Hockey Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण हॉकी खेळाची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. हॉकी हा एक सांघिक खेळ आहे. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. जगातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक असून अतिशय प्रसिद्ध खेळ आहे .हा खेळ बहुतेक देशांमध्ये खेळला जातो .
हॉकी खेळाची संपूर्ण माहिती Hockey Game Information In Marathi
भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या विविध खेळापैकी हॉकी हा त्यातील एक खेळ आहे. हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी सर्वच लोकांद्वारे खेळला जाणारा खेळ आहे. सर्वात आधी हॉकीची सुरुवात इंग्रजाद्वारे सुरु करण्यात आली होती.
त्याच दरम्यान भारतीय लोकांनी सुद्धा या खेळांमध्ये सहभाग घेतला आणि कित्येक लोकांनी तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सफलता आणि यश प्राप्त केले आहे.मेजर ध्यानचंद यांनी आपल्या भारत देशाचे नाव जगभर रोशन केले. चला तर मग पाहूया हॉकी या खेळाची संपूर्ण माहिती.
हा खेळ 18 शतकात सुरू झाला परंतु 19 व्या शतकात त्याला प्रसिद्धी मिळाली. हा खेळ प्रथम ब्रिटनमध्ये सादर करण्यात आला हॉकी हा काठी आणि हार्ड बोल दरम्यान खेळला जाणारा खेळ आहे. या खेळात साधा चेंडू आणि वाकलेली काठी असायची. हॉकीचा खेळ पर्शियामध्ये ख्रिस्तमध्ये 2000 वर्षांपूर्वी खेळला गेला.
हा खेळ आधुनिक हॉकीपेक्षा वेगळा होता. काही काळानंतर, हा खेळ काहीसा बदलला आणि ग्रीस (सध्याचे ग्रीस) पर्यंत पोहोचला. जिथे तो इतका लोकप्रिय झाला की तो ग्रीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळला जाऊ लागला.
महिला संघांमध्ये हॉकीचा खेळ खेळविण्यात आल्याचा इतिहास तसा अलीकडचाच आहे. पूर्वी ब्रिटिश विद्यापीठांमधून मुलींमध्ये हॉकी खेळली जात होती पण महिलांची हॉकी संघटना ही १९२७ मध्ये सर्वप्रथम स्थापन झाली. मॉस्को येथील ऑलिंपिकमध्ये (१९८०) महिला हॉकी सामने प्रथम घेण्यात आले.
संघ सदस्य | ११ खेळाडू मैदानात |
वर्गीकरण | आउटडोअर |
साधन | हॉकी चेंडू,हॉकी स्टीक |
ऑलिंपिक | १९०८,१९२०,१९२८-सद्य |
हॉकीचा इतिहास काय आहे?
हॉकी असोसिएशनची स्थापना 1886 मध्ये झाली तेव्हा या खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. 1895 मध्ये इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना खेळला गेला. त्यानंतर हळूहळू या खेळाची लोकप्रियता संपूर्ण जगात वाढू लागली आणि बरेच देश या गेममध्ये सामील झाले.
हॉकी हा ऑलिम्पिकपेक्षा जुना खेळ आहे. हा खेळ अरबी, ग्रीक आणि पर्शियन देशांमध्येही खेळला गेला आहे.19 व्या शतकात हा खेळ खूप लोकप्रिय होता. त्यावेळी या खेळाची लोकप्रियता इतकी वाढली की 1908 मध्ये हा खेळ ऑलिम्पिक खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आला.
1908 च्या ऑलिम्पिकमध्ये 6 संघ (आयर्लंड, स्कॉटलंड, इंग्लंड, वेल्स, जर्मनी, फ्रान्स) या गेममध्ये खेळले. काही कारणास्तव हा खेळ 1924 च्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होऊ शकला नाही.
त्यानंतर हॉकी फेडरेशनची स्थापना झाली ज्याला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) असे नाव देण्यात आले. हॉकी हा मोकळ्या मैदानात खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ गवताच्या मैदानावर खेळला जातो.
मात्र, साध्याच्या परिस्थितीत कृत्रिम गवतामुळे ते बंद स्टेडियममध्येही खेळले जात आहे. या खेळाचा एक चांगला खेळाडू होण्यासाठी, शरीराचे पूर्णपणे निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूंकडे खेळाकडे एकाग्रतेसह झटपट आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता असावी.
हॉकी खेळाचे प्रकार
हा खेळ वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे खेळला जातो ज्याप्रमाणे आइसलँड मध्ये आइस हॉकी खेळली जाते. त्याचप्रमाणे फिल्ड हॉकी, टेबल हॉकी, स्लेज हॉकी,आईस स्लेज हॉकी आणि रोड हॉकी हे इतर देशांमध्ये खेळले जातात.
हॉकीचे साहित्य
पांढऱ्या रंगाचा चेंडू, हॉकीस्टिक, हे साहित्य हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आहे. चेंडूचे वजन हे 156 ते 163 ग्रॅम असते. हॉकी स्टीकचे वजन पुरुषांसाठी 737 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे व महिलांसाठी 652 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे .
या खेळात असणाऱ्या गोलकीपरसाठी पॅड, या खेळात प्रत्येक खेळाडू साठी ग्लोव्हज, गोलरक्षकाला डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक असते. चेहऱ्याच्या संरक्षणासाठी मुखवटा आणि गळ्याच्या संरक्षणासाठी त्याने गळपट्टी वापरावी लागते इ. साहित्य लागते.
मैदान
हॉकीच्या मैदानाचा आकार आयताकृती असून मैदानाची लांबी मैदानाच्या व रुंदी पेक्षा अधिक असते मैदानावर 11 खेळाडूंच्या दोन संघांद्वारे खेळला जातो. मैदानाची लांबी 100 यार्ड (91.4 मीटर) आणि रुंदी 60 यार्ड (55 मीटर) आहे
गोल रेषा म्हणजे मध्यरेषेशी समांतर असणाऱ्या अंतिम रेषा क्रीडांगणाच्या बाजूला 100 यार्ड म्हणजे91.40 मी.लांबीच्या रेषा म्हणजेच अंतिम रेषा .
25 यार्ड रेषा – गोल रेषेपासून 25 यार्ड अंतरावर रेषा समांतर असणाऱ्या रेषा
16 यार्ड रेषा म्हणजे गोल रेषेपासून 16 यार्ड म्हणजे 14.40 मी अंतरावर गोल रेषांची समांतर असलेल्या रेषा या रेषा पूर्ण आखलेल्या नसतात .गोल रेषेपासून 16 यार्ड अंतरावर बाजूच्या अंतिम रेशा क्रीडांगणात फक्तब1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर लांबीच्या खुणा असतात .
5 यार्ड रेषा म्हणजे मध्यरेषा आणि 25 यार्ड रेषा यांच्यावर बाजूच्या अंतिम रेषापासून 5 यार्ड म्हणजेच 4.50 मीटर अंतरावर बाजुच्या अंतिम रेशांची समांतर असणाऱ्या 2 यार्ड म्हणजेच 1.80 मीटर लांबीच्या देशा.
गोल म्हणजे दोन्ही गोलरेषांनवर मध्यभागी प्रत्येकी 4 यार्ड म्हणजे 3.66 मीटर रुंदीचे गोल असतात. 2 उभ्या खांबातील अंतर 4 यार्ड म्हणजे 3.66 मीटर असते .खांबाची उंची 7 फूट म्हणजे 2.14 मीटर असते .दोन्ही खांबांवर एक आडवा खांब असतो या खांबांवर बसवलेल्या आडव्या खांबांची टोके उभ्या खांबांच्या बाहेर जात नाही आणि उभ्या खांबाची टोके आडव्या खांबांच्या वर जात नाहीत.
जमिनीपासून आडव्या खांबांच्या खालील भागांची उंची 7 फूट म्हणजे 2.14 मीटर असते.आडव्या व उभ्या खांबांची रुंदी 2 इंच म्हणजे 5 ते 7 सें.मी. व जाडी 3 इंच म्हणजे 5 ते 7.5 सेंटिमीटर असते .खांब लाकडी व चौकोनी असतात त्यांचा आकार गोल नसून त्या खांबाना पांढरा रंग दिलेला असतो .
गोल खांबांच्या पाठीमागे गोल रेषेशी काटकोनात 4 फूट म्हणजे 1.20 मीटर लांबीच्या गोल फळ्या बसवलेल्या असतात त्यांना पाठीमागे जोडणारी 4 यार्ड म्हणजे 3.66 मीटर लांबीची फळी असते .
ही फळी गोलरेषेपासून 4 फूट म्हणजेच 1.20 मिटर अंतरावर असते.त्यांची उंची 18 इंच म्हणजे 46सें. मी. असते . फळ्याच्या आतील भागाला गडद रंग दिलेला असून त्याच्या बाहेरुन जाळे बसवलेले असते.
पेनल्टी स्पोर्ट – गोलाच्या बिंदूतून गोलरेषेपासून 7 यार्ड म्हणजेच 6.45 मीटर लांब अंतरावर केलेली खून तिचा व्यास 6 इंच म्हणजेच 15 सेंटिमीटर असतो. शूटिंग सर्कल – गोलाच्या पुढे 16 यार्ड म्हणजे 14.40 मीटर अंतरावर समांतर अशी 4 यार्ड लांबीची रेषा काढली जाते व दोन्ही गोलखांबांच्या आतील बाजूच्या पुढील कोपऱ्यातून वरील प्रमाणे काढलेल्या रेषेची टोके आणि गोलरेषा यांना जोडणारी 16 यार्ड त्रिज्येने पाव वर्तुळे काढतात.
अशाप्रकारे गोलाच्या पुढे जे अर्धवर्तुळ तयार होते त्याला शूटिंग सर्कल असे म्हणतात. याचा वर्तुळामध्ये समावेश होतो व वर्तुळ रेषेची जाडी 3 इंच असते. शूटिंग सर्कलच्या बाहेर 5 मीटर अंतरावर शूटिंग सर्कलच्या धर्तीवर तुटकतुटक रेषेने सर्कल आखलेले असतात.
कॉर्नर व पेनल्टी कॉर्नर खुणा
कॉर्नर साठी कोपऱ्यावरील निशाण्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 5 म्हणजे 4.50 मीटर अंतरावर खुणा केलेल्या असतात. पेनल्टी कॉर्नर साठी याच्या दोन्ही बाजूंना गोलखंबापासून 10 यार्ड म्हणजेच 9 मीटर अंतरावर गोलरेषेवर आतील बाजूस खुणा केलेल्या असतात .
निशाने – क्रीडांगणाच्या चारही कोपऱ्यांवर निशाने असतात त्यांचा आकार 12 इंच *12 इंच म्हणजे 30 सेंटीमीटर * 30 सेंटीमीटर असा असतो.
काठीची उंची जमिनीच्या वर चार फुटांपेक्षा म्हणजेच 1.20 मीटर कमी नसते आणि 5 फुटांपेक्षा म्हणजे 1.50 मीटरपेक्षा अधिक नसावी. काठी लाकडी असावी काट्यांची टोके टोकदार नसावी गोल करण्यासाठी चेंडू गोलात जाणे आवश्यक आहे. आणि शूटिंग वर्तुळात (अर्धवर्तुळात) आक्रमण करणार्याच्या काठीने त्याला स्पर्श केलेला असावा.
बॉल हा मूळतः क्रिकेट बॉल होता परंतु प्लास्टिक बॉलचा देखील वापर केला जातो.याचा परिघ सुमारे 9 इंच (23 सेमी) आहे. ही काठी साधारणपणे 36 ते 38 इंच (सुमारे 1 मीटर) लांब असते आणि तिचे वजन 12 ते 28 औंस (340 ते 790 ग्रॅम) असते. चेंडूला मारण्यासाठी फक्त काठीच्या सपाट डाव्या बाजूचा वापर केला जाऊ शकतो.
नियम
संघात पाच फॉरवर्ड, तीन हाफबॅक, दोन फुलबॅक आणि एक गोलकीपर असतो. एका खेळामध्ये ३५ मिनिटांचे दोन भाग असतात, त्यामध्ये ५ते १० मिनिटांची विश्रांती असते. कोणाला दुखापत झाल्यासच खेळ थांबवला जातो.
गोलरक्षकला चेंडू पायाने मारण्याची किंवा शरीरासह 30-यार्ड वर्तुळात (डी) थांबवण्याची परवानगी आहे. इतर सर्व खेळाडू फक्त काठीने चेंडू आडवू शकतात. खेळा दरम्यान दुखापतीमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे खेळ थांबला तर दोन्ही पक्षांला दंड आकारला जातो.
जेव्हा खेळाडूंच्या कपड्यांमध्ये चेंडू अडकला तेव्हा सामना पुन्हा सुरू करण्यासाठी सांगितले जाते. चेंडूशी खेळताना खांद्याच्या वर हॉकी उंचावणे हे नियमांच्या विरुद्ध आहे. हॉकी मध्ये हाताने चेंडू थांबू नये हे चुकीचे मानले जाते खेळाडू हॉकी स्टिक शिवाय चेंडू ढकलू शकत नाही
प्रतिस्पर्धी संघाने चुका केल्या किंवा नियम मोडला तर तिथून विरोधी संघाला मोफत हिट दिला जातो. खेळाच्या प्रत्येक भागासाठी एक न्यायाधीश (रेफरी) असतो. जर विरोधी खेळाडूने 25 यार्डच्या आधी नियमांचे उल्लंघन केले तर इतर संघाला पेनल्टी कॉर्नर दिला जातो
जर एखाद्या खेळाडूने गैरवर्तन केले तर त्याला रेफरिने चेतावणी दिली तरी खेळाडूंनी पुन्हा तशी चूक केली तरी त्याला रेफरी खेळा बाहेर काढू शकतो. काठीच्या सपाट टोकाचा वापर चेंडूला मारण्यासाठी असतो.
हॉकी खेळाचे प्रकार
हॉकी खेळण्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. हा खेळ वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे खेळला जातो. ज्याप्रमाणे आइसलँडमध्ये आइस हॉकी खेळली जाते, त्याचप्रमाणे फील्ड हॉकी, टेबल हॉकी, स्लेज हॉकी, आइस स्लेज हॉकी आणि रोड हॉकी हे इतर देशांमध्ये खेळले जातात.
भारतीय हॉकीचे योगदान
भारताने अनेक वर्षांपासून हॉकीच्या खेळात चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे भारताने जगभरात एक विक्रम केला आहे. भारतामध्ये हॉकीच्या या खेळाच्या लोकप्रियतेमुळे, हॉकी क्लबची स्थापना 1886 साली कोलकाता येथे झाली.
त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत हॉकी क्लबही स्थापन झाले. भारतीय हॉकी संघाची ओळख ऑलिम्पिक खेळांमध्ये 1928 मध्ये झाली. या ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ज्यामुळे संपूर्ण जगाने भारतीय हॉकी संघाला ओळखण्यास सुरुवात केली.
भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 11 पदके जिंकली आहेत. भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण तीन सुवर्णपदके जिंकली आहेत.
भारतीय हॉकीला उंचीवर नेणारे काही महान भारतीय खेळाडू, या हॉकीच्या जादूगारांपैकी मेजर ध्यानचंद यांचे योगदान, भारत क्वचितच विसरू शकतो, संपूर्ण जग त्यांच्या खेळापुढे नतमस्तक झाले. जगभरात भारतीय हॉकीला लोकप्रिय बनवण्याचे श्रेय आणि मेजर ध्यानचंद, उधम सिंग, अशोक कुमार, मोहम्मद शाहिद, धनराज पिल्ले, बाबू विमल, गगन अजित सिंग, अजित पाल सिंह.
हॉकी कशी खेळावी?
हॉकी खुल्या मैदानात खेळली जाते, या खेळात प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात.
मैदानाची लांबी सुमारे 92 मीटर आहे, मैदान दोन समान भागांमध्ये विभागले गेले आहे, त्यानंतर दोन्ही संघ वेगळे केले गेले आहेत.या खेळात पंचाने कोणता संघ प्रथम खेळेल हे ठरवण्यासाठी नाणेफेक केली जाते.
एकदा खेळ सुरू झाला की खेळाडूंना खेळाचे नियम पाळावे लागतात.
60 मिनिटांच्या खेळामध्ये अधिक गोल करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते.प्रत्येक संघात एक गोलरक्षक असतो जो प्रतिस्पर्ध्याला चेंडू गोल गोलमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो.
हॉकीसाठी आवश्यक उपकरणे कोणती आहेत
खेळाडूला हॉकी खेळण्यासाठी किट असणे आवश्यक आहे. हॉकी किटमध्ये सॉक्स, हॉकी स्टिक्स, शिन पॅड्स, शोल्डर पॅड्स, गोलकीपर ग्लोव्हज आणि हेल्मेट्स, नेक गार्ड्स, कोपर गाद्या, हॉकी ग्लोव्हज, माउथ गार्ड्स, बॉल इ. हॉकी खेळण्यासाठी खूप मौल्यवान वस्तूंची गरज नाही.
हॉकी खेळण्याचे काय फायदे आहेत
- हॉकी खेळून, खेळाडूच्या शरीराला पूर्ण व्यायाम होतो.
- हॉकी खेळून, खेळाडूला एरोबिक व्यायाम मिळतो ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही फायदा होतो.
- हॉकी खेळल्याने तुमची विचारशक्ती वाढते, तुमच्या एकाग्रतेमध्ये विशेष फायदा होतो.
- हॉकी खेळल्याने स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर निरोगी राहते.
- हा खेळ खेळून खेळाडूच्या शरीरातून जास्त घाम येतो, ज्यामुळे शरीराची घाण दूर होते.
- हॉकी खेळल्याने शरीर जलद राहते, जे आळस दूर करते.
- हा खेळ खेळून खेळाडूच्या शरीराला कधीही चरबी मिळत नाही.
FAQ
हॉकी या खेळाचे भारतीय जनक कोण?
मेजर ध्यानचंद.
महिला हॉकी स्पर्धा कोठे झाली?
ओमन येथील सुलतान काबूस स्पोर्ट कॉम्प्लेक्स.
भारताने पहिला हॉकी विश्वचषक कधी जिंकला?
1975 च्या पुरुष हॉकी विश्वचषकात.
हॉकीचा उगम कोठे झाला
इजिप्त मध्ये.
हॉकी या खेळात किती खेळाडूंचा समावेश असतो?
11 आणि 5 हे पर्यायी खेळाडू असतात. एकूण 16 खेळाडू असतात.