नवरात्री उत्सवची संपूर्ण माहिती Navratri Festival Information In Marathi

Navratri Festival Information In Marathi नवरात्री उत्सव हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा उत्सव आहे. यामध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा होतो आणि हा उत्सव हिंदू लोक साजरा करत असतात. नवरात्र म्हणजेच नवरात्रीचा समूह असा त्याचा अर्थ घेतला जातो. नऊ दिवस देवीची पूजा करून भजन कीर्तने करून हा उत्सव साजरा केला जातो. प्रथम चैत्र महिन्यामध्ये म्हणजेच मार्च एप्रिल मध्ये हा साजरा केला जातो. नवरात्र ही वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विविध हिंदू संस्कृती क्षेत्राच्या भागांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

Navratri Festival Information In Marathi

नवरात्री उत्सवची संपूर्ण माहिती Navratri Festival Information In Marathi

चार हंगामी नवरात्री आहेत तसे पाहिले तर पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा मात्र प्रमुख उत्सव साजरा केला जातो. जर आपण दिनदर्शिकेच्या नुसार पाहिले तर अश्विन महिन्यांमध्ये शुक्ल पक्षांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. विशेषता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये साजरा केला जाणारा उत्सव हा मुख्य उत्सव मानला जातो. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असून त्या देवी विषयी संबंधित व्रत सुद्धा धारण केले जाते.

उत्सवशारदीय नवरात्र
कोणत्या महिन्यात येतोसप्टेंबर ते ऑक्टोबर
धर्म हिंदू धर्म
देवीचे नावेदुर्गा, महिषासुरमर्दिनी

नवरात्री या उत्सवाचा इतिहास :

नवरात्री या उत्सवाचा इतिहास खूप जुना आहे. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस मोठे युद्ध करून दैत्यांचा संहार केला होता. त्यामध्ये महिषासुर हा दैत्य खूप माजला होता आणि देवीने महिषासुरचा वध केला. त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असे नाव सुद्धा प्रचलित झाले आहे. तेव्हापासून पृथ्वीवर महिषासुरमर्दिनीच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीच्या उत्सवा दरम्यान केली जाते.

महिषासुरमर्दिनी ही शक्ती वाघावर बसलेली आहे तसेच तिच्या हातामध्ये तलवार, चक्र, खडग अशी शस्त्रे धारण केलेली असून आकर्षक अशी ही देवता आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तीची सगळीकडेच पूजा केली जाते. यामध्ये दररोज सकाळ संध्याकाळी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी प्रसाद सुद्धा वाटला जातो तसेच देवीला दररोज नैवेद्य सुद्धा दाखवला जातो.

नैवेद्यामध्ये देवीला वेगवेगळे गोडधोड पदार्थ करून भरवले जातात किंवा प्रसादाच्या स्वरूपामध्ये ठेवले जातात. महाराष्ट्रामध्ये तर अनेक भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच अनेक भाविक भक्त देवीच्या तीर्थयात्रेला सुद्धा जातात. ही परंपरा खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तसेच ही पुढे सुद्धा चालत राहील.

नवरात्रीचे महत्त्व :

वर्षभरामध्ये नवरात्री चारदा साजरी करण्यात येते. त्यामध्ये दोन गुप्त नवरात्र असतात आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तसेच एक चैत्र नवरात्र सुद्धा असते. शारदीय नवरात्रीचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे आणि शारदीय नवरात्रीमध्ये देवीचे नामस्मरण करणे उपासना करणे तसेच तिची मनोभावे पूजा करणे या सर्व गोष्टी पासून आपल्याला पुण्य मिळते, अशी एक आख्यायिका सुद्धा आहे. कारण या नऊ दिवसांमध्ये असूर शक्तीचा नाश करून देवीने सर्व देवतांना व पृथ्वीवासीयांना मुक्त केले होते आणि ही परंपरा अनादी काळापासून सुरू आहे.

