Mahashivratri Information In Marathi महाशिवरात्री उत्सव हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा भगवान शिव यांचा उत्सव आयोजित केला जातो. भारतामधील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी हा एक उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक लोक भगवान शिव आणि माता पार्वती यांची दर्शन करतात. कारण याच दिवशी त्यांचा विवाह सुद्धा झाला होता असे म्हटले जाते. हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो.
महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती Mahashivratri Information In Marathi
शिवपार्वती यांचा विवाहाचा हा दिवस म्हणून ओळखला जातो. देवांचा देव महादेव यांना या दिवशी विशेष पूजेचे महत्त्व आहे. शिवरात्रीच्या काही दिवसांच्या आधीच घरातील वृद्ध व अनुभवी लोक काशीखंड, शिवलीलामृत, महारुद्र यासारख्या पवित्र ग्रंथांचे पारायण करतात तर काही लोक महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा अगोदर गायन, भजन, कीर्तन यासारखे उपक्रम सुद्धा राबवतात.
महाशिवरात्री हा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. भगवान शिवाच्या शिवलिंगाला किंवा मूर्तीला अभिषेक घातला जातो. त्याला बेलही वाहिली जातात. काही लोक या दिवशी दिवसभर महादेवाचा जप म्हणजेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असे म्हणतात तर काही लोक शिवरात्रीच्या अगोदर बारा ज्योतिर्लिंगांना भेटी देण्यासाठी किंवा दर्शनासाठी सुद्धा जातात.
सण | महाशिवरात्री |
उत्सव | महादेवाचे लिंगाची पूजा व उपवास |
धर्म | हिंदुधर्म |
सण वर्षातून किती वेळा येतो | एकदा |
महाशिवरात्री कशी साजरी केली जाते :
महाशिवरात्री हा एक हिंदू धर्मातील लोकांचं सर आहे. या दिवशी भगवान शिव म्हणजेच महादेवांची पूजा मोठ्या थाटामाटा आणि केली जाते. शिवलिंगाला अभिषेक करून बेलपत्रे वाहली जातात. या दिवशी लोक अगदी मनोभावाने भगवान शिव शंकर यांच्या शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा सुद्धा करतात.
काही लोक या दिवशी दिवसभर महादेवाचा जप करतात तर काही लोक बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी सुद्धा अतिथ यात्रा करतात.
या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते आणि काही मंदिरामध्ये महादेवाची परंपरेनुसार पूजा करून भजन, कीर्तन आणि गायन यांसारखे कार्यक्रम भक्ती भवानी चालू असतात. बऱ्याच ठिकाणावर तर महादेव मंदिरा बाहेर यात्रा सुद्धा भरलेले असतात आणि महाप्रसादांचे आयोजन भाविक भक्तांसाठी असतो. अशाप्रकारे महाशिवरात्रि हा सण मोठ्या थाटामाटाने व उत्साहाने साजरा केला जातो.
महाशिवरात्रीची कथा :
महाशिवरात्री याच्या विषयी दोन कथा आहेत. पहिल्या कथेमध्ये महाशिवरात्री याविषयी असे सांगितले आहे की, जेव्हा समुद्रमंथन झाले होते, तेव्हा सृष्टी संबंधित काही गोष्टींची निर्मिती झाली होती आणि त्याचवेळी या समुद्रमंथनातून एक विष सुद्धा निर्माण झाले होते. जे विष संपूर्ण पृथ्वीचा नाश करणार होते; परंतु त्यावेळी भगवान शिवशंकर यांना कळले त्यांनी ही विष प्रशान केले आणि सृष्टीचा नाश होण्यापासून बचाव केला. या विषाला संपवण्याची क्षमता फक्त महादेवांकडेच होती परंतु महादेवांना हे विष प्रशान केल्यानंतर त्यांच्या शरीराला दाह होत होता.
महादेवाचे शरीर हे काळे निळे पडले त्यावेळी इतर देवांनी देवांच्या वैद्यांना बोलावले आणि त्या वैद्यांनी महादेवांना रात्रभर जगण्यासाठी सांगितले होते. इतर सर्व देवांनी महादेवांना बरा वाटावे म्हणून रात्रभर नृत्य केले आणि गायन केले तसेच आपण जागर म्हणतो. आजही महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री भजन, कीर्तन, गायन करून जागर केला जातो आणि धार्मिक कार्यक्रम राबवून रात्रभर उत्सव मोठा साजरा केला जातो.
दुसरी कथा अशी आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवाच्या प्रतिकांचा नैवेद्य एखाद्याला त्यांच्या पापावर मात करण्यासाठी आणि धार्मिक तिच्या मार्गावर प्रारंभ करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे व्यक्तीला कैलास पर्वतावर पोहोचता येते आणि मोक्ष सुद्धा प्राप्त होते.
