सिंधदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sindhudurg District Information In Marathi

Sindhudurg District Information In Marathi अंगावर आदळणाऱ्या असंख्य लाटा झेलत आणि छत्रपती शिवरायांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत व शिवकालीन इतिहासाच्या देदीप्यमान आठवणी काढीत जलदुर्ग-सिंधदुर्ग-अरबी समुद्रात ताट मानेने उभा आहे. मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास सिंधुदुर्गच्या रूपाने जणू समुद्राच्या लाटांवरच चितारलेला आहे- साकारलेला आहे. या सिंधुदुर्गचे नावच या जिल्ह्याने धारण केले आहे.

Sindhudurg District Information In Marathi

सिंधदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sindhudurg District Information In Marathi

महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग!

कोकणातल्या फणसासारखा गोड आणि रसाळ असा जिल्हा सिंधुदुर्ग!

शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक अश्या सिंधुदुर्ग किल्ल्याला जन्माला घालणारा जिल्हा!

विस्तिर्ण असा समुद्र किनारा लाभलेला हा जिल्हा.नेरूर या ठिकाणी काही शिलालेख आढळुन आले त्या शिलालेखावरून येथे कधीकाळी चालुक्यांची सत्ता होती असे उल्लेख आढळतात.

सिंधुदुर्ग जिल्हा 1999 ला महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा घोषीत करण्यात आला.

कोकणचे गांधी म्हणुन ज्यांना गौरवलं जातं असे अप्पासाहेब पटवर्धन! सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवलीजवळ गोपुरी या ठिकाणी यांचा आश्रम आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1 मे इ.स .1981 साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते नंतर ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले.

किनारपट्टीवरून होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुद्रातून होणाऱ्या आक्रमणापासून किनाऱ्यावर राहणाऱ्या मराठी लोकांचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग च्या किनाऱ्यावर एक किल्ला बांधला होता त्याला “सिंधुदुर्ग किल्ला” असे नाव दिले होते या जिल्ह्याचे नाव हे सिंधुदुर्ग या किल्ल्यावरून नच पडले आहे. अरबी समुद्रा मधील कुरटे बेटावर बसलेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास

इतिहास :

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रवीड राजास द्वारकेहून हुलकावणी देत देत मुचकुंद राजाच्या गुहेत (सह्याद्रीत ) गेले व कालयवनाचा वध झाल्यानंतर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आढळतो.

या जिल्ह्याचा प्राचीन इतिहास थोडाबहुत स्पष्ट करणारे काही शिलालेख अलीकडील काळात सापडले आहेत. वेंगुर्ल्याजवळ मठ या गावात शके १३९७ मधील शिलालेख उपलब्ध मिळाले आहेत. याशिवाय कुणकेश्वर, आजगाव व सातार्डे आदी ठिकणी काही शिलालेख मिळाले आहेत. नेरूर येथे सापडलेल्या चालुक्यकालीन शिलालेखावऊन प्राचीन काळी या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असावी, असे अनुमान काढता येते.

मराठ्यांपूर्वी या परिसरात काही काळ आदिलशाही राजवटही अस्तित्वात होती. आदिलशाही राजवटीत उभारल्या गेलेल्या काही वास्तू याची साक्ष देतात. स्वातंत्र्य चळवळीतही या जिल्ह्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. १९३० मध्ये शिरोडे येथे झालेला मिठाचा सत्याग्रह व १९४२ च्या आंदोलनात जिल्ह्याने घेतलेला सहभाग इतिहासास ज्ञात आहे.

कोकण विभागातील दक्षिण प्रदेशाच्या औद्योगिक व कृषिविकास जलदगतीने व्हावा, म्हणून मूळच्या रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन १ मे १९८१ रोजी महाराष्ट्र दिनाच्या सुमूहुर्तावर सिंधदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक रचना

सिंधुदुर्ग च्या पुर्वेकडे अरबी समुद्र, दक्षिणेकडे कर्नाटक राज्यातील बेळगांव आणि गोवा आणि उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा आहे.121 कि.मी. चा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा या जिल्हयाला लाभलाय.

पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस शुक नदी, पूर्वेस सह्याद्री रांगा व दक्षिणेस तेरेदेखोल नदी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक सीमा स्पष्ट केली आहे. या जिल्ह्यास सुमारे १२१ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगलता आकारमानाचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील सर्वात लहान जिल्हा आहे, असे म्हणता येईल. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १.७० टक्के इतके अत्यल्प क्षेत्र य जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिमेकडील किनारी भागापासून जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी समुद्रसपाटीपासूनची जमिनीची उंची वाढत जाते. किनाऱ्यालगत अतिशय सखल व सपाट असा प्रदेश पसरलेला आहे. याला ‘खालाटी’ अथवा ‘किनारी प्रदेश’ असे म्हटले जाते. सखल-मैदानी प्रदेशाचा उत्तर-दक्षिण लांबी असलेला हा एक अरुंद पट्टा आहे. देवगडा मालवण तालुक्यांचा पश्चिम भाग व बहुतांश वेंगुर्ले तालुका या पट्ट्यात येतो.

खालाटी अथवा किनारी प्रदेशाला लागून डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी असलेला जो काहीसा सपाट पट्टा लागतो, त्याला ‘वलाटी’ अथवा ‘पठारी प्रदेश’ असे म्हणतात. देवगड व मालवण तालुक्यांचा पूर्व भाग आणि कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तालुक्यांचा पश्चिम भाग या विभागात मोडतो.

वलाटी अथवा पठारी प्रदेशाच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या डोंगररांगाचा बऱ्याचशा उंचवट्याचा व दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश पसरलेला आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तालुक्यांचा पूर्वभाग या विभागात समाविष्ट होतो. या डोंगराळ भागातून पूर्वेकडे देशावर उतरण्यासाठी भुईबावडा, करुळ, फोंडा, आंबोली असे अनेक घाट आहेत.

या जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी आंबोली, करूल किंवा फोंडा घाट पार करावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी राजापूरची घाटी उतरावी लागते. या प्रदेशात शिवगड, मनोहरगड यांसारखे प्रमुख दुर्ग वसले आहेत.

नद्या

जिल्ह्यातील बहुतेक नद्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वतरांगाम्तून उगम पावून पश्चिमेकडे वाहात जातात व जवळच असलेल्या अरबी समुद्रास मिळतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम रुंदी कमी असल्याने साहजिकच, या नद्या कमी लांबीच्या आहेत.

उताराच्या व डोंगराळ प्रदेशामुळे य नद्या उथळही आहेत. शुक नदी सह्याद्रीत उगम पावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून तर रत्नागिरि जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहात जाऊन विजयदुर्गच्या खाडीत अरबी समुद्रात मिळते.

वेगळ्या भाषेत सांगावयाचे तर या नदीच्या मुखाशी विजयदुर्गची खाडी तयार झाली आहे, असेही म्हणता येईल. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून होणारा हिचा प्रवास साहजिकच, उत्तरेकडील वैभववाडी, कणकवली व देवगड या तालुक्यांच्याही उत्तर सीमेवरून होतो.

देवगड नदी सह्य पर्वतरांगांत उगम पावून वैभववाडी तालुक्याच्या दक्षिणसीमेवरून वाहात जाऊन कणकवली तालुक्यात प्रवेश करते. तिच पुढील प्रवास कणकवली व देवगड तालुक्यांचा मध्यातून होतो. पुढे ही अरबी समुद्रास मिळते. हिच्या मुखाशी तयार झालेली खाडी ‘देवगडची खाडी’ म्हणून ओळखली जाते.

आचरा नदी कणकवली व देवगड तालुल्यांमधून पूर्व-पश्चिम अशी वाहाते. या नदीच्या मुखाशीही छोटीशी खाडी तयार झाली असून ती ‘आचाऱ्याची खाडी’ म्हणून ओळखली जाते. आचरा नदीला बहुतांशी समांतर अशी गडनदी कणकवली व मालवण तालुक्यांमधून वाहाते. या नदीच्य मुखाशी कालावलीची खाडी आहे.

कर्ली व तिची उपनदी काली कुडाळ तालुक्यातून वाहात गेल्या आहेत. कर्ली नदीच्या मुखाशी ‘कर्लीची खाडी’ आहे. तेरेदेखोल ही जिल्ह्यातील एक प्रमुख नदी असून ती सावंतवाडी तलुक्यात सह्य पर्वताच्या डोंगराळ भागात आंबोली घाटाजवल उगम पावते.

हिचा सुरुवातीचा प्रवास काहीसा ईशन्येकडून नैऋत्येकडे असा होतो. नंतर ती जिल्ह्याच्या दक्षिणे सीमेवरून पश्चिमेकडे वाहात जाऊन पुढे गोवा राज्यात प्रवेशते.

काही अंतर तिने सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्याची सीमा निश्चित केली आहे. कळणा व तिल्लारी या नद्या जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातून वाहात जाऊन गोवा राज्यात प्रवेशतात. पुढे गोवा राज्यात त्यांचा संगम होतो.

धरणे

कुडाळ तालुक्यात कर्ली नदीवर उभारण्यात येणारा ‘ताळंबा’ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प होय. जिल्ह्याची एकूण भौगोलिक रचना लक्षात घेता कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील धरणाचा अपवाद वगळता जिल्ह्यात मोठी धरणे नाहीत.

जिल्ह्यात पाट, धामापूर, खांबाळे, रेडी, आदी ठिकाणी तलाव असून नावळे, कोकिसरे, नाधवडे, ओसरगाव, वरवडे, हरकूळ, माडखोल, वाफोली इत्यादी ठिकाणी नद्यांवर छोटेसे बंधारे उभारण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजकीय संरचना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत ते पुढीलप्रमाणे:-

(१) कणकवली (२) कुडाळ (३) सावंतवाडी (४) वेंगुर्ले (५) मालवण (६) देवगड ७)वैभववडी.

जिल्ह्यात एकूण आठ पंचायत समिती  आहेत

१)दोडामार्ग २)सावंतवाडी ३)वेंगुर्ला ४)कुडाळ ५)मालवण ६)कणकवली ७)देवगड ८)वैभववाडी

नगरपालिका ४आहेत.

१) वेंगुर्ला २)सावंतवाडी ३) मालवण ४)कणकवली

ग्रामपंचायत  एकूण  ४३३,

एकूण गावे ७४३,एकूण शहरे ५,पोलीस स्टेशन ९ अशी रचना आहे.

लोकसंख्या

  • 2011 च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या     8,68,825 एवढी आहे. त्यापैकी
  • पुरुष 4,17,890 व स्त्रिया   4,50,935 अशी गणना आहे. जिल्ह्याचा साक्षरता दर    80.30% असून त्यातील
  • पुरुष 90.30% व स्त्रीया      71.20% असे साक्षरता प्रमाण आहे.
  • घनता 167 प्रती चौ. किमी.असून
  • लिंग गुणोत्तर प्रमान 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 1036 असे आहे.
  • येथील एकूण लोकसंख्येच्या ९१% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते.

हवामान

समुद्रसान्निध्यामुळे जिल्ह्याचे हवामान सम, उष्ण व दमट आहे. समुद्रकिनारा जवळ असल्याने उन्हाळ्यात तापमानात खूप वाढ नाही, तसेच हिवाळ्यातही तापमान खूप खाली येत नाही. तथापि, समुद्रकिनाऱ्यापासून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे हवामान किंचितसे कोरडे व विषम होत जाते.

जिल्ह्यात सरासरी २७५ से.मी. इतका पाऊस पडतो. सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांत वसलेल्या ‘आंबोली’ या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक पावसाची (७४८ से.मी.) नोंद होते. एवम, हा जिल्हा भरपूर पावसाचा जिल्हा असून जिल्ह्यातील एकही तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत नाही.

मृदा

दमट हवामानामुळे व अतिवृष्टीमुळे दीर्घकालीन प्रक्रिया घडून बेसॉल्ट खडकापासून जांभा खडक तयारत होतो. जिल्ह्यातील बहुतांश जमीन अशा प्रकारच्या जांभा खडकापासून तयार झालेली आहे. अतिवृष्टी व दमट हवामान यांमुळे बेसॉल्ट खडकातील सिलिका, कॅल्शियम व मॅग्नेशियम आदी घटकांचा विनाश होतो. परंतु लोहाचे प्रमाण मात्र अधिकच राहाते.

त्यामुळे मृदेचा रंग तांबूस-तपकिरी असतो. जिल्ह्यातील बहुतांश मृदा अशा प्रकारची आहे. डोंगर‍उतारावरील माती व गाल वाहात येऊन त्याचे संचयन झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील मृदा पोयतायुक्त आहे. समुद्र-सान्निध्यामुळे ही मृदा क्षारयुक्तही आहे.

खनिजे

खनिज संपत्तीचा विचार करता समृद्ध जिल्हा. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे लोह खनिज मोठ्या प्रमाणावर सापडते. सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे, नेतर्डे, सासोली तसेच कणकवली खनिज म्हणजे इल्मेनाइट. हे खनिज किनाऱ्यावर अनेक ठिकाणी आढळते. कोमाईट हे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचे खनिज. कणकवली तालुक्यात कोमाईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

सावंतवाडी तालुक्यात आंबोली घातमाथ्यावर बॉक्साईटचे मोठे आहेत. कणकवली व कुडाळ तालुक्यात अभ्रकाचे साठे आहेत. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे लोह-खनिजाच्या खाणी आहेत.

याशिवाय फोंडा घाटाच्या नैऋत्यकडील परिसरात तसेच हनुमंत घाटाच्या क्षेत्रात चुनखडीचे साठे आढळतात. मालवण बंदराच्या पूर्वेस कुंभारमाठजवळ चिकणमाती सापडते. या मातीचा उपयोग मातीची भांडी व कौले तयार करण्यासाठी होतो.

सावंतवाडी कुडाळ, वेंगुर्ले तसेच मालवण किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी विविध रंगछटाचा ‘गेरू’ सापडतो. त्याचा रंगनिर्मितीसाठी उपयोग होतो. मालवण, कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले या तालुक्यात ‘शिरगोळा’ हा दगड सापडतो. या दगडाचा उपयोग रांगोळी तयार करण्यासाठी होतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती व पिके

जिल्ह्यातील एकूण क्षेत्रा पैकी सिंचित क्षेत्र हे 33,910 हेक्टर असून असिंचित क्षेत्र 1,04,390 हेक्टर इतके आहे. तसेच जंगल क्षेत्र हे 38,643 आहे.

सिंधुदुर्ग हा कृषिप्रधान जिल्हा असून भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे.सावंतवाडी, कुडाळ, माळवण, कणकवली हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होत. रागी किंवा नाचणी, वरी, कुळीथ ही जिल्ह्यातील अन्य प्रमुक अन्नधान्य पिके होय.

फळांच्या उत्पादनासाठी उत्पादनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू ही जिल्ह्यातील प्रमुख फलपिके होत. जिल्ह्याच्या किनारी भागात नारळाची व सुपारीची झाडे भरपूर आहेत. नारळाच्या झाडाला ‘माड’ असे, तर सुपारीच्या ‘पोफळी’ असे संबोधले जाते.

देवगढ व वेंगुर्ले हे तालुके आंब्याच्या उत्पादनासाठी, तर सावंतवाडी व वेंगुर्ले हे तालुके काजूच्या उत्पादनसाठी प्रसिद्ध आहेत. देवगड तालुक्यातील हापूस आंब्यास देशात व विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याशिवाय रातांबी (कोकम), फणस, जांभूळ वगैरे फळझाडेही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची वनसंपदा

  • जिल्ह्याच्या पूर्व भागात सह्य पर्वतरांगांच्या पायथ्याशी दाट वने आहेत. या वनांमध्ये साग, ऐन, खैर, शिसव हे वृक्ष मोठ्यावर प्रमाणावर आढळतात. सोनचाफा व सुरंगी यांसारखे फूलझाडेही येथील वनांत मोठ्या प्रमाणावर आहेत.
  • येथील वनांमध्ये वाघ, बिबट्या, गवा, सांबर, भेकर, तरस, ससा यांसारखे प्राणी तसेच मोर, रानकोंबडा, साकोत्री, होला यांसारखे पक्षी आढळतात.
  • हिरडा, बेहडा यांसारखी वनौषधे व मध ही येथील प्रमुख वनोत्पादने होत. फोंडा घाटातील मध सुप्रसिद्ध आहे.

उद्योगधंदे

पर्यटन, मासेमारी, येथील मुख्य व्यवसाय.

या ठिकाणी विशेषतः हापुस आंबा, फणस, काजु यांचे विपुल प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

मत्स्यव्यवसाय :

जिल्ह्याला १२१ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून जिल्ह्यात लहानमोठ्या १८ खाड्या आहेत. साहजिकच, मत्स्यव्यवसाय हा येथील एक महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय ठरला आहे. देवगड तालुक्यात मीठबाव येथे व मालवण तालुक्यात तारकर्ली येथे मत्स्यव्यवसायाचे शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत.

जिल्ह्यात मासेमारीसाठी यांत्रिक नौकांचा व गिल-नेटिंग, पासिंग-नेटिंग यासारख्या प्रगत तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमसांडे (देवगड) येथे उभारण्यात आला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाजण जमिनीत कोळंबी संवर्धनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. एकूणच जिल्हा चंदेरी क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात शिरोडे व मालवण येथे मिठागरे आहेत.

कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे सहकारी औद्योगिक वसाहती असून कणकवली येथे कोकण महामंडळाशी छोटी औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात कोकण गॅस, मेल्ट्रॉन, पावडर मेटल, सुंदर स्टील, सह्याद्री ग्लास, बायमन गार्डन, कोकण मिनरल्स, महाराष्ट्र मिनरल्स आदी उद्योग उभे राहिले आहेत.

