कोंबडी वडे पीठ मराठी Kombdi Vade Pith Recipe Marathi

कोंबडी वडे पीठ मराठी Kombdi Vade Pith Recipe Marathi कोंबडी वडे पीठ हे ज्वारी, तांदूळ, गहू, चना डाळ, जिरे आणि धने पासून बनवले जाते. या धान्याचे पीठ तयार करून कोंबडी वडे रेसिपी बनवली जाते. कोंबडी वडे हा पदार्थ कोकणातील प्रसिद्ध पदार्थ आहे, याला मालवणी पदार्थ म्हणून सुध्दा ओळखले जाते. कोंबडी वडे हे सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. यांचा उपयोग सकाळी नाष्टा म्हणून केला जातो. कोंबडी वडे पिठाला भाजणीचे पीठ म्हणून सुध्दा ओळखले जाते. या पिठात अनेक पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

कोंबडी वडे पीठ आपण 10 ते 15 दिवस एका डब्यात ठेऊ शकतो, हे जास्त काळ चांगले राहत नाही. या पीठाचा लवकर उपयोग करावा लागतो, काही लोकांना कोंबडी वडे खूप आवडतात, पण त्यांना कोंबडी वडे पीठ कशे तयार करतात यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदा सोप्या पद्धतीने कोंबडी वडे पीठ कसे तयार करतात यांची रेसिपी. आता आपण कोंबडी वडे पीठ रेसिपी पाहणार आहेत.

Kombdi Vade Pith

कोंबडी वडे पीठ मराठी Kombdi Vade Pith Recipe Marathi

कोंबडी वडे पिठाचे प्रकार :

कोंबडी वडे पीठ तयार करणे एकदम सोपे आहे, या पिठाचे कोणतेच वेगळे प्रकार पडत नाही. कोंबडी वडे पीठ हे वेग-वेगळ्या धान्या पासून बनवले जाते, आपण मसाला पीठ, तिखट पीठ, तयार करू शकतो.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
कोंबडी वडे पीठ आपण 10 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

कोंबडी वडे पीठाच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

कोंबडी वडे पीठ तयार करण्यासाठी वेग-वेगळे धान्य एकत्र करावे लागते, नंतर पीठ तयार करावे लागते, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कोंबडी वडे पीठ तयार करण्यासाठी धान्य भाजून घ्यावी लागतात, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

कोंबडी वडे पीठ बनवण्यासाठी पहिले सर्व धान्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 40 मिनिट वेळ लागतो.

कोंबडी वडे पीठासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 किलो तांदूळ.
2) 1 किलो ज्वारी.
3) 4 वाट्या चना डाळ.
4) 2 वाट्या गहू.
5) 1 वाटी जिरे.
6) 2 वाट्या धने.

पाककृती :

  • सर्वात प्रथम सर्व धान्ये तांदूळ, ज्वारी, गहू, डाळ, जिरे, धने चांगले निसुन घ्या,
    आणि थोडा वेळ उन्हात वाळू घाला.
  • नंतर गॅस वरती एक कढई ठेवा, आणि गरम करा. एक-एक करून वेग-वेगळे धान्य भाजून घ्या, नंतर एका प्लेटमध्ये काढा.
  • धान्य वेग-वेगळे भाजले की, व्यवस्थित भाजेल जातात, नंतर चना डाळ भाजून घ्या.
  • सर्व साहित्याचा खमंग वास या पर्यत चांगले भाजा, नंतर जिरे आणि धने टाकून थोडे गरम करा.
  • सर्व साहित्य एका खोल भांड्यात काढून घ्या, आणि थोडा वेळ थंड होऊ द्या.
  • नंतर चक्की मधून या धान्याचे बारीक पिठ तयार करून आणा, आता आपले कोंबडी वडे बनवण्याचे पीठ तयार आहे.
  • आपण यामध्ये हळद, तिखट, मीठ, आणि कोथिंबीर टाकून कोंबडी वडे बनवू शकतो.

कोंबडी वडे पिठात असणारे घटक :

कोंबडी वडे पीठ हे वेग-वेगळे धान्य आणि डाळी पासून बनवले जाते. यामुळे यामध्ये विविध पौष्टिक घटक आहेत, जसे अल्कोहोल, कॅल्शियम, प्रोटीन, चरबी, फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

कोंबडी वडेच्या पिठापासून बनलेला पदार्थ पौष्टिक असते, यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात.

यामध्ये फॅट, चरबी, कॅलरी हे घटक आपले शरीर निरोगी ठेवतात, व शरीरावर चरबीचे प्रमाण वाढवतात.

तसेच यातील कॅल्शियम, प्रोटीन व्हिटॅमिन हे घटक आपल्या शरीराची वाढ करतात.

या पिठातील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

कोंबडी वडे पीठ हे एक जड अन्न आहे, यापासून तयार केलेले पदार्थ आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून या पिठा पासून तयार केलेले पदार्थ आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला कोंबडी वडे पीठ रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment