ड्राय फ्रुट्स लाडू मराठी Dry fruits ladoo Recipe In Marathi

ड्राय फ्रुट्स लाडू मराठी Dry fruits ladoo Recipe In Marathi  ड्राय फ्रुट्स लाडू हे काजू, बदाम, पिस्ता अशा प्रकारच्या पौष्टिक साहित्या पासून बनवले जातात. हे खायाला एकदम गोड आणि स्वादिष्ट लागतात. विविध ठिकाणी ड्राय फ्रुट्स लाडू हे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. भारतातील हे सर्वात प्रसिद्ध लाडू आहेत, हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहेत. ड्राय फ्रुट्स लाडू एक पौष्टिक आहार आहे. यामध्ये विविध घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत, हे लाडू हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात बनवले जातात.

आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल ड्राय फ्रुट्स लाडू किती स्वादिष्ट आणि चवदार मिळतात. काही लोकांना ड्राय फ्रुट्स लाडू खूप आवडतात. पण त्याचा परिसरात स्वादिष्ट लाडू मिळत नाही, अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट लाडू कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण ड्राय फ्रुट्स लाडू रेसिपी पाहणार आहोत.

Dry fruits ladoo

ड्राय फ्रुट्स लाडू मराठी Dry fruits ladoo Recipe In Marathi

ड्राय फ्रुट्स लाडूचे प्रकार :

ड्राय फ्रुट्स लाडू हे खायाला स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. हे लाडू विविध प्रकारे बनवले जातात, जसे ड्राय फ्रुट्स लाडू, काजू, बदाम लाडू, शेंगदाणे लाडू, खोबरे लाडू, हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
ड्राय फ्रुट्स लाडू ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

ड्राय फ्रुट्स लाडूच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

ड्राय फ्रुट्स लाडू बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर लाडू बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ड्राय फ्रुट्स लाडू कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

ड्राय फ्रुट्स लाडू तयार करण्यासाठी पहिले सर्व सामुग्री एकत्र करावी लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

ड्राय फ्रुट्स लाडूसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 150 ग्रॅम काजू.
2) 100 ग्रॅम बदाम.
3) 100 ग्रॅम पिस्ता.
4) 100 ग्रॅम खारीक पावडर.
5) 150 ग्रॅम खोबरे.
6) 100 ग्रॅम अंजीर.
7) 1 लहान जायफळ.
8) 150 ग्रॅम गूळ.
9) 100 ग्रॅम तूप.
10) 1 चिमूट वेलची पावडर.

पाककृती :

  • सर्वात प्रथम सर्व साहित्य व्यवस्थित निसून घ्या, नंतर खोबरे बारीक खिसून घ्या.
  • नंतर एक खोल तळाचा पॅन घ्या, गॅस चालू करून त्याला गॅसवरती ठेवा, त्यामध्ये थोडे तूप टाकून गरम करा.
  • प्रथम यामध्ये काजू, पिस्ता आणि बदाम थोडे तुपात भाजून घ्या, थोडे लालसर झाले की लगेच खाली काढून घ्या.
  • नंतर यांत अजून थोडे तूप टाकून, खोबरे भाजून घ्या, भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढा.
  • आता मिक्सर मध्ये काजू, बदाम आणि पिस्ता मध्यम जाडसर बारीक करा. नंतर जायफळची बारीक पावडर तयार करा.
  • नंतर एका भांड्यात खारीक आणि खोबरे मध्यम बारीक करून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • नंतर हे सर्व मिश्रण अंजीर, काजू, बदाम, पिस्ता, आणि खोबरे, खारीक हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • आणि पूर्ण मिक्स करा, आणि यावर बारीक गूळ आणि थोडे तूप टाकून चांगले मिसळून घ्या.
  • नंतर या मिश्रणाचे लहान-लहान मध्यम गोळे तयार करा, गोळ्यावर आपण काजूचे तुकडे लाऊन सजवू शकतो.

आता आपले स्वादिष्ट आणि गोड ड्राय फ्रुट्स लाडू खाण्यासाठी तयार आहेत. आपण एका लहान प्लेटमध्ये घेऊन लाडू खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

ड्राय फ्रुट्स लाडूमध्ये असणारे घटक :

ड्राय फ्रुट्स लाडू हे विविध पौष्टिक पदार्थ पासून तयार केले जातात. म्हणून यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रोटीन,पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्निशियॅम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे घटक आहेत.

फायदे :

ड्राय फ्रुट्स लाडू सेवन केल्याने आपल्याला व्हिटॅमिन बी, लोह यासारखे घटक मिळतात.

जे आपल्या शरीरात नवीन रक्त पेशी आणि हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतात.

यामध्ये असणारे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने हे घटक आपले शरीर निरोगी ठेवतात, व हाड मजबूत ठेवतात.

यातील घटक शरीराच्या महत्वाच्या अवयवांचे योग्य कार्य करण्यास मदत करतात, हे घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

ड्राय फ्रुट्स लाडू हा एक पौष्टिक पदार्थ आहे, आपण हा पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरासाठी जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून ड्राय फ्रुट्स लाडू आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला ड्राय फ्रुट्स लाडू रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment