डीएमएलटी कोर्सची संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi

DMLT Course Information In Marathi जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये मेडिकलसाठी तयार व्हायचे असेल तर तुमच्या करिता डीएमएलटी हा कोर्स सर्वोत्तम कोर्स आहे. कारण हा कोर्स केल्यानंतर तुम्ही प्रायव्हेट व सरकारी दोन्हीही खात्यांमध्ये नोकरी करू शकता. डी एम एल टी DMLT हा कोर्स एक पॅरामेडिकल कोर्स आहे. हा कोर्स पूर्ण दोन वर्षाचा आहे. या कोर्सचे पूर्ण नाव डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असे आहे. कोणताही विज्ञान शाखेचा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो.

DMLT Course Information In Marathi

डीएमएलटी कोर्सची संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi

हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. डीएमएलटी हा कोर्स घेतल्यानंतर मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते. ज्या लोकांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर करायचा आहे परंतु जास्त खर्च न व्हावा त्यांच्यासाठी हा कोर्स सर्वोत्कृष्ट कोर्स आहे. कारण या कोर्स साठी फी सुद्धा खूप कमी आहे. याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.

डीएमएलटी कोर्स काय आहे?

डीएमएलटी हा कोर्स एक पॅरामेडिकल कोर्स आहे. हा कोर्स पूर्ण दोन वर्षाचा आहे, या कोर्सचे पूर्ण नाव डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असे आहे. कोणताही विज्ञान शाखेचा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो किंवा हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश जास्तीत जास्त वाढताना आपल्याला दिसत आहे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थी झेप मोठ्या प्रमाणात घेत आहेत तसेच हे क्षेत्र सर्वांचे आवडते क्षेत्र बनत चालले आहे.

आजच्या काळामध्ये हा कोर्स खूप लोकप्रिय झालेला आहे कारण यामध्ये विद्यार्थ्यांना सहजपणे कोणत्याही रुग्णालयात पॅथॉलॉजीमध्ये नोकऱ्या उपलब्ध होतात. यात तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय सुद्धा मिळतात. तुम्ही कोणत्याही पॅथॉलॉजी किंवा हॉस्पिटल व हेल्थ केअर सेंटरमध्ये या टेक्निशियन म्हणून सुद्धा काम करू शकता.

हा कोर्स केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालय तसेच संशोधन केंद्र एक लाख तंत्रज्ञान म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. तुम्हाला खाजगी किंवा सरकारी दोन्हीही नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात.

डीएमएलटी अभ्यासक्रमांचा तपशील :

डीएमएलटी हा एक पॅरामेडिकल कोर्स आहे. तसेच याचा अभ्यासक्रम तुम्हाला दोन वर्ष पूर्ण करण्यासाठी लागतो. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोग शाळेची संपूर्ण माहिती दिली जाते. तसेच शरीरातील द्रव पदार्थाच्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना रक्त तपासणी लघवीच्या चाचण्या कशा करायच्या याविषयीची सुद्धा सर्व माहिती मिळते. त्यांचा त्यांना अभ्यास करावा लागतो.

या कोर्समध्ये शरीरातील रोग शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाबद्दल सुद्धा शिक्षण दिले जाते. जर तुम्हाला पॅथॉलॉजीमध्ये मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून पुढे करिअर करायचे असेल तर डीएमएलटी हा कोर्स तुमच्याकरिता सर्वोत्तम कोर्स आहे. याची अभ्यासक्रम आणि पात्रता जाणून घेऊया.

जर तुम्हाला डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी प्रोग्रामिंगमध्ये नाव नोंदणी करायची असेल तर तुम्हाला जीवशास्त्र या विषयात कमीत कमी 50 टक्के गुणांसह बारावी पूर्ण करणे आवश्यक असते. गणित व्यवसाय किंवा कला या विषयात मिळालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकत नाही. तुम्ही जर ठरवले तर तुम्हाला डीएमएलटीमध्ये करिअर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला बारावी सायन्स किंवा जीवशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.

डीएमएलटी अभ्यासक्रमासाठी किती फीज लागते?

डीएमएलटी या अभ्यासक्रमासाठीची लागणारी फी ही महाविद्यालयानुसार बदलते. सरकारी महाविद्यालयांमध्ये खर्च थोडा कमी लागतो. हा कोर्स तुम्ही खाजगी महाविद्यालयात जर केला तर तुम्हाला जास्त खर्च येतो. या कोर्ससाठी साधारणतः वीस हजार ते एक लाख रुपये पर्यंत प्रति वर्ष असा खर्च लागतो. कॉलेज ठरवेल त्यानुसार हीच आकारले जाते.

डीएमएलटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा मिळतो :

डीएमएलटी प्रोग्राममध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्यासमोर दोन मार्ग असतात. पहिला म्हणजे तुमच्या गुणवत्तेच्या आधारावर आणि दुसरा मार्ग म्हणजे प्रवेश परीक्षांच्या आधारावर डीएमएलटी प्रोग्राममधील प्रवेश हा देशातील बहुसंख्य महाविद्यालयांमधील तुमच्या बारावीच्या श्रेणीच्या ग्रेनुसार सुद्धा निर्धारित केला जातो.

एनआयएमएस आणि सरकारी महाविद्यालयांसह अनेक महाविद्यालयांमध्ये तर डीएमएलटी प्रोग्राम मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच ती प्रवेश परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण होणे गरजेचे असते. खाजगी महाविद्यालयातून हा अभ्यासक्रम घ्यायचा असेल तर तुम्ही अभ्यासक्रम घेऊ शकतो परंतु तुम्हाला जर सरकारी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हालाही प्रवेश परीक्षा अनिवार्य असते.

डीएमएलटी आदर्श महाविद्यालय कोणती निवडायची :

आजच्या काळामध्ये पदवी प्रदान करणारे बरेच असे विद्यापीठ आहेत. जर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सर्वात योग्य वाटणारे विद्यापीठ तुम्ही निवडू शकता. तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही महाविद्यालय विषयाची अचूक माहिती गोळा करणे गरजेचे आहे.

तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहात. त्या विद्यापीठाविषयीची माहिती गोळा केल्यानंतर तेथे प्रॅक्टिकल लॅब उपलब्ध आहे किंवा नाही तसेच इतर सुविधा तिथे तुम्हाला उपलब्ध होतात की नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे.

हा अभ्यासक्रम सर्वोत्तम पूर्ण करणारी काही विद्यापीठांची नावे खालील प्रमाणे आहेत.

  • अमृतसरचे आदर्श पॅरामेडिकल कॉलेज.
  • राजस्थानची आयुष्यमान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड नर्सिंग.
  • लखनऊचे ई आर ए मेडिकल कॉलेज.
  • हॉस्पिटल इन्फॉर्मरी गजानन पॅरामिटिकल रायपूर.
  • महाराष्ट्राची आदर्श पॅरामेडिकल संस्था.
  • नागपूरची उत्कृष्ट पॅरामेडिकल संस्था.
  • बरेलीचे रोहील खंड मेडिकल कॉलेज.
  • हरियाणाचे ओम साई पॅरामेडिकल कॉलेज.

डीएम एल टी कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्याकरिता उपलब्ध रोजगार संधी :

डीएमएलटी हा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर नोकरीच्या खाजगी व सरकारी खात्यामध्ये अनेक संधी उपलब्ध असतात. हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही रुग्णालयात किंवा पॅथॉलॉजी लॅब मध्ये सहज नोकरी उपलब्ध होऊ शकते. कोणतेही हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅब, हेल्थकेअर सुविधा आणि युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्ही लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकता.

हा कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सार्वजनिक तसेच व्यवसायिक क्षेत्रात सुद्धा कामाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तुम्ही निवडण्यास सहजपणे अधिक शिक्षण घेऊ शकता आणि डीएमएलटी हा डीएमएलटीच्या पुढील कोर्स सुद्धा घेऊ शकता.

डीएमएलटी पगार :

डीएमएलटी हा कोर्स तुम्ही पूर्ण करून खाजगी संस्थेत जर काम करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला 10,000 ते 15,000 रुपये प्रति महिना कोणत्याही क्षेत्रात मिळू शकतो. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर तेथे तुम्हाला चांगले वेतन मिळेल. जसजसा पुढे पुढे तुमचा कामाचा अनुभव हा वाढत जाईल तसतसे तुमच्या पगार सुद्धा वाढत जाईल.

FAQ

डीएमएलटीचा फुल फॉर्म काय आहे?

डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी.

डीएमएलटी हा कोर्स किती वर्षाचा आहे?

डीएमएलटी हा कोर्स दोन वर्षाचा आहे.

DMLT हा कोर्स कोण करू शकतो?

डीएमएलटी हा कोर्स बारावी उत्तीर्ण तसेच जीवशास्त्र या विषयात 50 पेक्षा जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी करू शकतो.

डीएमएलटी हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध होतात?

तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल, पॅथॉलॉजी लॅब, हेल्थकेअर सुविधा आणि युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्ही लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकता.

डीएमएलटी कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे का?

तुम्हाला जर सरकारी कॉलेजमधून डीएमएलटी कोर्स करायचा असेल तर त्याकरिता प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे, मात्र खाजगी मध्ये कॉलेजनुसार ठरवले जाते.

Leave a Comment