वेंगुर्ले व मालवण परिसरात काजूबियांपासून काजूगर काढण्याचे अनेक छोटे-मोठे कारखाने आहेत. आंबे भरण्यासाठी लागणाऱ्या करंड्या-पेट्या वा खोकी बनविण्याचे उद्योग देवगड व वेंगुर्ले या तालुक्यांत उभे आहेत.अ वेंगुर्ले, आरोटे, वालावल, मालवण या ठिकाणी नारळाच्या सोडण्यापासून काथ्या बनविण्याचे व या काथ्यापासून ब्रश, दोरखंड, पायपुसणी आदी वस्तू बनविण्याचे कारखाने आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय. या तेरेखोल खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्य जोडली गेली आहे.

वाहातूक

पनवेल-मंगलोर (गोवामार्गे) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा (ज्याला आपण सामान्यतः मुंबई-गोवा महामार्ग म्हणून ओळखतो.) जिल्ह्यातून गेला आहे. खारेपाटण, नांदगाव, कणकवली , कुडाळ, सावंतवाडी, वंदे आदी या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थळे होत.

याशिवाय वेंगुर्ले-बेळगाव (सावंतवाडीमार्गे आंबोली घाटातून.); मालवण-कोल्हापूर (कणकवलीमार्गे फोंडा घाटातून.) देवगड-कोल्हापूर (नांदगावमार्गे फोंडा घाटातून); विजयदुर्ग-कोल्हापूर (वाघोटन, कासार्डेमार्गे फोंडा घाटातून.); आचरे-कोल्हापूर ( कणकवलीमार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख मार्ग होत. रत्नागिरी, बेळगांव आणि गोव्यातील दाभोली ही जवळची विमानतळं आहेत.

किल्ले

सिंधुदुर्ग ह जिल्ह्यातील महत्त्वाचा जलदुर्ग. हा कुरटे बेटावर बांधण्यात आला आहे. तिन्ही बाजूंनी तट असलेला विजयदुर्ग हा किल्ला देवगड तालुक्यात आहे. पद्मदुर्ग हा तटबंदीवजा बालेकिल्ला सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वाराशी पूर्वेस सुमारे दोनशे मीटर अंतरावर खडा आहे.

कुडाळ तालुक्यातील कार्यातनारूर येथील रांगणा किल्ला, याच तालुल्यातील शिवापूरजवळचा मनोहरगड, मालवण तालुक्यातील रामगड, शिरोडे-रेडी जवळच्या यशवंतगड हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्य किल्ले होत.

पर्यटन स्थळे

आशिया खंडातिल दुसऱ्या क्रमांकाचे ‘सागरीय उद्यान’ मालवण परिसरात सिंधुदुर्गाच्या सभोवताली साकारले गेले आहे. ‘राजा शिवछत्रपती सागरी उद्यान’ या नावाने ओळखले जाणारे हे उद्यान राज्यातील ‘पहिले व एकमेव’ सागरी उद्यान.

आंबोली हिल स्टेशन सावंतवाडी,मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला,विजयदुर्ग किल्ला,देवगड,तारकर्ली बीच,निवती रॉक (खोल समुद्रातील दीपगृह), निवती बीच,भगवती मंदिर, धामापूर तलाव,वेंगुर्ला बंदर (मासेमारी बंदर),गणपती मंदिर, रेडी,वेतोबा मंदिर (वेंगुर्ला)

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ. स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले.

सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये काय खास आहे?

हनुमान, जरीमरी आणि देवी भवानी यांच्या परंपरागत देवस्थानांसह, किल्ला शिवाजीला समर्पित मंदिरासाठी सर्वात प्रसिद्ध आहे. किल्ला परिसरात मंदिरांव्यतिरिक्त काही टाकी आणि तीन गोड पाण्याच्या विहिरी देखील आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला?

सिंधुदुर्ग बेट-किल्ला 17 व्या शतकातील मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता. परकीय (इंग्रजी, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज) व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करणे आणि जंजिऱ्यातील सिद्धींचा उदय रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे?

जिल्ह्याच्या पूर्वेस अरबी समुद्र, दक्षिणेस बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) व गोवा व उत्तरेस रत्नागिरी जिल्हा आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

सिंधुदुर्ग जिल्हा हा जगप्रसिद्ध अल्फोन्सो आंबा, काजू, जामुन इत्यादी उष्णकटिबंधीय फळांसाठी देखील ओळखला जातो. लांबलचक सुंदर समुद्र किनारा, नयनरम्य पर्वत आणि हिरवीगार जंगले या जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे.

Leave a Comment