गुलगुले रेसिपी मराठी Gulgule Recipe In Marathi

गुलगुले रेसिपी मराठी Gulgule Recipe In Marathi  गुलगुले हे गव्हाचे पिठ, रवा आणि गुळापासून बनवले जातात, हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी गुलगुले वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. भारतील पश्चिम आणि उत्तर भागात गुलगुले हे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डिश आहे. गुलगुले ही रेसिपी एकदम कमी वेळात आपण घरीच बनवू शकतो. हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, गुलगुलेचा उपयोग नाष्टा म्हणून केला जातो.

आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि गोड गुलगुले खाण्यासाठी मिळतात. काही लोकांना गुलगुले खूप आवडतात, पण त्याचा परिसरात चवदार आणि गोड गुलगुले मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट गुलगुले कसे बनवतात यांची रेसिपी. आता आपण गुलगुले रेसिपी पाहणार आहोत.

Gulgule Recipe

गुलगुले रेसिपी मराठी Gulgule Recipe In Marathi

गुलगुलेचे प्रकार :

गुलगुले हा एक स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे, गुलगुले विविध ठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. यामध्ये गोड गुलगुले, तिखट गुलगुले, मसालेदार गुलगुले हे प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
गुलगुले रेसिपी ही आपण 4 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

गुलगुलेच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

गुलगुले तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर गुलगुले रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

गुलगुले कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

गुलगुले बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

गुलगुलेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 2 वाट्या गव्हाचे पीठ.
2) 200 ग्रॅम गूळ.
3) 5 ते 6 चमचे रवा.
4) 1 चमच बडीशोप.
5) तेल, मीठ.

पाककृती :

 • मसाला खाखरा मराठी
 • सर्वात प्रथम गव्हाचे पीठ चांगले गाळून घ्या, आणि नंतर गूळ बारीक खिरून घ्या.
 • आता एक खोल तळाचे भांडे किंवा मिक्सिंग बाऊल घ्या, त्यामध्ये 2 कप पाणी टाकून, बारीक केलेला गूळ टाका.
 • गूळ पूर्ण विरघळला पाहिजे, तो पर्यत चांगला ढवळत रहा,
 • नंतर एका प्लेटमध्ये 2 वाट्या पीठ, चवीनुसार थोडे मीठ आणि बडीशेप टाका, आणि चांगले मिक्स करून घ्या.
 • नंतर गुळाच्या पाण्यात हे पिठ टाकून, चांगले मिसळून घ्या, पिठाचे गोळे राहायला नको नाहीतर गुलगुले चांगले होणार नाही.
 • मिश्रण पूर्ण एकजीव तयार करा, भजेसाठी आपण जसे मिश्रण तयार करतो, तसे तयार करा.
 • मिश्रण पातळ तयार करा, आवश्यक असल्यास थोडे आणखी पाणी घेऊ शकता.
 • मिश्रण तयार झाले की, 20 मिनिट झाकण ठेऊन चांगले भिजू घ्या, नंतर याचा उपयोग करा.
 • नंतर गॅस वरती कढई ठेवा, त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
 • तेल गरम झाले की, आपण भजे ज्याप्रमाणे काढतो, तसेच गुल-गूले गरम तेलात काढा.
 • कढईत जेवढे मावतील तेवढे गुल-गुले टाका, आणि चांगले तळून घ्या.
 • गुल-गुले चांगले लालसर आणि कुरकुरीत होये पर्यत तळून घ्या, तळून झाले की एका पेपर वरती काढून घ्या, अशा प्रकारे सर्व गुल-गुले तळून घ्या.
 • आता आपले गरमा-गरम स्वादिष्ट गुलगुले खाण्यासाठी तयार आहेत. आपण एका प्लेटमध्ये घेऊन गुलगुले खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

गुलगुलेमध्ये असणारे घटक :

गुलगुले हा एक स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. जसे शुगर, कॅलरी, व्हिटॅमिन, फॅट, कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, लोह हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

गुलगुले हा एक पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शुगरचे प्रमाण असते.

आपण गुलगुले सेवन केले तर, आपल्याला थकवा आणि अशक्तपणा येत नाही.

यामध्ये असणारे घटक फॅट, चरबी, प्रोटीन हे घटक आपल्या शरीराची वाढ करतात.

गुलगुलेमध्ये असणारे सर्व पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

गुलगुले हा गोड आणि तेलकट पदार्थ आहे, आपण जास्त प्रमाणात गुलगुले सेवन केले तर, आपल्याला उलटी किंवा पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून गुलगुले आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला गुलगुले रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment