भारत देशाची संपूर्ण माहिती India Country Information In Marathi

India Country Information In Marathi भारत हा देश एक कृषीप्रधान देश आहे तसेच भारत हा देश संपूर्ण जगामध्ये खूपच प्रसिद्ध आहे. भारतातचा भौगोलिक भाग आशिया खंडामधील दक्षिणेकडे आपल्याला वसलेला दिसतो भारत हे जास्त लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे ज्याचा जगात दुसरा क्रमांक लागतो. नैसर्गिक रित्या व सर्व बाजूंनी भारत हा संरक्षित देश आहे. संपूर्ण जगामध्ये समृद्ध आणि संस्कृती तसेच त्याच्या पारंपारिक ऐतिहासिक घटनांसाठी भारत हा देश ओळखला जातो.

India Country Information In Marathi

भारत देशाची संपूर्ण माहिती India Country Information In Marathi

भारत या देशांमध्ये सर्वोच्च शिखर असलेले हिमाचल पर्वत आहे तसेच भारताच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर असून पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. हे तीन महासागर तीन बाजूंनी वेढलेली असून भारत हा एक लोकशाही राष्ट्र आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही हिंदी भाषा बोलते. पण तरीही हिंदी भाषेला मान्यता प्राप्त झालेली आहे तसेच इतर 22 भाषांना सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे. भारताची परंपरा आणि संस्कृती खूप प्राचीन आहे.

जगभरामध्ये त्याचा मान केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये असलेले चांगले शिष्टाचार सभ्यता संवाद परंपरा विधीमूल्य श्रद्धा या सर्व जोपासल्या जातात भारतीय संस्कृती 4500 वर्षापासून सुरू झाली आहे आणि भारताने विज्ञान गणित कला वस्तू कला आयुर्वेद महाकाव्य यामध्ये दिवस जातील तस तशी त्यांनी उत्कृष्ट प्रगती केलेली आहे.

राष्ट्राचे नावभारत
ब्रीदवाक्यसत्यमेव जयते
राष्ट्रगीतजनगणमन
राजधानीनवी दिल्ली
सर्वात मोठे शहरमुंबई
राष्ट्रीय भाषाहिंदी
राष्ट्रपतीद्रोपती मुर्मु
पंतप्रधाननरेंद्र मोदी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशशरद अरविंद बोबडे
राष्ट्रीय चलनभारतीय रुपया

भारताचा भूगोल :

भारतीय देशाचा भौगोलिक दृष्ट्या हिमालय गंगेचे खोरे, वाळवंट, दख्खनचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे. भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धात गोंडवन या महा खंडाचा भाग होता.

दृष्टी बदल झाल्यामुळे पृष्ठ वेगळे झाले व नैऋत्य दिशेला सरकू लागले. साधारणपणे पाच कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले. यामुळे भारताच्या उत्तर व वैशान्य हिमालयाची निर्मिती झाली. भारताला 7,517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी आहे. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा ही सात राष्ट्रांना भेटते. भारताच्या उत्तरेला चीन भूतान आणि नेपाळ आहेत. बांगलादेश आणि बर्मा हे पूर्वेला आहे, पाकिस्तान व अफगाणिस्तान हे पश्चिमेला आहे.

भारताचा इतिहास :

भारत या देशाविषयी आपण बोलायचे म्हटले तर भारत हा देश एक प्राचीन देश मानला जातो. मध्य प्रदेशामधील भीम बेटका येथील पाषाण युगातील भिंती चित्रे भारताच्या मानवी अस्तित्वाचे सर्वात जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराण तत्त्वज्ञानुसार 70 हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला आणि 9000 वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपाची मानवी वस्ती उदयास येऊ लागली तसेच त्यांचे हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये रूपांतर झाले.

इसवी सन पूर्व 3500 च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या संस्कृतीचे सुरुवात ही भारताच्या वायव्य प्रांतात झाली म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली असे मानले जाते.

मोहेंजोदडो व हडप्पा हे उत्खननास सापडलेली शहरे पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच ती मानली जातात.
काही वर्षांपूर्वी इतिहासकारांमध्ये असा समज निर्माण झाला होता की, युरोप व मध्य आशियातून आलेले आर्य लोकांच्या डोळ्यांनी आक्रमणे केली आणि सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतरचा काढा वैदिक काळ सुरू झाला परंतु आता संशोधकाचे असे म्हणणे आहे की, वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा खूप प्राचीन असून वैदिक संस्कृती आणि हडप्पा संस्कृती व मोहेंजोदडोची संस्कृती एकच होती.

सिंधू, सरस्वती नद्यांच्या काठी घडलेल्या घडामोडी या सिंधू संस्कृती व वैदिक काळ होता. यामध्ये सरस्वती नदी ही काळाच्या ओघांमध्ये दृष्टीने बदलांमुळे लुप्त पावली आणि प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान, कच्छ व गुजरात मधून वाहत होती. हे शास्त्रीय पुराणमधील सिद्ध झाले आहे. मध्य वैदिक काळामध्ये सिंधू काठची वैदिक संस्कृती ही गंगेच्या खोऱ्यात पसरली.
तिसऱ्या शतकामध्ये अलेक्झांडरच्या आक्रमणा नंतर भारतामध्ये राजकीय स्थित्यंतरे निर्माण झाली आणि भारतात मुद्देसूत इतिहासाचे येथूनच खरी सुरुवात झाली.

चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्याचा सम्राट अशोकांनी कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी कोरियानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रचार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतातले ग्रीक आक्रमणे झाले.

तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्यांनी भारताच्या बहुतांश भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात जनतेवर दीर्घकाळ राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला आणि पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपात पुनर्बांधणी झाली. त्यानंतर गणित साहित्यशास्त्र तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये भारत पुढे गेला.

भारतीय संस्कृती :

भारतीय संस्कृती खूप प्राचीन संस्कृती मानली जाते. त्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात. एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करतात. भारतामध्ये त्या व्यतिरिक्त विविध खाद्यपदार्थांची रेलचेल नेहमीच असते. त्यासाठी विविध सण तिवाराला तसेच वेगवेगळ्या धर्मातील लोक वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवितात तसेच या पदार्थांचे वैशिष्ट्य खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रदेशानुसार भाषा खाद्यपान व राहणीमान यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो.

भारतीय संस्कृतीचा पगडा विदेशामध्ये लोकांवर सुद्धा आहे आणि विदेशातील लोक भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात. भारतामध्ये दिवाळी, दसरा, होळी, ईद, गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज उत्सव, कृष्णाष्टमी इत्यादी सण दरवर्षी साजरे केले जातात.

राष्ट्रीय घटक :

भारतातील राष्ट्रीय भाषा ही हिंदी मानली असली तरी सुद्धा इतर 22 भाषांना सुद्धा भारतीय भाषांची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, कश्मीरी, मल्याळम, संस्कृत, ओरिया, पंजाबी, सिंधी, तमिळ, तेलुगु, उर्दू, सिंधी, बोलो, मैथिली, संथाली आणि डोंगरी.

भारताचा राष्ट्रीय प्राणी हा रॉयल बेंगॉल टायगर आहे ज्याला पॅंथर टायगर्स असे सुद्धा म्हटले जाते. भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. संपूर्ण भारतामध्ये मोर पाहायला मिळतात. भारताचे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे तर राष्ट्रीय फूल हे कमळ आहे.

भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे सारनाथ येथील अशोक स्तंभ आहे. येथे चार सिंह समूहासमोर बसलेले असून हे भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचे पूर्ण उत्पादन करतात; परंतु भारतीय राष्ट्रगीतामध्ये तीनच सिंह दिसतात. चौथा सिंह लपलेला आहे. खालच्या पट्टी धर्मचक्र आहे, ज्याच्या उजव्या बाजूला बैल आणि डावीकडे घोडा आहे. मुंडक उपनिषदातून घेतलेली “सत्यमेव जयते” हे वाक्य चिन्हाच्या खाली लिहिलेले आहे. भारतीय राष्ट्रीय चिन्ह 26 जानेवारी 1950 रोजी देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी निवडले गेले होते.

FAQ

भारताची प्राचीन नाव काय होते?

भारताला प्राचीन काळापासून अनेक नावे देण्यात आले. त्यामध्ये जम्बुद्वीप भारत खंड हीमवर्ष, भारत वर्ष, आर्यवर्त, हिंद, हिंदुस्तान आणि इंडिया ही नावे आहेत.

भारतात सर्वप्रथम कोण आले?

भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हा अटलांटिक महासागराद्वारे भारतात कालिकत येथे पोहोचला.

भारताचा इतिहास किती जुना आहे?

भारताचा इतिहास लिखित इतिहासात 2500 वर्षांपूर्वीचा असून ही तर पुराव्यानुसार भारतात 70 हजार वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्वात होते असे मानले जाते.

जगात एकूण किती देश आहेत?

जगात एकूण 231 सर्व भूम देश आहेत.

भारत हा कसा देश आहे?

भारत हा कृषिप्रधान व लोकशाही देश आहे.

Leave a Comment