पनीर पुलाव मराठी Paneer Pulao Recipe In Marathi पनीर पुलाव हे पनीर आणि बासमती तांदूळ पासून बनवली जाते. हा चवीला स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. विविध ठिकाणी पनीर पुलाव वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. हा शुध्द शाकाहारी आणि लोकप्रिय पदार्थ आहे, जे लोक नॉनव्हेज खात नाहीत, त्याचासाठी हा पर्यायी पदार्थ आहे. पनीर हा दुधापासून बनलेला असतो, यामुळे यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि मसालेदार पनीर पुलाव खाण्यासाठी मिळतो. काही लोकांना पनीर पुलाव खूप आवडतो. पण त्याचा परिसरात स्वादिष्ट पनीर पुलाव मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने चवदार पनीर पुलाव कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण पनीर पुलाव रेसिपी पाहणार आहोत.
पनीर पुलाव मराठी Paneer Pulao Recipe In Marathi
पनीर पुलावचे प्रकार :
पनीर पुलाव हा एकदम स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे, पनीर पुलाव वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे पनीर पुलाव, पनीर टिक्का, पनीर मसाला, पालक पनीर, पनीर भुर्जी हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
पनीर पुलाव रेसिपी ही आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
पनीर पुलावच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
पनीर पुलाव तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर पुलाव बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
पनीर पुलाव रेसिपी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
पनीर पुलाव बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.
पनीर पुलावसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 2 वाट्या बासमती तांदुळ.
2) 1 कांदा.
3) 2 गाजर.
4) अर्धी वाटी मटर/वटाणे.
5) 2 ते 3 हिरवी मिरची.
6) अर्धा पाव पनीर.
7) 2 चमचे लसण-अद्रक पेस्ट.
8) 1 चमच हळद.
9) 1 चमच जिरे.
10) 6 ते 7 लवंग.
11) 2 तमालपत्र.
12) तेल, मीठ.
13) 1 चमच लाल मिरची पावडर.
14) थोडी कस्तुरी.
15) थोडी कोथिंबीर.
16) 1 चमच गरम मसाला.
पाककृती :
- सर्वात प्रथम मटर, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि गाजर स्वच्छ धुऊन घ्या, आणि नंतर बारीक चिरून घ्या.
- नंतर तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- नंतर पनीरचे लहान-लहान चौकोनी तुकडे तयार करा, आणि एक कांदा बारीक कापून घ्या.
- आता एक खोल तळाचे भांडे घ्या, ते गॅसवर ठेऊन त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झाले की, यामध्ये जिरे आणि तमालपत्र टाका, जिरे चांगले फुटले की.
- यामध्ये लवंग, दालचिनी टाकून चांगले मिक्स करा, आणि परतवत रहा.
- नंतर यामध्ये बारीक केलेला कांदा, आणि हिरवी मिरची टाका, आणि व्यवस्थित मिक्स करा.
- कांदा चांगला पारदर्शी आणि तपकिरी होऊ द्या. तो पर्यत परतवत रहा.
- कांदा चांगला झाला की, यामध्ये लसन-अद्रक पेस्ट टाका, आणि कच्चा वास निघे पर्यत चांगला बाजून घ्या.
- पेस्ट झाली की, अर्धा वाटी वाटणे, आणि बारीक केलेले गाजर टाका, आणि 2 मिनिट तेलात चांगले होऊ द्या.
- नंतर यामध्ये थोडी कोथिंबीर आणि पुदीना पाने टाका, आणि चांगले मिक्स करून घ्या.
- आता मसाल्याचा सुगंधित वास येणार, तो पर्यत परतवत रहा, मसाला चांगला झाला की,
- यामध्ये भातासाठी आवश्यक तेवढे पाणी टाका, आणि चवीनुसार थोडे मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
- या मिश्रणाला चांगली उकडी येऊ द्या, नंतर यामध्ये बासमती तांदुळ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
- आता मध्यम आसेवर भात 10 मिनिट शिजवून द्या, यावर एक झाकण ठेऊन द्या.
- आता एका भांड्यात पनीरचे तुकडे घ्या, त्यामध्ये मिरची पावडर, मसाला, हळद, थोडे बेसन टाकून चांगले मिक्स करा.
- दुसऱ्या बाजूने गॅसवरती एक पॅन ठेवा, त्यामध्ये थोडे तेल टाकून गरम करा, तेल गरम झाले की, यामध्ये पनीरचे तुकडे टाकून फ्राय करा, पनीर चांगला तपकिरी आणि सोनेरी होईपर्यत फ्राय करून घ्या.
- पनीर चांगला झाला की, एका प्लेटमध्ये काढून ठेवा. 10 मिनिट नंतर आपला भात चांगला शिजला असेल.
आता आपला स्वादिष्ट आणि मसालेदार पनीर पुलाव तयार आहे, आपण एका प्लेटमध्ये भात, आणि त्यावर मसालेदार पनीर घेऊन पनीर पुलाव खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
पनीर पुलावमध्ये असणारे घटक :
पनीर पुलाव हा एक पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये वेग-वेगळे साहित्य वापरले जाते. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, जसे फॅट, चरबी, व्हिटॅमिन, शुगर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने कर्बोदके, फायबर हे सर्व घटक आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
पनीर पुलावमध्ये विविध पौष्टिक घटक आहेत, यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॅट, हे घटक आपले शरीर निरोगी ठेवतात, व आपल्या मासपेशीत वाढ करतात.
यामध्ये असणारे प्रथिने, कर्बोदके, फायबर, लोह हे घटक आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतात.
पनीर पुलाव मधील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
पनीर पुलाव आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
यामध्ये असणारे पौष्टिक घटक, आपल्या शरीरात जास्त प्रमाणत झाले तर आपण आजारी पडू शकतो.
म्हणून पनीर पुलाव आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला पनीर पुलाव रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.