खो खो खेळाची माहिती मराठी | Kho Kho Information in Marathi

Kho Kho Information in Marathi: खो-खो हा भारतामध्ये सर्वात लोकप्रिय आणि पारंपारिक खेळांपैकी एक आहे. एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणे आणि त्याला स्पर्श करण्याचा हा सोपा प्रकार आहे. हा एक स्वस्त आणि आनंददायक खेळ आहे जो शारीरिक तंदुरुस्ती आणि कौशल्यांच्या जोरावर खेळला जातो.

खो खो खेळाची माहिती मराठी | Kho Kho Information in Marathi

खो खो खेळाची माहिती मराठी | Kho Kho Information in Marathi

चुकांडा देणे अथवा हुलकावणी देणे तसेच सोंग करणे, अचानक वेगाने धावणे यांमुळे हा खेळ अधिकच रोमांचकारी बनतो. पकडण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे धावणे ऐवजी पाठलाग करणे – हे खो-खो चे मुख्य कौशल्य आहे. हा खेळ आयताकृती मैदानावर दोन संघांद्वारे आणि दोन डावांमध्ये खेळला जातो. एक संघ धावतो तर दुसरा संघ त्यांचा पाठलाग करत असतो. यामध्ये पाठलाग करणारे खेळाडू धावणाऱ्या खेळाडूंना स्पर्श करून बाद करतात. प्रत्येक संघाला एका सामन्यात दोनदा ९  मिनिटांचा पाठलाग आणि बचाव करावा लागतो.

खो-खो चा इतिहास : History of Kho Kho

प्राचीन काळात खो-खो हा खेळ रथांवर खेळला जात होता त्यामुळे त्याला राथेरा म्हणूनही ओळखले जाते. २०व्या शतकामध्ये प्रथम खो-खो चे नियम तयार केले गेले. १९१४ मध्ये खो-खो नियम तयार करण्यासाठी पुना जिमखाना येथे एक समिती स्थापन केली गेली आणि खो-खो नियमांचे पहिले पुस्तक १९२४  मध्ये बडोदा जिमखान्यातून प्रकाशित झाले. वर्ष 1936 हे त्यांच्यासाठी सुवर्ण संधीचे वर्ष होते तेव्हा खो-खोचा खेळ बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मुख्य स्टेडियममध्ये प्रदर्शित झाला. आणि अभिमान याचा वाटतो की अमरावतीचे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने या प्रदर्शनाचे निदर्शन केले होते.

पहिल्यांदाच खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने १९५९-६० मध्ये अखिल भारतीय खो-खो चॅम्पियनशिप विजयवाडा येथे आयोजित होती. १९६९-७० मध्ये हैदराबादमध्ये कनिष्ठ वयोगटातील स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सब-कनिष्ठ मुलामुलींना भारत पुरस्कार आणि सब-कनिष्ठ कन्या वीर बाला पुरस्कार या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1987 मध्ये दक्षिण आशिया मध्ये खेळ पार पडले आणि तीन देशांच्या सदस्यांचा मिळून “Asian Kho-Kho Federation” हा महासंघ अस्तित्त्वात आला. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील एक शिस्त म्हणून खो-खो चा समावेश होता जो दिल्ली येथे २०१३ ला घेण्यात आला.

खो-खो चे मैदान : Kho Kho Ground

खो-खो चे मैदान आयताकृती असते. त्याचे लांबी २७ मी. तर रुंदी १६ मी. असते. मैदानाच्या दोन्ही कडेला छोटे आयताकार असतात. त्यांची एक बाजू १६ मी. तर दुसरी १.5 मी. असते. मैदानाच्या मध्यभागी दोन मोठे आयताकार आणि दोन लाकडी खांब असतात. मध्यभागाची लांबी २४ मी. असते. त्याच्या दोन्ही कडेला लाकडी खांब रोवलेले असतात. या मध्य भागामुळे बरोबर ७.८५ मी. अंतराने 8 रेघांना बरोबर मध्यभागी छेदल्या जातात. लाकडी खांब हे गुळगुळीत केलेले असतात.

खो-खो चे नियम : Rules in Kho Kho

 • खो-खो मध्ये एका संघामध्ये एकूण १२ खेळाडू असतात, परंतु त्यातील फक्त ९ खेळाडू मैदानात खेळण्याची मुभा असते. ३ खेळाडू हे जास्तीचे असतात.
 • एका सामन्यात दोन डावांचा समावेश असतो आणि प्रत्येक डावामध्ये धावणे आणि पाठलाग करण्यासाठी ९ मिनिट दिले जातात.
 • मग एक संघ मैदानाच्या मध्यभागी आपल्या शेजारील खेळाडूच्या उलट दिशेला तोंड करून बसतो.
 • पाठलाग करणारे खेळाडू फक्त एकाच दिशेने पळू शकतात, आणि त्यांना दोन खांबांच्या मध्ये असलेली रेघा पार करण्यात मनाई असते तर धावणारे कोणत्याही दिशेला पळू शकतात. त्यांना काही बंधने नसतात.
 • पाठलाग करणार्‍यांना दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी त्यांना संपूर्ण पंक्तीच्या भोवती चक्कर घ्यावा लागतो.
 • दुसरा पर्याय म्हणजे धावण्यार्या खेळाडूकडे ज्याचे तोंड असते त्याला आपले काम सोपवू शकतो म्हणजे तो दुसरा खेळाडू त्याचा पाठलाग सलग करेल. पाठलाग करणारा त्याला पाहिजे असलेल्या सहसा लक्ष्याजवळ असलेल्या खाली बसलेल्या खेळाडूला स्पर्श करतो, सूचित करण्यासाठी “खो” बोलतात.
 • सर्व विरोधकांना कमीतकमी वेळेमध्ये बाद करणे हा उद्देश असतो.
 • मैदानात विरोधकांचे जास्तीत जास्त खेळाडू बाद करण्यासाठी कमीतकमी वेळ घेणारी टीम जिंकते.

मूलभूत कौशल्ये : Skills in Kho Kho

 1. चढाई करण्याचे कौशल्ये : जो संघ पाठलाग करत असतो त्याला या कौशल्याच्या जोरावर यश प्राप्त करता येते.
 2. बचावात्मक कौशल्ये : जो संघ धावत असतो त्यातील खेळाडू या कौशल्याच्या जोरावर जास्त वेळ खेळू शकतात.
 3. चकवा देण्याचे कौशल्य : या कौशल्याचा तर दोन्ही संघांना उपयोग करावा लागतो. कोण कधी आणि कसा चकवा देऊ शकतो हे प्रत्येक खेळाळू वर अवलंबून असते. चकवा देण्यात निपुण असलेले खेळाडू सहज आपली कारकीर्द गाजवू शकतात.

हा खेळ शारीरिक तंदुरुस्ती, सामर्थ्य, वेग आणि तग धरण्यास मदत करतो. आज्ञाधारकपणा, शिस्त, क्रीडा कौशल्य आणि संघातील सदस्यांमधील निष्ठा यासारखे गुण देखील यात विकसित होतात. हा खेळ मनोरंजक आहे कारण बसलेल्या खेळाडूंची स्थिती सतत बदलती असल्याने खेळाला सुरुवात झाल्यावर त्याच क्रमाने बसलेल्या खेळाडूंचा क्रम कधीच मिळणार नाही.

Leave a Comment