लिंबू लोणचे मराठी Limbu Lonche Recipe In Marathi लिंबू लोणचे हे लिंबापासून बनवले जाते, हे खायाला एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहे. भारतात लिंबू लोणचे हे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात बनवले जाते. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. लिंबू लोणचे हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. यांचा उपयोग जेवण करताना किंवा भाजी पोळी सोबत तोंडी लावायला केला जातो. हे लोणचे जास्त दिवस टिकून राहते, लिंबू लोणचे हे एक औषधी आहे, ज्यामुळे पोटाचे आजार चांगले होतात.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट लिंबू लोणचे मिळते. परंतु काही शहरी भागात लिंबू लोणचे सहज मिळत नाही, काही लोकांना लिंबू लोणचे खूप आवडते. पण त्यांचा परिसरात चवदार लिंबू लोणचे मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने लिंबू लोणचे कशे बनवतात याची रेसिपी. आता आपण लिंबू लोणचे रेसिपी पाहणार आहेस.
लिंबू लोणचे मराठी Limbu Lonche Recipe In Marathi
लिंबू लोणच्याचे प्रकार :
लिंबू लोणचे खायाला एकदम स्वादिष्ट आणि चमचमीत आहे. लिंबू लोणचे विविध प्रकारे बनवले जाते, जसे लिंबू लोणचे, गोड लिंबू लोणचे, मसाला लिंबू लोणचे, हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
लिंबू लोणच ही रेसिपी आपण 10 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
लिंबू लोणचेच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
लिंबू लोणचे तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर लोणचे बनवू शकतो. यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
लिंबू लोणचे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
लिंबू लोणचे बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते. परंतु लिंबू लोणचे मुरल्या नंतरच खायाला चांगले लागते, यासाठी आपल्याला कमीत कमी 15 दिवस वेळ लागतो.
लिंबू लोणच्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 1 किलो लिंबू.
2) अर्धा किलो साखर.
3) 3 चमचे मिरची पावडर.
4) 1 ते 2 चमचे मीठ.
पाककृती :
- सर्वात प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन घ्या, आणि कोरडे होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढा.
- लिंबू लोणच्यासाठी लागणारे लिंब थोडे पिवळे असेल पाहिजे यामुळे लोणचे स्वादिष्ट बनते.
- लिंबू कोरडे झाले की, नंतर लिंबू कापून मध्यम तुकडे तयार करा, आणि त्यातील पूर्ण बिया काढून टाका.
- नंतर एका खोल भांड्यात लिंबाच्या फाड्या काढा, त्यामध्ये मिरची पावडर आणि आवश्यक तेवढे मीठ घाला.
- आणि यांचे पूर्ण मिश्रण तयार करा. सर्व व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. नंतर हे मिश्रण एका भरणीत काढून घ्या.
- भरणीला घट्ट झाकण लावून 3 ते 4 दिवस मुरण्यसाठी व्यवस्थित ठेऊन द्या. 3 ते 4 दिवसानंतर लोणचे एका भांड्यात काढा,
- नंतर गॅस चालू करून गॅस वरती एक खोल भांडे ठेवा. पाक तयार करण्यासाठी त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून, अर्धा किलो साखर टाका.
- साखर सतत ढवळत रहा, म्हणजे साखर लवकर विरघडेल, पाक थोडा घट्ट झाला की खाली काढा.
- पाक थोडा वेळ पाक थंड होऊ द्या, नंतर हा पाक लोणच्यांमधे टाका आणि पूर्ण मिक्स करा.
- आता पाक लोणच्यामध्ये मुरण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 दिवस लागतील.
- 10 ते 15 दिवस नंतर आपले स्वादिष्ट आणि चवदार लिंबू लोणचे खाण्यासाठी तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये घेऊन लोणचे खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
लिंबू लोणच्यात असणारे घटक :
लिंबू लोणचे हे एक पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये विविध घटक आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, यातील सोडियम, पोटॅशियम, शुगर, फॅट, प्रोटीन हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
लिंबू लोणचे खाल्ल्याने आपल्याला जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी, मिळते यामुळे आपली त्वचा आणि डोळे चांगले राहतात.
यामध्ये असणारे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आपल्याला निरोगी ठेवतात.
लिंबू लोणचे एक औषधी आहे, यामुळे आपल्या पोटाचे आजार ठीक होतात.
तोटे :
लिंबू लोणचे आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर आपल्याला मळ-मळ आणि उलटी होय शकते.
यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.
म्हणून लिंबू लोणचे आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला लिंबू लोणचे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.