खांडवी रेसिपी मराठी Khandvi Recipe in Marathi

खांडवी रेसिपी मराठी Khandvi Recipe in Marathi  सकाळच्या नाश्त्यामध्ये खांडवी ही रेसिपी तुम्ही आवडीने करू शकता व घरच्यांना देखील खुश करू शकता. खांडवी ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व स्वादिष्ट असते ही एक गुजराती डिश असून तीच देशभर प्रसिद्ध आहे. आम्ही खास तुमच्याकरिता खांडवी रेसिपी घेऊन आलो आहोत. आज काल हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये देखील ही रेसिपी उपलब्ध आहे. परंतु आपल्याला जर घरच्या घरी ही रेसिपी तयार करायची असेल तर रेस्टॉरंट किंवा हॉटेल सारखी चविष्ट अशी खांडवी रेसिपी आपण तयार करू शकतो. तेही कमी वेळात व कमी खर्चात. तर चला मग जाणून घेऊया रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

Khandvi Recipe

खांडवी रेसिपी मराठी Khandvi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

खांडवी रेसिपी गुजरात मधील सर्वात लोकप्रिय रेसिपी मधील एक रेसिपी आहे त्याची चव छान असते. ही रेसिपी पंजाबी आणि गुजराती अशा दोन राज्यांमध्ये भिन्न स्वरूपाची पाहायला मिळतात पंजाब मध्ये मसाला खांडवी तर गुजरात मध्ये गोड खांडवी असे दोन प्रकार आहेत. मसाला खांडवीपेक्षा गुजराती खांडवी रेसिपी लोकप्रिय आहे. या रेसिपीची तुलना ढोकळा, फाफडा यांच्यासोबत केली जाते. कारण ही रेसिपी सुद्धा बेसनापासून तयार केळी जाते.
तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्ती करता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण पाच व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करताना लागणारा वेळ :

खांडवी या रेसिपीच्या पूर्वतयारीकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

ही रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ हा 30 मिनिटे लागतात.

खांडवी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) अर्धी वाटी बेसन
2) पाव वाटी दही
3) पाव चमचा आले पेस्ट
4) पाव चमचा हिरवी मिरची पेस्ट
5) पाव चमचा हळद
6) चिमूटभर हिंग
7) चवीनुसार मीठ
8) पाणी

तडका देण्यासाठी लागणारे साहित्य :

1) तीन ते चार कढीपत्त्याची
2) एक चमचा मोहरी
3) एक चमचा खोबरे
4) बारीक चिरलेला कोथिंबीर
5) चवीनुसार मीठ
6) एक चमचा तेल

खांडवी तयार करण्याची पाककृती :

  • खांडवी रेसिपी तयार करण्याकरिता सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दही, बेसन, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, हळद पावडर आणि मीठ एकत्र करून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  • नंतर मायक्रोवेव्ह क्रेडिट करण्यासाठी ठेवा. आता बेसनाचे मिश्रण मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये टाकून जवळपास पाच मिनिटांसाठी मायक्रोवेव करण्यासाठी ठेवा त्यानंतर मध्येच एकदाही मिश्रण ढवळून घ्या.
  • 5 मिनिटानंतर बाउल मायक्रोवेव्ह मधून काढा नंतर एका भांड्यामध्ये किंवा किचनच्या ओट्यावरही तुम्ही हे मिश्रण पसरवून द्या.
  • नंतर चार ते पाच मिनिटांनी हे मिश्रण थंड झाल्यानंतर घट्ट होईल व घट्ट झालेले मिश्रण चाकूने रुंद पट्ट्या कापून त्याचे गोल गोल रोल तयार करून घ्या.
  • आता एका गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाका. तेल गरम झाले की मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून दोन मिनिटे छान परतून घ्या व नंतर हा तडका खांडवीवर टाका.
  • नंतर खांडवीवर कोथिंबीर, खोबरे यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

पोषक घटक :

खांडवी ही रेसिपी पौष्टिक आहे, त्यामध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, ऊर्जा, लोह, सोडियम, सेलेनियम, पोटॅशियम, कॅल्शियम व विटामिन ए इत्यादी पौष्टिक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी देखील पौष्टिक असतात.

फायदे :

खांडवी रेसिपी आपल्यासाठी अत्यंत पौष्टिक रेसिपी आहे. खांडवी खाल्ल्यामुळे सकाळी आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते तसेच आपल्या शरीराला एनर्जी प्राप्त होते.

खांडवीमधील पोटॅशियम, व्हिटॅमिन ए असल्याने आपल्या मास पेशी मजबूत होण्यास मदत होते. प्रोटीन युक्त बेसनापासून तयार झालेली खांडवी आपला थकवा दूर करण्यास मदत करते.

ही रेसिपी आपल्या शरीरातील हाडांसाठी देखील उपयुक्त आहे. हाडांमधला कमकुवतपणा दूर करण्यासाठी खांडवी रेसिपी पौष्टिक आहे.

ही रेसिपी प्रोटीन युक्त असल्यामुळे तसेच त्यामधील बरेचसे पोषक घटक असल्यामुळे आपल्या शरीरातील थकवा दूर होतो व रोगप्रतिकार क्षमता वाढते.

तोटे :

खांडवी रेसिपी अत्यंत पौष्टिक असली तरीही ती प्रमाणातच खाणे योग्य आहे. कारण त्यामध्ये असलेल्या फायबरचे जास्त प्रमाणात सेवन झाले तर पोटदुखी किंवा गॅसेसचा त्रास आपल्याला होऊ शकतो.

ज्यांना बेसनाची एलर्जी आहे, अशांनी देखील हे पदार्थ खाऊ नये. अन्यथा त्यांना हानी होऊ शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला खांडवी या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment