दुधी भोपळ्याचे घारगे मराठी Dudhi Bhoplyache Gharge Recipe In Marathi दुधी भोपळ्याचे घारगे हा पदार्थ दुधी भोपळा, गव्हाचे पीठ आणि गूळ पासून बनवला जातो, हा एकदम स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी दुधी भोपळ्याचे घारगे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. घारगे ही एक पारंपरिक रेसिपी आहे, आपण खूप कमी वेळात चवदार दुधी भोपळ्याचे घारगे घरीच बनवू शकतो. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, यांचा उपयोग नाश्ता म्हणून केला जातो.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार घारगे खाण्यासाठी मिळतात. काही लोकांना घारगे खूप आवडतात, पण त्याचा परिसरात चवदार दुधी भोपळ्याचे घारगे मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट घारगे कशे बनवतात यांची रेसिपी, आता आपण दुधी भोपळ्याचे घारगे रेसिपी पाहणार आहोत.
दुधी भोपळ्याचे घारगे मराठी Dudhi Bhoplyache Gharge Recipe In Marathi
दुधी भोपळ्याच्या घारगेचे प्रकार :
दुधी भोपळ्याचे घारगे हा एक स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे, विविध ठिकाणी दुधी भोपळ्याचे घारगे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. जसे दुधी भोपळ्याचे घारगे, लाल भोपळ्याचे घारगे, भोपळ्याचे भजे, भोपळ्याचे पराठे, भोपळ्याचे वडे, असे अनेक पदार्थ भोपळ्या पासून बनवले जातात, आणि हे सर्व पदार्थ एकदम स्वादिष्ट आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
दुधी भोपळ्याचे घारगे रेसिपी ही आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
दुधी भोपळ्याचे घारगेच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
दुधी भोपळ्याचे घारगे तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर आपण लवकर घारगे बनवू शकतो, यासाठी आपल्याला 1 तास वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
दुधी भोपळ्याचे घारगे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
दुधी भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावे लागतात. यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास 30 मिनिट वेळ लागतो.
दुधी भोपळ्याचे घारगेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 4 वाट्या दुधी भोपळ्याचा खिस.
2) 4 वाट्या गव्हाचे पीठ.
3) 200 ग्रॅम गूळ.
4) 2 चमचे वेलची पावडर.
5) तेल.
6) 1 वाटी सूजी रवा.
पाककृती :
- सर्वात प्रथम दुधी भोपळा व्यवस्थित कापून, त्यातील बिया वेगळ्या काढा, आणि नंतर त्याचे लहान-लहान तुकडे तयार करा.
- नंतर मिक्सर मधून एकदम बारीक खिस तयार करून घ्या, आणि एका भांड्यात काढून ठेवा.
- नंतर एका प्लेटमध्ये गूळ बारीक खिसून घ्या, आणि गव्हाचे पीठ चांगले चाळून घ्या.
- नंतर गॅसवरती एक खोलगट भांडे ठेवा, त्यामध्ये 1 कप पाणी, गूळ आणि दुधी भोपळाचा खिस टाकून गरम करा.
- दुधी भोपळ्याचा खीस चांगल्या प्रकारे शिजवू द्या. भोपळ्याच्या खिसातील कच्चा वास निघे पर्यत शिजवा.
- नंतर यामध्ये थोडी वेलची पावडर टाका, आणि व्यवस्थित मिसळून घ्या, नंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
- आता एका प्लेटमध्ये आवश्यक तेवढे गव्हाचे पीठ आणि थोडा रवा घ्या.
- नंतर यामध्ये आपण तयार केलेले भोपळ्याचे मिश्रण टाका, आणि आवश्यक तेवढे पाणी टाकून.
- चांगले मळून घ्या, आणि एक नरम गोळा तयार करा. पीठाचा गोळा कमीत-कमी अर्धा तास एका कपड्यात गुंडाळून ठेवा.
- यामुळे गोळा चांगला मुरेल आणि आपले घारगे चांगले तयार होतील.
- नंतर गॅसवरती एक कढई ठेवा त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- आता आपले घारगेच मिश्रण तयार झाले असेल, त्याला एकदा पुन्हा चांगले मळून घ्या.
- आणि लहान-लहान गोळे तयार करून गोल पुऱ्या सारखे प्लास्टिकच्या पिशवीवर थोडा पाण्याचा हात घेऊन थापून घ्या.
- नंतर तेल गरम झाले की, त्यामध्ये एक-एक करून घारगे तळून घ्या, घारगे लालसर आणि तपकिरी होये पर्यत चांगले तळून घ्या.
- अशा प्रकारे सर्व घारगे तयार करून घ्या, आणि एका पेपरवरती काढून ठेवा, म्हणजे शिल्लक तेल निघून जाईल.
- आता आपले स्वादिष्ट आणि गोड दुधी भोपळ्याचे घारगे खाण्यासाठी तयार आहेत. आपण एका प्लेटमध्ये घेऊन दुधी भोपळ्याचे घारगे खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
दुधी भोपळ्याच्या घारगेमध्ये असणारे घटक :
दुधी भोपळ्याचे घारगे हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जसे कॅल्शियम, प्रोटीन, चरबी, फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन, शुगर, पोटॅशियम, लोह, प्रथिने, कर्बोदके, फायबर हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
दुधी भोपळ्याचे घारगे सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम सारखे घटक मिळतात.
यामुळे आपल्याला हृदय विकार, शारीरिक थकवा यासारखे आजार होत नाही.
यामध्ये असणारे चरबी, फॅट, व्हिटॅमिन, शुगर हे घटक आपल्या शरीराची आणि मासपेशीची वाढ करतात.
घारगेमध्ये असणारे सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत,
तोटे :
दुधी भोपळ्याचे घारगे हा एक तेलकट पदार्थ आहे, यामुळे आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.
घारगे हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो.
म्हणून दुधी भोपळ्याचे घारगे आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला दुधी भोपळ्याचे घारगे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.