काशीबाई बाजीराव बल्लाळ यांची संपूर्ण माहिती Kashibai Bajirao Ballal Information In Marathi

Kashibai Bajirao Ballal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, काशीबाई बाजीराव बल्लाळ हे नाव घेतले की आपल्याला हल्लीच आलेल्या सिनेमाची आठवण होते. सिनेमा आणि जगभरातील अनेक इतिहासकारांनी या काशीबाई बाजीराव बल्लाळ बद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे. त्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून आपण हा लेख लिहित आहोत.

Kashibai Bajirao Ballal Information In Marathi

काशीबाई बाजीराव बल्लाळ यांची संपूर्ण माहिती Kashibai Bajirao Ballal Information In Marathi

मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये अनेक शूरवीर योद्धे होऊन गेले, त्यांच्यासोबतच अनेक योध्या स्त्रिया देखील होऊन गेल्या. त्यांच्यामध्ये राणी लक्ष्मीबाई, रजिया सुलतान, राणी दुर्गावती इत्यादी महिलांचा समावेश होतो. आणि त्यांच्यातील एक महत्त्वाची स्त्री म्हणून काशीबाई ओळखल्या जातात. त्या एका शूर मात्र तेवढ्याच आज्ञाधारक मराठा सम्राज्ञी होत्या. त्यांच्याबद्दल तुम्ही या लेखामध्ये इत्यंभूत माहिती वाचू शकता.  

नावकाशीबाई बाजीराव बल्लाळ
जन्म दिनांक१९ ऑक्टोबर १७०३
जन्मस्थळचास कमान, पुणे, महाराष्ट्र
आईचे नावशुबाई
वडिलांचे नावमहादजी कृष्णाजी जोशी
बंधूंचे नावकृष्णराव चासकर
पतीपाहिले बाजीराव पेशवे (बाजीराव बल्लाळ)
पुत्ररघुनाथराव, बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब, जनार्धन आणि रामचंद्र
मृत्यू दिनांक२७ नोव्हेंबर १७५७
मृत्यू स्थळसातारा

काशीबाई बाजीराव बल्लाळ यांची ओळख किंवा परिचय:

मित्रांनो दिनांक १९ ऑक्टोबर १७०३ या दिवशी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील चासकमान या गावी महादजी कृष्ण जोशी आणि सुबाई यांच्या पोटी काशीबाईंचा जन्म झाला. लहानपणी अतिशय लाडाकोडात वाढलेल्या असल्यामुळे आणि कुटुंब अतिशय श्रीमंत व धनसंपन्न असल्यामुळे त्यांना लाडू बाई या टोपण नावाने ओळखले जात असे. त्यांना कृष्णराव नावाचा भाऊ असून, त्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्या होत्या.

काशीबाई यांचे वडील महादजी जोशी हे छत्रपती शाहू महाराजांनी नेमणूक केल्याप्रमाणे कल्याण प्रांताचे सुभेदार होते. त्यांनी मराठा साम्राज्यासाठी अनेक वेळा आपल्या प्राणाची बाजी लावली होती. महादजी एक सावकार देखील होते. या महादजी यांचे मराठी राज्यसत्तेशी पूर्वीपासूनच चांगले संबंध होते, त्यामुळे या संबंधाचे रूपांतर नात्यांमध्ये होऊन पेशवे घराण्याशी त्यांचे वैवाहिक संबंध जोडले गेले, ते म्हणजे काशीबाई यांच्या विवाह मुळे…

काशीबाई यांचा बाजीराव पेशव्यांशी विवाह:

मित्रांनो, काशीबाई आणि बाजीराव यांचा पहिला विवाह होता. त्यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. बाजीराव पेशवे त्या काळातील पेशवे साम्राज्याचे सर्वात पराक्रमी आणि उत्कृष्ट सम्राट होते. या दोघांचा विवाह ११ मार्च १७२० या दिवशी सासवड या पुणे जिल्ह्यातील ठिकाणी अगदी विधिपूर्वक पद्धतीने पार पडला.

मित्रांनो, यानंतर मात्र बाजीराव पेशवे यांनी मस्तानी यांच्याशी विवाह केला असला तरी देखील काशीबाईंनी त्यांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्या अगदी मृत्यू समयीपर्यंत बाजीरावांची काळजी घेत असत. ज्यावेळी बाजीराव पेशवे लढाईच्या निमित्ताने घराबाहेर असत, त्यावेळी त्या घर सांभाळण्याबरोबरच सरकारी जबाबदारी देखील सांभाळत असत.

या दांपत्यांना एकूण चार मुले होती, ज्यांचे नाव बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवा, जनार्दन राव, रामचंद्र राव, आणि रघुनाथराव अशी होती. बाजीराव नंतर नानासाहेब पेशवे गादीवर बसले, मात्र रामचंद्र व जनार्दन ही दोन मुले लहानपणीच मरण पावली होती.

काशीबाई आणि बाजीराव यांच्या आयुष्यामध्ये मस्तानी यांचा प्रवेश:

मित्रांनो, बाजीराव आणि काशीबाई यांच्यामध्ये पूर्वीपासूनच खूपच प्रेमाचे नाते होते. शिवाय बाजीराव देखील त्यांना खूपच आदर देत असत. त्यांनी राज्यकारभाराचे अनेक अधिकार त्यांना दिले होते, म्हणूनच बाजीराव मोहिमेवर असताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये काशीबाई राज्यकारभार पार पाडत असत.

त्याकाळी राजे अनेक विवाह करत असत, मात्र ज्यावेळी बाजीराव यांनी बुंदेलखंडाच्या राजाची अर्थात छत्रसाल यांची मुलगी मस्तानी यांच्यासोबत विवाह केला, त्यावेळी काशीबाई यांना फार मोठा धक्का बसला.

काशीबाई आणि मस्तानी यांचे कधीही पटत नसे, मात्र असे असले तरी देखील ज्यावेळी बाजीराव पेशवे यांचा मृत्यू झाला, त्यानंतर काशीबाई यांनी मस्तानी यांचा मुलगा समशेर बहादूर याला दत्तक घेऊन त्याची चांगल्या रीतीने काळजी घेतली. तसेच त्याला राज्यकारभारामध्ये देखील मानाचे स्थान बहाल केले.

बाजीराव पेशव्यांच्या निधनानंतर काशीबाईंचे जीवन:

मित्रांनो, स्त्री कितीही कणखर असली तरीही आपल्या पतीच्या मृत्यूनंतर प्रत्येक स्त्री खचूनच जात असते. मग ते भावनिक रूपाने असो किंवा इतर कोणत्या रूपाने असो. काशीबाई या बाजीराव पेशव्यांच्या निधनानंतर खचल्या असल्या तरी देखील त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाजीराव पेशव्यांची सेवा केली.

ज्यावेळी १९४० या वर्षी बाजीराव पेशव्यांचे निधन झाले, त्यानंतर काही दिवसांनी मस्तानी यांचे देखील निधन झाले. त्यामुळे मस्तानीचा मुलगा समशेर बहादूर हा एकटा पडला. त्यामुळे काशीबाई यांनी त्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे चांगले पालनपोषण केले. आणि त्यानंतर त्याला राजकारभारामध्ये देखील सामावून घेतले.

बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर काशीबाई या खूपच शांत झाल्या, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अमुलाग्र बदल घडवून आले आणि त्या धार्मिक कार्याकडे वळल्या. त्यांनी पेशव्यांच्या निधनानंतर १७४९ यावर्षी पुण्यामध्ये सोमेश्वर शिव मंदिर बांधले, जे आज देखील एक प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते.

त्यानंतर त्यांनी दानधर्म देखील मोठ्या प्रमाणावर केला. काही संदर्भानुसार त्यांनी स्वतः एक लाख रुपये खर्चून दहा हजार लोकांना तीर्थयात्रा घडून आणण्याची व्यवस्था केली होती.

मित्रांनो, पतीच्या निधनानंतर काशीबाई राज्यांच्या बाहेरच राहत असत. त्यांनी सुमारे चार वर्षे बनारस मध्ये घालविल्याचे देखील संदर्भ आढळतात, आणि त्यानंतर २७ नोव्हेंबर १७५८ या दिवशी साताऱ्यामध्ये या काशीबाई यांचे निधन झाले. बाजीराव पेशव्यांची पत्नी आणि एक उत्कृष्ट स्त्री म्हणून या काशीबाई बाजीराव बल्लाळ यांना इतिहासात मानाचे स्थान देण्यात आलेले आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतातील अनेक स्त्री योध्यांमध्ये काशीबाई बाजीराव बल्लाळ यांचा समावेश होतो. आजच्या भागामध्ये आपण त्यांच्याविषयी माहिती बघितली, ज्यामध्ये तुम्हाला त्यांचा परिचय, बाजीराव पेशव्यांची पत्नी म्हणून जीवनप्रवास, त्यांच्या मुलांबद्दल माहिती, मस्तानीची ओळख, पतीच्या अर्थात बाजीराव पेशव्यांच्या निधनानंतर चे जीवन, आणि स्वतः काशीबाई यांचे निधन याबरोबरच काही प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहेत.

FAQ

बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर काशीबाई चे जीवन कसे होते?

बाजीराव पेशवे अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यकरिता लढत होते. त्यांच्या निधनानंतर काशीबाई यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल देत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्याकरिता त्यांनी मस्तानीच्या मुलाला अर्थात समशेर बहादूर याला दत्तक घेऊन राजकारभार चालविला.

बाजीराव पेशवे व काशीबाई यांच्या विवाह बद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो, ज्यावेळी काशीबाई आणि बाजीराव पेशवे यांचा विवाह झाला, त्यावेळी बाजीराव अकरा वर्षांचे तर काशीबाई या आठ वर्षांच्या होत्या. हा विवाह सोहळा १७७१ या वर्षी पार पडला. त्यांचे घर अर्थात वाडा हा चासकमान येथे असून तो सुमारे दोन एकर मोठ्या परिसरात पसरलेला आहे.

काशीबाई यांचे बालपणीचे नाव काय होते?

काशीबाई यांचे बालपणीचे नाव लाडू बाई असे होते, कारण त्या खूपच लाडाकोडात वाढलेल्या होत्या.

काशीबाई यांची बाजीराव पेशवे यांच्या प्रतीची निष्ठा कशी सांगता येईल?

मित्रांनो, बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाबद्दल आपले सर्वांनाच माहिती आहे, त्यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकणाऱ्या काशीबाईंना शांत स्त्री म्हणून ओळखले जाते. त्यांनी सदा बाजीरावांच्या प्रति आपली आदर आणि आपुलकी जपली.

काशीबाई यांचे निधन केव्हा व कोठे झाले?

काशीबाई यांचे निधन २७ नोव्हेंबर १७५८ या दिवशी महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये झाले, त्यावेळी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काशीबाई बाजीराव बल्लाळ या एका स्त्री योद्धाची आणि पेशवे दरबारातील गृहलक्ष्मीची माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये सांगण्याबरोबरच तुमच्या इतरही मित्र मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment