गोपाळ गणेश आगरकर यांची संपूर्ण माहिती Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi गोपाळ गणेश आगरकर हे एक समाज सुधारक होते तसेच ते खूपच बुद्धिमान व विचारवंत सुद्धा होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये समाज जीवनाची कल्याण व्हावे तसेच अन्याय रूढी व परंपरा यांच्या विरुद्ध कडाडून हल्ले चालवले होते बुद्धीच्या जोरावर अन्न कोणतेही निकष ते मानत नसल्यामुळे त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले होते केवळ स्मृती वचनांचा आधार घेणे हे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सप्तसूत्री त्याचा सारा सामाजिक विचार व्यक्त केलेला आहे त्यामध्ये बुद्धिवाद व्यक्तिवाद समता स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टी आणि अहवाल तसेच मानवतावाद ही ती सप्तसूत्र होती. त्यांनी याच आधारे समाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणल्या तसेच जागृती घडवून आणली.

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

गोपाळ गणेश आगरकर यांची संपूर्ण माहिती Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

नावगोपाळ गणेश आगरकर
जन्म 14 जुलै १८५६
जन्म ठिकाणसातारा जिल्हा टेंभू गाव
वडिलांची नावगणेश राव आगरकर
आईचे नावसरस्वती आगरकर
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
जाती ब्राह्मण
चळवळसमाजसुधारणा
मृत्यू.17 जून 895

गोपाळ आगरकर यांचा जन्म :

आगरकर यांचा जन्म 1 जुलै 1856 या दिवशी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील कराड जिल्ह्याच्या टेंभू या गावांमध्ये झाला होता. त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश राव आगरकर असे होते. तर त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांचे कुटुंब गरीब असल्यामुळे त्यांना शिक्षण यासाठी खूपच कठीण परिश्रम करावे लागले.

आगरकर यांचे शिक्षण :

गोपाळ आगरकर यांना शिक्षणाची खूप ओढ होती, त्यांचे कुटुंब खूपच गरीब असल्यामुळे त्यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा पूर्ण करणे सुद्धा खूप कठीण काम होते; परंतु स्वतःच्या शिक्षणासाठी आगरकरांना मिळेल. ते काम करायचे आणि ही कामे करून त्यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर अकोला येथून 1885 मध्ये मॅट्रिकचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्याच दरम्यान आगरकर कराड समाचार या वृत्तपत्रात लेखन सुद्धा करायला लागले. कराडमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यामध्ये आले.

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचा दाखला नोंदविला आणि 1878 मध्ये त्यांनी बीए ची पदवी घेतली व त्यामध्ये ते उत्तीर्ण सुद्धा झाले. महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंकून आणि शिष्यवृत्ती मिळवून केला. 1879 मध्ये एम ए करताना गणेश आगरकर यांचा परिचय लोकमान्य टिळकांशी झाला आणि 1881 मध्ये इतिहास व तत्वज्ञान या विषयांमधून त्यांनी एम. ए. हे शिक्षण सुद्धा पूर्ण केले.

वैयक्तिक जीवन :

त्यांच्या कुटुंबासोबत राहत असतानाच जेव्हा ते 21 वर्षाचे होते म्हणजेच 1877 मध्ये त्यांचा पहिला विवाह अबूतही फडके यांच्यासोबत झाल्या. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आगरकर यांनी यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह केला होता.

समाज सुधारणा चळवळ :

गणेश आगरकर हे एक थोर समाज सुधारक होते आणि त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून समाजसुधारणेच्या कार्याला प्रारंभ केला होता आणि त्यांचे हे मुलाचे योगदान ठरले आहे. समाजाला अधिक प्रबोधन करण्यासाठी समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत व पत्रकार शिक्षक तज्ञ व समाज सुधारक होऊन गेले आहेत. त्यांनी समाजामध्ये अनेक सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारक केसरी व मराठा या वृत्तपत्रांना आपले शस्त्र बनवले होते.

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी या वृत्तपत्रांचा आधार घेतला होता. समाजातील समूह आणि विषमता तसेच स्त्री पुरुष तुलना स्त्री शिक्षण या सर्व गोष्टी आगरकर यांनी वृत्तपत्रातून समाधान पर्यंत पोहोचविल्या बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा केसरी हे वृत्तपत्र आपल्या सर्वांनाच माहित आहे आणि त्याच वृत्तपत्रांमध्ये सर्वात पहिले संपादक म्हणून गणेश आगरकर हे होते आगरकरणात समाज सुधारण्याची मशाल हाती घेतली होती.

विष्णुशास्त्री यांनी सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल ला प्राधान्य देण्यासाठी आगरकर विष्णू सहस्त्र चिपळूणकर यांना जाऊन मिळाले आणि टिळक आगरकर यांना इंग्रजीतून मराठा आणि मराठी मधून केसरी अशी दोन वृत्तपत्रे सुरु केले होते आणि आगरकर हे केसरीचे संपादक होते. त्यानंतर 1884 मध्ये आगरकरांनी टिळकांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना केली.

पुढील वर्षी त्यांनी याच सोसायटीच्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेज स्थापना केली आणि पुढे कॉलेजचे प्राचार्य म्हणून आगरकरांनी सेवा दिली. त्यानंतर 1888 मध्ये आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुद्धा सुरू केले. आगरकर हे एक असे व्यक्तिमत्व होऊन गेला आहे. जे बुद्धीचा वापर करून आपल्याला पटेल त्याच गोष्टी आपण स्वीकाराव्या. फक्त काही ग्रंथांमध्ये लिहिला गेला आहे म्हणून आपण निर्णय घेणे ही अयोग्य ठरेल असे त्यांचे म्हणणे होते.

ते विज्ञाननिष्ठ होते रूढी परंपरा ऐवजी त्यांचा विज्ञानावर सुद्धा विश्वास होता. प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रीय कारण असे आणि त्यामुळे जुन्या रूढी परंपरांना मान्यता देणे. हे अयोग्य आहे असे त्यांचे मत होते म्हणून त्यांनी समाजात आणि लोकांच्या विचारांचे परिवर्तन व्हावे या निमित्ताने अथक प्रयत्न सुद्धा केले आहे. त्यांनी वृत्तपत्रातून अनेक लेख लिहून आपल्या मत समाजासमोर मांडले. गणेश आगरकर यांच्या विचारावर जॉन स्टुअर्ट मिल आणि हरबट स्पेन्सर यांच्या विचाराचा पगडा होता, त्यामुळे त्यांचे लेख सुद्धा त्यांच्याशी संबंधित पाहायला आपल्याला मिळतात.

पुरस्कार :

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सुधारक गोपाळ गणेश करागरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार 2010 मध्ये डॉक्टर श्रीराम लागू तर 2012 मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री सय्यद भाई यांना देण्यात आला होता तसेच महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था आदर्श पत्रकारितेसाठी गोपाळ आगरकर हा पुरस्कार देते. जो 2012 मध्ये महेश म्हात्रे यांना मिळाला होता.

गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन :

गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजाला नवीन आणि पुरोगामी रूप देण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत तसेच त्यांच्या या विचारवंत आणि समाज सुधारक कार्याचे ख्याती आजही जगप्रसिद्ध आहेत. अशा थोर विचारवंत समाजसुधारकाचे निधन हे 17 जून 1895 रोजी झाले होते. हा एक सूर्याचा अस्त झाला असे मानले गेले, त्यांचा आजार त्यांच्या कार्यामध्ये आला आणि त्यांच्या जीवनाची ज्योत मावळली.

आगरकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले. हे तर सर्वांचे भाग्यच होते, त्यांनी घडवून आणलेल्या बदलांचा प्रभाव आजही आपले नाव महाराष्ट्रात सर्वत्र पाहायला मिळते. मुलींना शिक्षणाचा हक्क समाजामध्ये स्त्री पुरुष समानता, बालविवाह, यासारख्या जुनाट्य परंपरा आज बंद झाले आहे आणि त्यांचे श्रेय हे गोपाळ गणेश आगरकर यांना जाते.

FAQ

गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 साली सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले.

सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?

सुधारक हे भारतातील एक वृत्तपत्र होते आणि त्यांचे संपादक हे गोपाळ गणेश आगरकर हे होते.

गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी झाला?

गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी झाला.

गोपाळ गणेश आगरकर कोण होते?

गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील समाज सुधारक, पत्रकार, शिक्षण तज्ञ व विचारवंत होते.

गणेश आगरकर यांनी कोणती चळवळ सुरू केली?

गोपाळ गणेश आगरकर यांनी समाज सुधारणा ही चळवळ सुरू केली.

Leave a Comment