सुरुवातीला पावसाळ्यात पेरणी करतात आणि हे पीक आपल्या घरामध्ये येण्याचा पहिलाच काढ असतो, त्यामुळे शेतकरी सुद्धा अत्यंत आनंदी असतात आणि हा उत्सव साजरा करण्यामागे सुद्धा विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील शक्तीपीठांना सुद्धा या महिन्यांमध्ये किंवा या उत्सवा दरम्यान सजवले जातात तसेच विशेष महत्त्व दिले जाते. देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त आपल्या सहकुटुंबाने जातात.

नवरात्री उत्सव कसा साजरा केला जातो :

शारदीय नवरात्र म्हणजेच हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. हा उत्सव ऑक्टोबर महिन्यामध्ये येत असल्यामुळे प्रत्येक कुळामध्ये असलेली घरातील देवी तिच्या नावाने घरामध्ये घटस्थापना करण्यात येते. पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा सुद्धा केली जाते. या देवीला ऊर्जा आणि शक्तीची देवता मानली जाते, त्यानंतर देवीला फळ, फुल, आरती, भजन स्वरूपामध्ये प्रसन्न केले जाते.

नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करून देवीला वेगवेगळ्या नऊ रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान केले जातात. काही लोक कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन तसेच कालीपूजन सुद्धा करतात. पहिल्या दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य लावण्यात येते किंवा कोणी गहू सुद्धा लावतात. दहा दिवसांमध्ये गटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते.

टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवून त्यामध्ये कलश स्थापन करतात. त्याची पूजा दररोज केली जाते. प्रत्येक दिवशी या घाटावर एक महाड चढविण्यात येते. पूजेमध्ये पाच प्रकारची फळे सुद्धा समाविष्ट करतात. नऊ दिवस वेगवेगळी माळ चढवून रोज सकाळ संध्याकाळी दीप दुप, आरती आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो.

देवीच्या होम हवन हे सप्तमीपासून सुरुवात होते. काही ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होम हवन करण्यात येते तर काही ठिकाणी नवमीच्या दिवशी सुद्धा होम हवन केले जाते. त्यामध्ये जोडपे पूजेसाठी बसवले जातात. त्यादरम्यान आपल्याला काही त्रास होत असेल तर मनोभावे देवीची पूजा करून देवीला प्रसन्न करून आपला त्रास कमी होतो.

देवीची नऊ रूपे सर्व देवतांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे देवी ती करून होऊन त्या शक्ती रूप मूर्तीला देवी असे नाव मिळालेले आहे. यांना सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून सुद्धा गौरविले जाते. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रुप आपल्याला पाहायला मिळतात.

त्यामध्ये उमा, गौरी, पार्वती, जगदंबा आणि भवानी ही देवीची सौम्य रुपे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी व चामुंडा ही रुपे उग्र आहेत. देवीच्या या नवरूपांमध्ये शैलीपुत्रिती, ब्रह्मचरणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, नवदुर्गा आहेत. अध्यात्मिक दृष्ट्या ही देवीची रूपे खूप महत्त्वपूर्ण आहेत.

FAQ

नवरात्री या उत्सवात किती रंग असतात?

नवरात्री या उत्सवात नऊ रंग समाविष्ट असतात.

वर्षभरात एकूण किती नवरात्री आहेत?

वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. दोन चैत्र नवरात्री आणि शरद नवरात्री या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातात तर दोन ह्या गुप्त नवरात्रि असतात.

नवरात्री हा उत्सव किती दिवसांचा असतो?

नवरात्री हा उत्सव नऊ दिवसांचा असतो.

नवरात्रीचा उपवास कधी सुटतो?

शालेय नवरात्रीमध्ये जे लोक व्रत धारण करतात. ते ज्या दिवशी नवरात्र बसवले जाते, त्या दिवसापासून ते नऊ दिवस हे व्रत पाळले जाते.

नवरात्री हा उत्सव कधीपासून सुरू झाला?

नवरात्री हा उत्सव खूप प्राचीन काळापासून चालत आलेला एक उत्सव आहे.

Leave a Comment