पोहा पापड रेसिपी मराठी Poha Papad Recipe in Marathi पापड ही रेसिपी भारतीय पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे. काळानुसार पापड रेसिपी मध्ये विविध बदल होत गेले. आज पापडाच्या विविध पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच वेगवेगळ्या पदार्थांपासून किंवा धान्यापासून देखील पापड तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये पापड तयार केले जातात. कुरकुरीत पापड खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतात. जेवणात सोबत पापड खाण्याची मजाच काही वेगळी असते. बऱ्याच महिलांना पापड बनवता येत नाही. म्हणून त्यांना बाहेरून पापड विकत आणावी लागतात. परंतु आम्ही तुमच्याकरता खास पापड रेसिपी घेऊन आलो आहोत. जी बनवायला अत्यंत सोपी व कमी खर्चिक आहे. तर चला मग आपण आज पुन्हा पापड या रेसिपी विषयी सविस्तर माहिती पाहूया.
पोहा पापड रेसिपी मराठी Poha Papad Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
पापड तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. एक म्हणजे लाडूची पोळी पापड केली जातात आणि दुसरे म्हणजे वाफेवरचे पोहे पापड देखील केले जातात. पापड या रेसिपीमध्ये पापड हे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. जसे बटाटे पापड, नाचणी पापड, ज्वारी साबुदाणा पापड, पोहे पापड, उडीद पापड अशी बनवली जातात. मिरपुड घातलेले, मिरची घातलेली लसूण घातलेली आणि लाल तिखट घातलेले पापड अशी पापडांची विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. चला मग जाणून घेऊया पोहा पापड या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे?
ही रेसिपी आपण चार व्यक्तींकरता बनवणार आहोत.
पूर्व तयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्व तयारी करता 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
पोहे पापड तयार करण्यासाठी आपल्याला एकूण वेळ हा एक तास लागतो.
या रेसिपी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :
1) दोन कप पोहे
2) चार कप पाणी
3) अर्धा चमचा पापडखार
4) एक चमचा लाल तिखट
5) पाव चमचा हिंग
6) एक चमचा जिरे
7) एक चमचा तीळ
8) चवीनुसार मीठ
पाककृती :
- मटर पनीर रेसिपी मराठी
- सर्वप्रथम पोहे थोडे भाजून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
- पोह्याचे पीठ चाळणीतून काढून घ्या. नंतर पोहे पीठ बाजूला ठेवा.
- नंतर एका पॅनमध्ये थोडे पाणी घेऊन पापडखार, लाल तिखट, हिंग, जिरे व तीळ टाकून पाण्याला छान उकळी येऊ द्या.
- नंतर गॅस बंद करून घ्या. पाण्याचे मिश्रण थोडे थंड झाले की, पोह्याच्या पिठात थोडेसे पाणी घालून थोडे घट्ट पीठ मळून घ्या.
- नंतर पिठाचा एक गोळा घेऊन कोरड्या पिठात घालून रोलिंग बोर्डच्या मदतीने पातळ असे पापड लाटून घ्या.
- अशाप्रकारे सर्वच पापड लाटून घ्या. हे पापड लाटून कमीत कमी दोन दिवस कडक उन्हात ठेवायचे आहेत.
- एक कप पिठापासून साधारण दहा पापड आपण बनवू शकतो.
अशाप्रकारे पोहे पासून आपण पापड तयार करू शकतो.
पोह्यातील पोषक घटक :
पोहा पापड ही एक पौष्टिक रेसिपी आहे. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम यांसारखे पौष्टिक घटक असतात.
फायदे :
पोह्यांमध्ये लोहाचे प्रमाण असते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर लोहाचे प्रमाण कमी झाले असेल तर पोहा पापड खाणे फायद्याचे ठरते. पोहा पापड खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील शरीरामध्ये वाढते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्याचा पापड फायदेशीर असते. पोह्यांमध्ये फायबर आणि लोहाचे प्रमाण स्थिर असतात. साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
आपला शरीराला कार्बोहायड्रेट्सची गरज असते. त्यामुळे आपण पोहा पापड खाऊ शकतो. ज्यामध्ये शरीराला आवश्यक असेल घटक असतात. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, तसेच उत्साह वाटतो.
पोहा पापड आपण सकाळी नाष्ट्यामध्ये किंवा दुपारी जेवणासोबत कधीही खाऊ शकतो.
तोटे :
पोह्यापासून तयार झालेले पापड खाण्यासाठी चविष्ट लागतात; परंतु असे पापड जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास किंवा मळमळचा त्रास होऊ शकतो.
पोह्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त असते, जे आपल्या आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकते. पोहा पापडाचे जास्त प्रमाणात सेवन केले तर उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदय विकार, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल यांची समस्या वाढू शकते.
मित्रांनो तुम्हाला, पोहे पापड रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.