इडली रेसिपी मराठी Idli Recipe In Marathi

इडली रेसिपी मराठी Idli Recipe In Marathi  इडली हा सर्वाना आवडता आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे. जो सर्वाच लोकप्रिय आहे. भारतात तसेच दक्षिण भारतात तसेच मुंबई, पुणे इतर शहरात सकाळी नाष्टा म्हणून वापर केला जातो. इडलीचे अनेक प्रकार आहेत. इडली सांबार, साबुदाणा इडली, अशा अनेक प्रकारच्या इडल्या आहेत. हॉटेलमध्ये जशी स्वादिष्ट इडली मिळते, तशीच इडली आपण घरीसुद्धा बनू शकतो. काही ठिकाणी गावामध्ये आणि शहरात इडली मिळू शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही एकदम सोप्या व सहज पद्धतीने इडली कशी बनवतात यांची रेसिपी घेऊन आलो आहे. आता आपण इडली कशी बनवतात यांची रेसिपी पाहणार आहोत.

Idli Recipe

इडली रेसिपी मराठी Idli Recipe In Marathi

इडलीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ:

इडली तयार करण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते. यासाठी खूप वेळ लागतो. सर्व डाळ व्यवस्थित भिजवणे नंतर त्याचे मिश्रण करून त्यांना व्यवस्थित ठेवणे याला पूर्ण 18 तास वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

इडल्या कुकिंग करण्यासाठी आपल्याला 45 मिनिट लागतात.

टोटल टाईम :

इडली तयार करण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतरच आपण इडल्या तयार करू शकतो. यासाठी जवळ जवळ 18 तास लागतात, आणि कुकिंग करण्यासाठी 25 मिनिट लागतात. यासाठी आपल्याला टोटल टाईम 18 तास 25 मिनिट एकून लागतात.

इडलीचे प्रकार :

इडली हे भारतात तसेच इतर राज्यात खूप स्वादिष्ट पदार्थ आहे, आणि शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. जो सर्वाचा आवडता आहे. इडलीचे विविध प्रकार आहेत. सांबर इडली, रवा इडली, साबुदाणा इडली, टोमॅटो इडली, मिनी इडली कबाब, मसाला इडली, इडली पिझ्झा अशा अनेक इडलीचे प्रकार आहेत. जे विविध ठिकाणी विविध प्रकारे बनवल्या जातात, हा एक लोकप्रिय नाष्टा आहे.

वाढीव :

इटली पदार्थ आपण सकाळी नाष्टा करण्यासाठी वापरतो. आपण इडली हे 5 व्यक्तिकरिता बनवणार आहोत.

इडली बनवण्यासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे आहे.

1) 2 वाटी उडीद डाळ.
2) 3 वाटी तांदूळ.
3) कोथिंबीर.
4) चवीनुसार मीठ.
5) एक ओले नारळ.
6) हिरवी मिरची.
7) इडली पात्र.
8) एक चम्मच मेथी दाणे.
9) सोरा किंवा लिंबू रस

पाककृती :

