सांबर रेसिपी मराठी Sambar Recipe in Marathi

सांबर रेसिपी मराठी Sambar Recipe in Marathi सांबर ही रेसिपी दक्षिण भारतीय आहे. परंतु आता ते भारतभर पसरली आहे. इडली, डोसा, उपमा किंवा वडा यांच्यासोबत जर सांबार नसेल तर ते खाण्याची मजाच नाही. जर सांबार नसेल तर आपण केलेला नाष्टा हा अधुराच राहिल्यासारखा वाटतो. तसे पाहिले तर सांभार ही रेसिपी शरीरासाठी खूपच फलदायी आहे. त्यामध्ये तूरडाळ, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, दुधी भोपळा यासारख्या फळभाज्यांचा समावेश असतो. त्यामुळे सांबार लहान पासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक आहे. तर जाणून घेऊया त्याविषयी माहिती.

  Sambar

सांबर रेसिपी मराठी Sambar Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

सांबार ही रेसिपी प्रकार दक्षिण भारतातील आहे. सांबार या रेसिपीमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा उपयोग करून तयार केली जाते. प्रत्येकाची सांबार बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते व त्याची चवही वेगळी असू शकते. सांभार या रेसिपीचे आपण नाव ऐकले तर असं वाटेल की, ही रेसिपी करायला खूपच अवघड आहे परंतु तसे नाही. आम्ही तुमच्याकरिता खास सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये रेसिपीची माहिती घेऊन आलो आहोत, तर चला मग बघूया सांबार रेसिपी कशी तयार करायची.

ही रेसिपी किती जणांंकरता करणार आहोत?
सांभार ही रेसिपी आपण 5 लोकांकरता करणार आहोत.

सांबरच्या पूर्व तयारी करता लागणारा वेळ :

सांबार रेसिपीच्या पूर्वतयारी करताना लागणारा वेळ हा 20 मिनिटे एवढा आहे .

कुकिंग टाईम :

सांबार रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

सांबर रेसिपी बनवण्याकरता आपल्याला एकूण 50 मिनिटे एवढा वेळ लागतो.

सांबार या रेसिपी साठी लागणारी सामग्री :

1) एक वाटी तूर डाळ
2) दोन शेवग्याच्या शेंगा तुकडे करून
3) चार ते पाच दुधी भोपळ्याचे तुकडे
4) एक वाटी तेल
5) एक चमचा मोहरी
6) पाच ते सहा कढीपत्त्याची पाने
7) तीन कांदे
8) पाव चमचा हिंग
9) दोन बारीक कापलेले टोमॅटो
10) अर्धा कप चिंचेचे पाणी
11) तीन चमचे सांबर मसाला
12) एक चमचा हळद पावडर
13) मीठ चवीनुसार
14) कोथिंबीर बारीक चिरलेली

सांबार बनवण्याची पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला तूर डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे.
  • नंतर गॅसवर कढई ठेवून, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, हिंग कढीपत्ता टाकून मंद आचेवर परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये बारीक केलेले टोमॅटो टाकून गॅस मोठा करा व ते चांगले परतू द्या. टमाटे परतून झाले की, त्यामध्ये भोपळा व शेवग्याच्या शेंगांचे तुकडे टाका.
  • ते सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्या नंतर त्यामध्ये चिंचेचे पाणी, लाल तिखट, हळद, मीठ व सांबार मसाला घाला. नंतर हे मिश्रण एक ते दोन मिनिटे होऊ द्या.
  • नंतर त्यामध्ये आपण तयार केलेली तुरीची डाळ घाला व हे मिश्रण पाच ते दहा मिनिटे होऊ द्या.
  • नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला ताजा कोथिंबीर घाला.

सांबार मधील पोषक घटक :

सांबारमध्ये विविध भाज्यांचा उपयोग केला जातो त्यामुळे शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक तत्वांची निर्मिती सांभार या रेसिपीमध्ये तयार होते. त्यामध्ये कॅलरीज, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, तांब, सेलेनियम इत्यादी प्रमुख पोषक तत्व आढळतात.

फायदे :

सांबरमध्ये प्रोटीन असल्यामुळे ते आहारात पौष्टिक आहे. तूर डाळीमध्ये असलेले सर्वच घटक शरीरासाठी पोषक असतात. त्यामुळे शरीराचे हाडे स्नायू व त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत होते.

सांबार ही रेसिपी बनवण्यासाठी यामध्ये बऱ्याच भाज्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्या फायबरने समृद्ध असतात. तसेच फायबर हे वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करतात.

सांबाराने पोट देखील भरलेली राहते आणि बऱ्याच काळपर्यंत भुकेची उणीव होत नाही. जर आपणास वजन कमी करायचे असेल तर सांबार आपल्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा.

जर तुम्हाला मधुमेह सारखा रोग असेल आणि डॉक्टरांनी डायट कंट्रोलमध्ये करायला सांगितले असेल तर सांबार हा एक उत्तम उपाय आहे.

तोटे :

सांबार मध्ये चिंचेचे गोड घातलेला असल्यामुळे ज्यांना चिंचेची अलर्जी आहे त्यांनी हे खाऊ नये.

ज्या व्यक्तीचे वजन आधीच कमी आहे, अशांनी नियमित सांबाराचे सेवन करणे योग्य नसते. कारण त्यामध्ये पोषक द्रव्य असतात परंतु कोलेस्ट्रॉलचे प्रमाणात नसते.

सांबाराचा जेवणात समावेश केल्यामुळे भूक मंदावण्याची शक्यता असते.

तर मित्रांनो, तुम्हाला सांबार ही रेसिपी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment