मसाला भात रेसिपी मराठी Masala Bhat Recipe in Marathi महाराष्ट्रात मसाला भात ही रेसिपी प्रत्येक घरात देखील केल्या जाते. मसाला भात ही रेसिपी आपल्याकडे लग्न कार्यक्रम किंवा एखाद्या शुभ प्रसंगामध्ये बऱ्याचदा पाहायला मिळते. परंतु ही रेसिपी आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो, तेही जास्त वेळ न घेता. ही रेसिपी बिर्याणी किंवा मग व्हेज पुलाव यांच्या एवढीच खायला स्वादिष्ट लागते. परंतु त्या दोन्ही रेसिपी आणि मसाला भात बनवण्याची पद्धत मात्र वेगळी असल्यामुळे त्याला मसाला भात हे नाव देण्यात आले आहे. तर आज आपण पाहूया मसाला भात ही रेसिपी कशी बनवायची.
मसाला भात रेसिपी मराठी Masala Bhat Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
मसाला भात ही रेसिपी आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. गोड मसाला भात, खट्टा मीठा मसाला भात, तिखट मसाला भात, ग्रीन मसाला भात, डाळ मसाले भात या काही मसाले भाताच्या रेसिपी आहेत. तर चला मग पाहूया मसाला भात रेसिपी.
ही रेसिपी किती लोकांकरता आहे ?
मसाले भात ही रेसिपी आपण तीन जणांकरिता करणार आहोत.
मसाला भात पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
मसाला भात रेसिपीची पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मसाले भात शिजवण्यासाठी आपल्याला केवळ 10 मिनिटे एवढाच वेळ लागतो.
टोटल टाईम :
मसालेभात पूर्णतः तयार करण्याकरिता आपल्याला ऐकून 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.
मसाले भात तयार करण्याकरता लागणारी सामग्री :
1) दोन वाटी बासमती तांदूळ
2) चार वाटी पाणी
3) दोन हिरव्या मिरच्या
4) चवीनुसार मीठ
5) हळद
6) तेल
7) मोहरी
8) मटार
9) लसूण अद्रक पेस्ट दोन चमचे
10) कोथिंबीर
11) कढीपत्त्याची चार ते पाच पान
मसाल्याचे साहित्य :
सात ते आठ लवंगा
सात ते आठ मिरे
तमालपत्र चार पाने
मसाला भात पाककृती :
- सर्वप्रथम आपल्याला मंद आचेवर मीरे, लवंगा भाजून घ्यायचे आहेत.
- नंतर त्यात तमालपत्राची पाने तोडून टाकायचे आहे. हे सगळं पदार्थ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. आता ही बारीक पावडर चाळणीने गाळून घ्यायची आहे.
भात शिजवायची प्रक्रिया :
आपण घेतलेला तांदूळ स्वच्छ धुऊन त्यातील पाणी निथळायला ठेवा.
तेल गरम करून त्यात मोहरी तडतडून द्या. नंतर त्यामध्ये आलं, लसूण कढीपत्त्याची पाने टाकून चांगले परतून घ्या.
आता त्यामध्ये मटार टाका व ती फोडणी हलवून घ्या. नंतर त्यामध्ये मिरच्या, अर्धा चमच हळद घाला.
मसाला चांगला परतून झाला की, त्यावर तांदूळ घाला आणि छान परतून घ्या.
आता त्यामध्ये एक चमचाभर मसाले भाताचा मसाला घालायचा आहे. त्यामध्ये मीठ घालून मिश्रण चांगले परतून घ्या. तांदूळ कुकरला चिटकणार नाही याची दक्षता घ्या.
छान वास सुटल्यानंतर त्यामध्ये पावणे चार वाटी पाणी घालायचे आहे. हे झाकण न लावता जरासे पाणी आटू द्यायचे आहे. नंतर सगळ्यात शेवटी झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे.
हा भात वाफेवर छान शिजवून घ्या. कुकरची वाफ गेल्यानंतर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याने सजवून तसेच साजूक तूप टाकून सर्व्ह करा.
तुम्हाला आवडत असल्यास काजूही तळून टाकू शकता. अशाप्रकारे गरमागरम मसाले भात रेसिपी तयार आहे.
ग्रीन राईस रेसिपी :
मसाले भातचा आणखीन एक दुसरा प्रकार म्हणजेच ग्रीन राईस तर चला मग बघू या ग्रीन राईस रेसिपी कशी तयार करायची.
ग्रीन राईस साठी लागणारे साहित्य :
ग्रीन राईस करण्याकरता आपल्याला तयार असलेला जीरा राईस किंवा साधा राईस आपण वापरू शकतो.
सर्वप्रथम तयार असलेला जीरा राईस दोन वाटी घेऊन त्यामध्ये कोथिंबीर पुदिना आणि पालकाचे अद्रकचा तुकडा आणि दोन मिरच्या यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. मीठ व दोन चमचे तूप
पाककृती :
- सर्वप्रथम आपण पालक, पुदिना, कोथिंबीर आणि मिरची यांची पेस्ट बनवलेली आहे.
- आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून जिरे तडतडू द्या. त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट टाका. ती पेस्ट छान परतून घ्या.
- नंतर आपण घेतलेल्या दोन वाटी भात त्यामध्ये टाकून चवीनुसार मीठ हळद घाला. तसेच खोबरे आणि कोथिंबीरने देखील त्याची सजावट आपण करू शकतो.तर अशाप्रकारे ग्रीन राईस रेसिपी तयार आहे.
रेसिपीतील पोषक घटक :
तांदुळामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात त्यामध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट, बी जीवनसत्वे आणि थायमिन असतात.
फायदे :
तांदळामध्ये फायबरची मात्रा भरपूर असल्यामुळे आपण त्याचे जेवनामध्ये दररोज सेवन केले तर त्यातील पोषक घटकांमुळे आपल्या शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तांदूळ शरीरासाठी पोषक अन्न आहे, भारतात बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे भात रेसिपी करून रोजच्या जेवणात खायला आवडते.
तांदळामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असल्यामुळे व त्याच्या नैसर्गिक स्वरूपातील साखर कमी असल्यामुळे तांदळाचे सेवन नियमित व मर्यादित केल्यामुळे इन्सुलिनचा स्त्राव संतुलित राहतो.
तोटे :
भाताचे जास्त प्रमाणात सेवन केले तर
चयापचयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. तसेच मसाले भातामध्ये खळ्या मसाल्यांचा उपयोग केल्यामुळे आपल्या शरीराला हानी होऊ शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला मसाले भात रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.