 • इडली तयार करण्यासाठी पहिल्यांदा पूर्वतयारी करणे आवश्यक आहे, आणि नंतर आपण इडली तयार करू शकतो.
 • तांदूळ, उडीद डाळ, आणि मेथीचे दाने इत्यादी स्वच्छ धुऊन घ्यावे, आणि नंतर त्याचा उपयोग करावा.
 • पहिले एक खोल पात्र घ्या, त्यामध्ये तांदूळ आणि पुरेशे पाणी टाकून तांदूळ भिजू घाला. असे हे 4 तास भिजनासाठी बाजूला ठेवा.
 • नंतर दुसऱ्या पात्रात उडीद डाळ आणि मेथीचे दाने पूरेशे पाणी घेऊन 4 तास भिजू घाला.
 • 4 तासानंतर उडीद डाळ आणि मेथीचे दाने बाहेर काढा, आणि त्यांना स्वच्छ धुऊन घ्यावे.
  सारख्याच पद्धतीने तांदूळ बाहेर काढा, व स्वच्छ धुऊन घ्यावे.
 • आता मिक्सर लावा आणि एक खोल भांडे घेऊन. त्यामध्ये उडीद डाळ आणि मेथीचे दाने एक कप पाणी टाकून गूळ गुळीत मिश्रण तयार करा.
 • नंतर तांदूळ मिक्सर मधून सारखेच दोन कप पाणी टाकून बारीक करून घ्या, आणि थोडे खडबडीत पेस्ट तयार करा.
 • तांदूळ आणि डाळीचे दोन्ही पेस्ट एका खोल खोलगट भांड्यात एकत्र काढून घ्यावे. आणि चवेनुसार त्यामध्ये थोडे मीठ टाका, आणि चांगले मिश्रण करून घ्या.
 • आता या मिश्रणावर व्यवस्थित झाकण ठेऊन चांगल्या ठिकाणी 12 ते 13 तास बाजूला ठेऊन द्यावे.
 • 12 तासानंतर हे थोडे फुलेल आणि आंबलेले दिसेल. आता हे आपल्याला इडली करण्यासाठी तयार झाले आहे, यामध्ये थोडा लिंबू रस किंवा दही टाका.
 • आता गॅस चालू करा, आणि त्यावरती इडली पात्र ठेवा त्यामध्ये पूरेशे पाणी टाका. पाण्याला पूर्ण गरम होऊ द्या.
 • इडली पात्राला थोडे तेल लावा म्हणजे इडली तयार झाली की सहज न चीपकता सहज काढता येणार.
 • आता एका चम्मचने इडली पात्रात हे मिश्रण टाका, आणि व्यवस्थित ठेऊन पात्र बंद करून घ्यावे. गरम वाफेने 15 मिनिट मध्ये आपली इडली तयार होणार.
 • सारख्या पद्धतीने आपण सर्व इडल्या तयार करून घ्याव्या आणि बाजूला ठेऊन घ्या. तो पर्यत इडल्या थंड होतात.
 • यासाठी लागणारी नारळ चटणी आपण तयार करूया. ओले नारळ फोडून त्यातील गाभा बाहेर काडून व्यवस्थित बारीक करून घ्या.
 • एका कढईमध्ये दोन चम्मच तेल टाका, आणि त्यामध्ये थोडा हिरवी मिरची ठेसा टाका. एक मिनिट त्याला परतवा.
 • नंतर त्यामध्ये बारीक केलेले ओले खोबरे टाकुन, त्याला दोन मिनिट शिजवावे. त्यामध्ये चवीनुसार थोडे मीठ घाला.
 • आपली चटणी तयार आहे, आणि इडल्या सुध्दा तयार आहेत. एका प्लेटमध्ये थोडी चटणी आणि इडली घ्या. त्यावर थोडी कोथिंबीर टाका आणि खाण्यासाठी इडली तयार आहे.

इडलीत असणारे घटक :

इडली तयार करण्यासाठी आपण डाळ तसेच कोथिंबीर तसेच तांदूळ यांचा वापर करतो. यामध्ये विशेष घटक आहेत. उडीद डाळी मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि सोडियम सारखे पोषक तत्व सुद्धा खूप असतात. हे मानवी शरिरासाठी खूप महत्वाचे घटक आहेत, जे आपले शरीर निरोगी आणि मजबूत राहते.

फायदे :

इडली खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. यामध्ये असणारे व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॅट हे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. यामुळे शारीरिक कमजोरी दूर होते, आणि आपण दोन तीन इटली खाल्ल्या तर आपल्याला लवकर भूक लागणार नाही. असे अनेक फायदे आपल्याला इडली पासून मिळतात.

तोटे :

इटली सेवन केल्या पासून काही तोटे सुध्दा आहेत. आपण इडली जास्त प्रमाणत सेवन केली तर आपल्याला पोट दुःखी किंवा मळ मळ होऊ शकते. कारण इडली हे डाळी पासून बनली असते.

इडली सोबत आपण चटणी सुध्दा खातो. जे हिरवी मिरची पासून बनलेली असते. त्यामुळे पितात जळजळ होऊ शकतो. म्हणून आपण हे सर्व नाष्टा प्रमाणे खाल्ले पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला इडली रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment