मसाला पापड मराठी Masala Papad Recipe In Marathi मसाला पापड हा उडीद पापड आणि वेग-वेगळ्या प्रकारच्या साहित्य पासून बनवला जातो. हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार पापड आहे, हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. जो सर्वाना खूप जास्त आवडतो, विविध ठिकाणी मसाला पापड हा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. मसाला पापड भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ मानला जातो. याचा उपयोग नाष्टा म्हणून केला जातो, मसाला पापड आपण कमी वेळात घरी सुध्दा बनवू शकतो.
आपण हॉटेल किंवा नाष्टा सेंटरवर पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार मसाला पापड मिळते. काही लोकांना मसाला पापड खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट मसाला पापड मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने मसाला पापड कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण मसाला पापड रेसिपी पाहणार आहोत.
मसाला पापड मराठी Masala Papad Recipe In Marathi
मसाला पापडचे प्रकार :
मसाला पापड हा एक स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे, मसाला पापड वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे मसाला पापड, खस्ता पापड, साधा पापड, तांदूळ पापड हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मसाला पापड रेसिपी ही आपण 4 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
मसाला पापडच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
मसाला पापड बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर मसाला पापड बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मसाला पापड कुकिंग करण्यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
मसाला पापड तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर कुकिंग करावा लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 25 मिनिट वेळ लागतो.
मसाला पापडसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 5 उडीद डाळ पापड.
2) 2 टोमॅटो.
3) 1 कांदा.
4) थोडा चाट मसाला.
5) 1 वाटी खटाई.
6) थोडी बारीक शेव.
7) 1 चमच काळे मीठ.
8) थोडी कोथिंबीर.
9) तेल, मीठ.
10) अर्धी वाटी उकडलेले चने.
पाककृती :
- सर्वात प्रथम पापड थोडा वेळ उन्हात वाळू घाला, आणि नंतर त्याचा उपयोग करा.
- नंतर टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या, आणि कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या,
आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा. - नंतर गॅसवर एक कढई ठेऊन, त्यात थोडे तेल टाकून गरम करा, तेल गरम झाले की.
- यामध्ये एक-एक करून पापड तळून घ्या, पापड चांगले फुलले की व्यवस्थित एका पेपरवर काढा.
- पापड तुटायला नको, काळजीपूर्वक पापड तळून घ्या. अशा प्रकारे सर्व पापड तळून घ्या. नंतर थोडे थंड होऊ द्या.
- आता आपले सर्व साहित्य खटाई, बारीक कांदा, टोमॅटो, मसाला, काळे मीठ, बारीक शेव सर्व साहित्य जवळ घ्या.
- नंतर एका प्लेटमध्ये पापड घ्या, त्यावर थोडी बारीक कांदा आणि टोमॅटो पूर्ण पापडवर टाका.
- नंतर यावर थोडे उकडेल चने टाका, याबरोबर थोडी खटाई चमच्याने पूर्ण पापडवर टाका.
- नंतर यावर थोडा चाट मसाला, थोडे तिखट, थोडे काळे मीठ, आणि साधे मीठ टाकून, नंतर थोडी बारीक कोथिंबीर टाका.
- नंतर यावर थोडी बारीक शेव टाका, आणि पापड चांगला सजवून घ्या.
आता आपला स्वादिष्ट आणि मसालेदार मसाला पापड खाण्यासाठी तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये घेऊन पापड खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
मसाला पापडमध्ये असणारे घटक :
मसाला पापड एकदम स्वादिष्ट पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक साहित्य वापरले जाते. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जसे शुगर, कॅलरी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, फॅट हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.
फायदे :
मसाला पापडमध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि फॉस्फरस सारखे घटक आहेत.
यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, आणि आपले हाड मजबूत राहतात.
यामध्ये असणारे पौष्टिक घटक फॅट, चरबी आपल्या शरीराची वाढ करतात.
मसाला पापड मधील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
मसाला पापड आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
हा तेलकट पदार्थ आहे, यामुळे आपल्याला मळ-मळ आणि उलटी होऊ शकते.
म्हणून मसाला पापड आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला मसाला पापड रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.