शंकरपाळी रेसिपी मराठी Shankarpali Recipe in Marathi

शंकरपाळी रेसिपी मराठी Shankarpali Recipe in Marathi हिंदू धर्मामध्ये सणतिवारांमध्ये नवनवीन गोडधोड पदार्थ बनविण्याची विधी पूर्वपरंपरागत आहे. आज आम्ही तुमच्याकरता खास अशी एक गोड व खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी घेऊन आलो आहोत. आजकाल बाजार मध्ये सर्वच पदार्थ विकत मिळतात परंतु ते बनविताना कोणत्या क्वालिटीचे बनवले आहेत हे आपल्याला माहिती नसते परंतु आपण आपल्या घरी बनवलेले पदार्थ नेहमीच चांगले असतात. म्हणून ही रेसिपी अतिशय सोप्या व सरळ भाषेत तुमच्याकरिता आहे नक्की करून बघा.

Shankarpali Recipe

शंकरपाळी रेसिपी मराठी Shankarpali Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

शंकरपाळी हा एक स्नॅक्स फूड आहे जो मैदा आणि रवा तसेच साखर यांच्या मिश्रणापासून बनवण्यात येतो. शंकरपाळी बनवण्याची पद्धत आपापली वेगळी असू शकते परंतु कृती एकच आहे. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या पिठांमध्ये फरक पडू शकतो. कोणी रव्यापासून बनवते मैद्यापासून बनवते तर कुणी गव्हाच्या पिठापासून सुद्धा शंकरपाळी बनवू शकतात. शंकरपाळी हा भारतीयांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. त्याला विविध नावे आहेत, जसे की शंकरपाळी, मीठे शंकरपाळी, गोड नमकीन शंकरपाळी इ. धार्मिक पूजेमध्ये किंवा सणांमध्ये हिंदू धर्मात शंकरपाळी करण्याची प्रथा पूर्वत आहे. सकाळचा नाश्ता म्हणूनही आपण शंकरपाळी खाऊ शकतो. शंकरपाळी बनविणे तसेच सहज सोपे आणि सरळ आहे. तेवढेच ते खायला सुद्धा चविष्ट आणि कुरकुरीत लागतात.

वाढीव :

ही रेसिपी आपण 5 लोकांकरिता बनवणार
आहोत.

पूर्वतयारी साठी लागणारा वेळ :

शंकरपाळीच्या पूर्वतयारीसाठी किमान 25 मिनिटे एवढा कालावधी लागतो.

कुकिंग टाईम :

शंकरपाळी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे लागतील.

टोटल टाईम :

पूर्ण रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला एकूण 45 मिनिटे लागतील.

साहित्य :

1) 300 ग्रॅम रवा
2) 200 ग्रॅम साखर
3) दोन चमचे तीळ
4) एक कप दूध
5) तीन चमचे वितळलेले तूप
6) शंकरपाळी तळण्याकरता तेल
7) सोडा चिमूटभर.

पाककृती :

  • मिसळ पाव रेसिपी मराठी 
  • सर्व प्रथम एका भांड्यात पाणी घालून त्यात साखर घालून विरघळवून घ्या.
  • आता एका भांड्यात रवा चाळून घ्या, नंतर त्यामध्ये चिमूटभर सोडा, दोन चमचे तूप व तीळ घालून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
  • नंतर दूध आणि साखरचे मिश्रण त्या पिठामध्ये घालून चांगले मळून घ्या. रवा मळून झाल्यानंतर हे मिश्रण 20 मिनिटे झाकून ठेवा.
  • वीस मिनिटानंतर गॅसवर कढई गरम होण्याकरिता ठेवा त्यामध्ये तेल टाका. तेल गरम होईपर्यंत रव्याचे मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
  • आता पराठ्याप्रमाणे जाडसर पाटावर लाटून घ्या. लाटण्या अगोदर पाटाला थोडे तेल लावून घ्या. म्हणजे शंकरपाळी फाटाला चिकटणार नाहीत. आता तुम्ही त्याला छोट्या छोट्या आकारांमध्ये किंवा तुम्हाला हवे असलेल्या आकारात कापून घ्या.
  • आणि हळूहळू उचलून गरम तेलामध्ये तळण्याकरिता टाका. त्यांना तपकिरी रंग येईपर्यंत ते चांगले तळून घ्या. अशाप्रकारे सर्व शंकरपाळी तळून घ्या आता थोडे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ते हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता. तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना देखील नाश्ता म्हणून देऊ शकता.
    मैद्याचे शंकरपाळी तुम्ही याच पद्धतीने करू शकता.

पोषक घटक :

यामध्ये शरीराचा थकवा निघून जाण्यासारखे ग्लुकोज, प्रोटीन व कोलेस्ट्रॉल असल्यामुळे आपल्या शरीरासाठी आवश्यकच आहे.

फायदे :

शंकरपाळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघते. व आपल्याला काही वेळ भूक लागत नाही.

तोटे :

शंकरपाळी खाणे तसे आरोग्यासाठी हिताची तर आहेच परंतु ज्या व्यक्तीला शुगर किंवा कोलेस्ट्रॉल चा प्रॉब्लेम असेल अशा व्यक्ती तळलेले पदार्थ किंवा गोड पदार्थ खाऊ शकत नाही.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा. शंकरपाळी हे रेसिपी करून बघायला विसरू नका.

Leave a Comment