पाया सूप मराठी Paya Soup Recipe in Marathi पाया सूपचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. मटन पाया सूप हे कोकरूच्या किंवा बकरीच्या पायापासून बनवले जाते.
या सूप मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, खनिज यांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात ज्यांना पाठ दुखी कंबर दुखी गुडघेदुखीचा त्रास असेल अशांनी हे सूप करून नक्की सेवन करावे. पाया सूप लहान मुलांसाठी व वृद्ध लोकांच्या पोषणासाठी सर्वोत्तम कॅल्शियमचा साठा आहे. तर आज आपण पाया सूप रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पाया सूप मराठी Paya Soup Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
पाया सूप हे चिकन पाया सूप आणि मटण पाया सूप अशा दोन प्रकारे तयार केले जातात. मटन पाया सूप मध्ये बरेच पोषक घटक असतात. तसेच त्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाजीपाल्यांचा उपयोग करूनही हे पाया सूप आणखीन स्वादिष्ट बनवू शकतो. खास करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जर आजारी पडले तर त्यावेळेस पाया सूप तुम्हाला आराम देईल तसेच ताजी बनवलेले पाया सूप आपल्या शरीरामध्ये उष्णता आणते. आजकाल रेस्टॉरंटमध्ये देखील पाया सूप उपलब्ध आहेत परंतु आपण आपल्या स्वतःच्या हाताने घरी बनवलेले पाया सूप अतिशय पौष्टिक असते. कारण त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा व स्वच्छतेचा वापर करूनच हे सूप बनवितो तर चला मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्ती करता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
पाया सूप चा पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो :
कुकिंग टाईम :
पाया सूप रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
पाया सूप रेसिपी पूर्णतः तयार करण्यासाठी आपल्याला एकूण 40 मिनिटे एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) आठ बकरीच्या मटणाचे पाय
2) एक वाटी खोबरे
3) दोन चमचे आले-लसूण पेस्ट
4) बारीक चिरलेले मोठे दोन कांदे
5) तीन ते चार दालचिनी तुकडे
6) चार लवंगा
7) तीन वेलदोडे
8) पाव चमचा हिंग
9) पाव चमचा हळद
10) चवीनुसार मीठ
11) तेल
12) कोथिंबीर
पायासूप बनवण्याची पाककृती :
- पाया सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बकरीचे पाय विकत आणावे लागतील. बकरीचे पाय विकत आणल्यानंतर घरी भाजून स्वच्छ तयार करावेत किंवा मग तयार करूनही मिळतात.
- बकरीचे पाय घरी आल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यावे.
- एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आले, लसूण, खोबरे व कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घ्यावी.
- नंतर एका पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे. त्यामध्ये हिंग घालून कांदा छान परतून घ्यावा.
- कांदा खूप लाल होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये हळद घालून वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा.
- नंतर त्यामध्ये बकरीच्या मटणाचे पाय घालावेत सर्व चांगले मिश्रण हलवून घ्यावे चवीनुसार मीठ घालावे.
- आता हे पातेले कुकरमध्ये ठेवून मंद गॅसवर आठ ते दहा शिट्ट्या होऊ द्याव्यात. पाय चांगले शिजले पाहिजे कारण त्यामधील सर्व जिन्नस सूपमध्ये उतरतील.
- नंतर कुकर थंड झाल्यावर त्यातील पातेले काढून घेऊन ते मंद आचेवर 10 मिनिटे ठेवावे, तेव्हाच त्यात गरम मसाल्याची पावडर घालून छान उकळू द्यावे.
- सुप पातळ किंवा घट्ट होऊ देऊ नये, गरमागरम पायाचे सूप पिण्यासाठी छान लागते.
- पायाच्या नळ्या देखील चोखून खाण्यासाठी छान लागतात. आजारी व्यक्तींना, लहान मुलांना तसेच बाळंतीण बाईला हे सूप पिण्याचे खूपच पौष्टिक फायदे आहेत.
पोषक घटक :
पाया सूपमध्ये कॅल्शियम, खनिजे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फ्लोराइड, सोडियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक घटक असून आपली हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.
फायदे :
पाया सूप पिल्यामुळे आपले हाडे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच पाया सूपमध्ये जिलेटीन हा घटक असतो. जो पोषक तत्त्वांचे पचन करण्यास मदत करतो.
पाया सूप पिल्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या दूर होतात.
पाया सूप हे गर्भवती महिलांसाठी देखील पौष्टिक असते. त्यामुळे गर्भवती महिला देखील पाया सूप पिऊ शकतात. यामुळे गर्भाचा योग्य विकास होतो तसेच सूपमधील प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिज गर्भातील बाळाचा योग्य विकास करण्यास मदत करतात.
ज्यांना वारंवार भूक लागते अशा व्यक्तींनी पाया सूप दिल्यामुळे त्यांची भूक शांत होते तसेच पाया सूप पिल्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी या समस्यांपासून आराम मिळतो.
रात्रीचे जेवण करताना पाया सूपचा आहारात समावेश केला तर चांगली झोप सुद्धा लागते.
तोटे :
पाया सूपच्या अति सेवनामुळे आपल्याला अतिरिक्त घटक मूल्य मिळतात. त्यामुळे आपल्याला मळमळ किंवा डायरिया होऊ शकतो.
तसेच ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी देखील हे सुख कमी प्रमाणातच प्यायला पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला पाया सूप रेसिपी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.