काजू करी मराठी Kaju Kari Recipe in Marathi

काजू करी मराठी Kaju Kari Recipe in Marathi  बऱ्याचदा आपल्याला घरच्या भाज्या खाऊन कंटाळा येत असतो म्हणून आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जातो. परंतु आपल्याला त्याच भाज्यांचे रेट पाहता आश्चर्याचा धक्काच बसतो. एवढे महागडे भाजी रेट पाहून आपल्याला घरच्या घरीच सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात हॉटेल सारखीच चविष्ट भाजी केली तर मग हॉटेलमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. हॉटेलमधील भाज्यांपेक्षा घरची भाजी केव्हाही आरोग्यासाठी चांगलीच असते. म्हणून आम्ही तुमच्याकरता खास काजू करी ही रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण काजू करी या रेसिपी विषयी सविस्तर माहिती पाहूया.

 Kaju Kari

काजू करी मराठी Kaju Kari Recipe in Marathi

काजू करी रेसिपी प्रकार :

काजू करी रेसिपी बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. ढाबा स्टाईल काजू करी, शाही काजू करी रेसिपी, मलाई काजू करी, मसाला काजू करी इ.
काजू करी तिखट गोड मलाईदार आणि रुचकर अशी स्वादिष्ट परिपूर्ण रेसिपी आहे ही विशेषता उत्तर भारतीय पाककृतींशी संबंधित आहे. ज्याप्रमाणे आपण मटन चिकन तयार करतो त्याचप्रमाणे ही रेसिपी तयार केली जाते परंतु यामध्ये कांदा वापरला जात नाही. सर काजू करी मध्ये बटर, मलाई, टोमॅटो प्युरी, काजू इत्यादी घटक वापरले जाते. तसेच या रेसिपी मध्ये वापरण्यात येणारे भारतीय मसाल्यांचे मिश्रण आहे. त्यामुळे काजू करी अतिशय स्वादिष्ट व चटपटीत अशी रेसिपी बनते. जाणून घेऊया काजू करी या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता बनणार आहे ?
ही रेसिपी आपण सहा व्यक्तींकरता बनवणार आहोत.

रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

काजू करी रेसिपीची पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

काजू करी रेसिपी पूर्ण करण्याकरता एकूण वेळ आपल्याला 35 मिनिटे एवढा लागतो.

काजू करीसाठी लागणारे साहित्य :

1) दोन टोमॅटो
2) तीन मोठे कांदे
3) पाच ते सहा काजू वाटणासाठी
4) एक चमचा आलं – लसूण पेस्ट
5) एक चमचा गरम मसाला
6) तीन चमचे बटर किंवा तेल
7) अर्धा चमचा हळद
8) दोन मोठे चमचे दही
9) अर्धा चमचा जिरे
10) एक चमचा गरम मसाला
11) दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर
12) एक चमचा धने पूड
13) एक मोठी वाटी काजू
14) चवीनुसार मीठ

पाककृती :

 • व्हेज कटलेट रेसिपी मराठी
 • सर्वप्रथम आपल्याला काजू भाजीमध्ये घालण्याआधी गरम पाण्यात भिजू घालून ठेवा किंवा मग तेलातून भाजून घेऊ शकता.
 • नंतर आपल्याला टोमॅटो, आलं लसूण आणि कांदा तसेच पाच ते सहा काजू यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे.
 • एका कढाई मध्ये तेल किंवा बटर गरम करण्यासाठी ठेवावे. त्यामध्ये तेल टाकल्यानंतर जिरे टाकून चांगले तडतडू द्यावे. जिरे तडतडले की, त्यामध्ये दोन ते तीन लवंगा, दोन तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यावा.
 • नंतर या मसाल्यांचा छान सुगंध यायला लागला की, मिक्सर मधून बारीक केलेले वाटण त्यामध्ये घालावे.
 • वाटण करताना यामध्ये पाण्याचा वापर करू नये. पाण्याचा वापर केला तर वाटण तेलात टाकताना, तेलाचे शिंतोडे आपल्या अंगावर उडू शकतात.
 • आता हे मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. मसाल्याला तेल सुटले की, मसाला वेगळ्या प्रमाणात दिसू लागेल तेव्हा मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला.
 • नंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला, एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घाला.
 • मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर या परतलेल्या मसाल्यामध्ये दोन मोठे चमचे दही, एक चमचा साखर व चवीनुसार मीठ घालावे.
 • हे सर्व मसाले घालून झाले की, आता त्यामध्ये दोन कप गरम पाणी घालावे. व त्यांना उकडी काढून घ्यावी पाण्याचे प्रमाण हे तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे तसे ठेवू शकता.
 • जर तुम्हाला काजू करीची ग्रेव्ही घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी घाला व पातळ पाहिजे असेल तर पाणी जास्त घाला.
 • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये काजू घाला व पाच मिनिटे पुन्हा उकळी काढून घ्या व गॅस बंद करा नंतर कोथिंबीर घालून काजू करी सर्व्ह करावे.
 • अशाप्रकारे तुम्ही काजू करी ही रेसिपी पोळी, भाजी, तंदुरी रोटी, पराठा व भात या सोबत खाऊ शकता.

पोषक घटक :

काजू करी ही रेसिपी पौष्टिक भाजी आहे. त्यामध्ये कॅलरीज, कर्बोदके, फायबर, शुगर, कॅल्शियम, फॅट, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि सोडियम इत्यादी पोषक घटक असतात.

फायदे :

काजू करी खाणे शरीरासाठी फायदेमंद आहे. त्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते व केसांच्या वाढीला चालना मिळते. कारण काजूमध्ये प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात.

काजू करीच्या सेवनामुळे बुद्धी देखील त्यांना होते बऱ्याच गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी काजू करी मदत करते, शरीरातील ऊर्जा निर्मिती व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते.

काजूमध्ये अमेगा 3 नावाचे फॅटी ऍसिड असते. जे डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर असते. तसेच काजू काजूमध्ये विटामिन ई देखील असते जे आपल्या डोळ्यांचे आरोग्यासाठी खूपच आवश्यक असते. तसेच डोळ्यांच्या इतर आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.

काजू करी खाल्ल्यामुळे त्यातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्या मदतीने आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

तोटे :

काजूमध्ये अधिक प्रमाणात सोडियम आवडतो, म्हणून आपण जर प्रमाणापेक्षा जास्त काजूकरी खाल्ली तर आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण अनावश्यक रित्या वाढू शकते. त्यामुळे आपल्याला हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित आजार अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

काजूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतो, तसे पाहिले तर फायबर आपल्या शरीराला फायदेशीर ठरतो परंतु जास्त प्रमाणात जर शरीरात फायबरची निर्मिती झाली तर त्यामुळे पोटदुखी किंवा गॅसेसच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काजू करी ही रेसिपी आपण प्रमाणातच खायला पाहिजे.

तर मित्रांनो, काजू करी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment