाद्या व्यक्तीला पाठीचा किंवा पाठीच्या मणक्याचा, मानेचा त्रास असेल तर त्या व्यक्तींनी सुद्धा हे असं करणे टाळावे.
  • तसेच पोटाच्या खालील भागामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा हा व्यायाम करणे टाळावे.
  • ज्या व्यक्तीला हर्नियाचा त्रास असेल किंवा हर्नियाचे शस्त्रक्रिया झाली असेल अशा व्यक्तीने सुद्धा भुजंग असेल हे करू नये.
  • हा व्यायाम डोकेदुखी असताना करू नये.

FAQ

भुजंगासन हे किती वेळ करावे?

भुजंगासन हे 15 ते 30 सेकंद आणि जास्तीत जास्त दोन मिनिट पर्यंत करायला पाहिजे.

भुजंगासन केव्हा करावा?

भुजंगासन हे तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता. सकाळी केलेले भुजंगासन हे सर्वोत्तम ठरते.

एकूण योगाचे किती अंगे आहेत?

योगाची अष्ट अंगे आहेत, त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.

योग म्हणजे काय?

जेव्हा मन एकाग्र करून ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसून जीव परमात्म्याबरोबर मिलनाची आकांक्षा करत असते, त्यालाच योग असे म्हणतात.

त्रिस्थान योग म्हणजे काय?

उज्जयी प्राणायाम म्हणजे (श्वास घेण्याची तंत्र), ऊर्जा (लॉक किंवा सिल), दृष्टी (फोकस पाहणे)म्हणजे त्रिस्थान होय.

Leave a Comment