आधुनिक महाशिवरात्री उत्सव प्रथा :
महाशिवरात्री साजरी करण्याच्या अनेक पद्धती आहेत तसेच राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये बरेच लोक जमतात. पूर्वी या दिवशी लोक त्यांच्या स्थानिक मंदिरामध्ये जाऊन पूजा, अर्चना करायचे.
मंदिरांना भेटी द्यायचे, पूर्वीच्या काळात लोक आवर्जून मंदिरात जात होते. मग रात्रभर भजन, कीर्तन करत होते. महादेवाला धतुरा, भांग, बेलाची पाने, फुले इत्यादी शेतातून आणून अर्पण करायचे आणि तेव्हापासून ह्या गोष्टी सतत चालू राहिल्या आणि आजही तेवढ्याच थाटामाटाने महाशिवरात्री साजरी केले जाते आणि हा सण भविष्यात सुद्धा असाच साजरा होणार आहे.
महाशिवरात्रीचे महत्त्व :
महाशिवरात्रीचे महत्त्व आपल्याला हिंदू धर्मामध्ये दिसून येते. आपल्या जीवनातील अलौकिक शक्तीचे महत्त्व या सणामुळे दर्शवते. सर्व सजीवांच्या फायद्यासाठी भगवान शिवाजी विश्वापासून कधीही न संपणाऱ्या देवाचे आपल्याला उदाहरण मिळते. हा दिवस एक स्मरणीय दिवस आहे.
आपण चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे तसेच त्यावर विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. यामुळे आपल्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होते. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. त्याविषयी दंतकथा सुद्धा आहेत तसेच या दिवसाचे योगी परंपरांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यातून पुढे गेले असले तरी आज अशा टप्प्यांवर पोहोचला आहे की, आता सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. सध्या जीवन पदार्थ आणि अस्तित्व मानत असलेल्या प्रत्येक गोष्टी तसेच ब्रम्हांड आणि नक्षत्र केवळ एक ऊर्जा आहे. जी स्वतः प्रकट होते, प्रत्येक योगीला हे वैज्ञानिक सत्य वैयक्तिक अनुभवातून खरे आहे हे माहीत असले तरीसुद्धा आपल्याला देवत्वाचे सत्व अनुभवायला मिळते तसेच योगी पुरुषांचा आशीर्वाद लाभतो.
महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना पद्धत :
महाशिवरात्रीचे व्रत बरेच लोक करत असतात.
उपासामध्ये कोणतेही पदार्थ कोणी खात नाही किंवा देवांना फळे अर्पण केल्यानंतरच ते खातात. दिवस रात्रभर शिवाजी पूजा केली जाते, शिवपुजेमध्ये रुद्राभिषेकला तर खूपच महत्त्व आहे. शिवरात्रीच्या दिवशी अनेक व्यक्ती आपल्या कुटुंबासह रुद्र अभिषेक करतात. शिवरात्रीला विशेष प्रकारचा दिवा लावला जातो आणि त्याच्यासमोर बसून शिव ध्यान केले जाते.
यात शिवरात्रीला दिवा लावणे सुद्धा खूप महत्त्वाची आहे. शिव पुराण, शिव पंचाक्षर, शिवस्तुती, शिवस्तक, शिव चालीसा, शिवाचे श्लोक शास्त्र नावांमध्ये पाठ केला जातो तसेच भगवान शिवांच्या धनासाठी ओम असे चिंतन सुद्धा केले जाते. ओम नमः शिवाय उच्चार सुद्धा केला जातो. भगवान शिव शंकरांना श्रावण महिना सर्वात जास्त प्रिय आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात सुद्धा महादेवाची पूजा केली जाते. भाविक भक्त मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने महादेवाची भजने गीते गातात.
FAQ
महाशिवरात्रीच्या दिवशी काय केले जाते?
महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केले जाते. जागरणामध्ये भजन, कीर्तन किंवा भगवान शिव शंकराच्या नावाचा जप केला जाते.
महाशिवरात्रीला कोणत्या मंदिरात जातात?
महाशिवरात्रीला महादेवाच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये जातात. त्या व्यतिरिक्त इतर भाविक श्रद्धालू बारा ज्योतिर्लिंगाचे सुद्धा दर्शन घेतात.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय केले जाते?
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर शंकर पार्वती आणि नंदीला पंचामृत गंगाजल आणि अभिषेक केला जातो. त्यानंतर बेलाचे पान, गंध, फुल, अक्षीद अर्पण करून धूप दीप लावून नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते व संध्याकाळी महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो.
महाशिवरात्री व्रत कोणाशी संबंधित आहे?
महादेव या देवतेशी संबंधित आहे.
महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे?
महाशिवरात्री हा एक जीवनामध्ये आणि जगामध्ये अंधार व अज्ञानावर मात करण्याचा स्मरण दिवस आहे.
Mahadevanchi history army sarkhi ahe ani must ahe