फिश फ्राय रेसिपी मराठी Fish Fry Recipe In Marathi

फिश फ्राय रेसिपी मराठी Fish Fry Recipe In Marathi  फिश फ्राय हे स्वादिष्ट अशी रेसिपी आहे.  जे फिश पासून बनवले जाते, हे एक नॉन व्हेज व लोकप्रिय खाद्य आहे.  फिश वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते.  उकडून व भाजून सुध्दा फिश बनवली जाते.  यापैकी फ्राय केलेली फिश ही खूप स्वादिष्ट असते.  आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल, स्वादिष्ट व कुरकुरीत फिश आपल्याला खायला मिळते.  फिश फ्राय हे मोठ्या शहरात जास्त उपलब्ध असते.  पण काही ग्रामीण तसेच शहरात भागात हे मिळत नाही.  काही लोकांना फिश फ्राय खूप जास्त आवडते;  परंतु त्यांच्या जवळच्या भागात फिश फ्राय मिळत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही खास ही रेसिपी घेऊन आलो आहे.  अतिशय सोप्या पद्धतीने हॉटेल सारखी स्वादिष्ट फिश फ्राय कशी बनवतात याची रेसिपी. तर चला मग जाणून घेऊया फिश फ्राय रेसिपी.

 Fish Fry

फिश फ्राय रेसिपी मराठी Fish Fry Recipe In Marathi

फिश फ्रायचे प्रकार :

फिश फ्राय हे सर्वात लोकप्रिय नॉन व्हेज डिश आहे असून खायाला पण स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागते.  फिश फ्रायमध्ये वेग वेगवेगळे प्रकार आहेत.  त्यापैकी फिश फ्राय, साधी फिश फ्राय, मसाला फिश फ्राय, पॉपलेट फिश फ्राय आणि काही ठिकाणी फिश उकडून फ्राय केली जाते, हे सर्व प्रकार खूप स्वादिष्ट आहेत.

फिश फ्रायच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ:

फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते.  नंतर आपण लवकर फिश तयार करू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

फिश फ्राय कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

फिश फ्राय करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते.  नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 40 मिनिट वेळ लागतो.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

फिश फ्राय ही रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

फिश फ्रायसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 किलो फिशचे मध्यम तुकडे.

2) 1 चम्मच लाल मिरची पावडर.

3) 1 चम्मच हळद.

4) 1 चम्मच धनिया पावडर.

5) 2 लिंबू.

6) चवीनुसार मीठ.

7) 1 पाव तेल.

8) 1 चम्मच मसाला.

9 ) थोडा लसन अद्रक पेस्ट.

10) थोडी कॉनफ्लॉवर पावडर.

पाककृती :

 • फ्राईड राईस रेसिपी मराठी
 • सर्वात प्रथम फिशचे तुकडे स्वच्छ धुऊन घ्यावे, नंतर त्यावर थोड मीठ आणि एका लिंबाचा रस टाका, आणि हलक्या हाताने फिश वरती लावा.
 • नंतर थोडे पाणी टाकून 2 वेळा स्वच्छ धुऊन घ्या, असे केल्याने फिश स्वच्छ होते, नंतर फिश एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
 • नंतर एका प्लेटमध्ये लसुन -अद्रक पेस्ट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, धनीया, मसाला, आणि चवीनुसार मिठ घ्या, त्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाका.
 • नंतर यामध्ये थोडी कॉनफ्लॉवर पावडर टाका, यामुळे फिश एकदम कुरकुरीत होते, आता व्यवस्थित मिक्स करून घ्या,
 • थोड पाणी टाकून पेस्ट तयार करा, नंतर स्वच्छ केलेली फिश घ्या.  आणि ही पेस्ट एक एक करून फिशच्या दोन्ही बाजूने लावा.
 • पेस्ट लावून झाली की, तुकडे एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवा.  नंतर एक खोल तळाचा पॅन घ्या.
 • गॅस चालू करून पॅन गॅसवरती ठेवा, आणि त्यामध्ये तेल टाकून गरम करा.  तेल पूर्ण गरम झाले की, गॅस मध्यम आसेवरती ठेवा.
 • नंतर यामध्ये एक एक तुकडा टाकून तळून घ्या, फिश हलक्या हाताने परतून घ्या.
 • फिश पूर्ण लालसर होइपर्यत तळा, एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आहे.
 • फिश लालसर व कुरकुरीत झाले की, एका प्लेटमध्ये काढून घ्या, अशा प्रकारे सर्व फिश फ्राय करा.
 • आता आपली स्वादिष्ट आणि कुरकुरीत फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहे.  आपण याला थोडी बारीक कोथिंबीर आणि थोडा कांदा टाकून एका प्लेटमध्ये सजवू शकतो.

फिश फ्रायमध्ये असणारे घटक :

फिश फ्राय हे एक लोकप्रिय रेसिपी आहे.  यातील फिशमध्ये विविध घटक आहेत, जसे चरबी, कोलेस्टॉल, पोटॅशियम, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, प्रथिने, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

फिश फ्राय खाल्ल्याने आपण निरोगी राहतो.  यामध्ये असणारे घटक कॅल्शियम व प्रथिने आपल्या हाडे मजबूत ठेवतात.

फिश फ्राय खाल्ल्याने आपले डोळे व गुडघे चांगले राहतात, यातून आपल्याला फिश ऑईल मिळते.

चरबी, लोह, व्हिटॅमिन, हे सर्व घटक शारीरिक थकवा दूर करतात आणि शरीराची वाढ करतात.

तोटे :

फिश फ्राय जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला पोटदुखी व मळ मळ होऊ शकते.

यामध्ये जास्त प्रमाणत तेल असते, तसेच यातील पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून आपण फिश फ्राय योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला फिश फ्राय रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment