व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी Veg Manchurian recipe in Marathi

व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी Veg Manchurian recipe in Marathi आपण वेगवेगळ्या स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये व्हेज मंचुरियन खाण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला तिथे बरेच पैसे मोजावे लागतात; परंतु आता तुम्ही त्याची काळजी न करता घरच्या घरीच हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखी व्हेज मंचुरियन रेसिपी करू शकता. आम्ही तुमच्या करिता खास घेऊन आलो आहोत व्हेज मंचुरियन रेसिपी. जे अगदी साधी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता. व्हेज मंचुरियन ही रेसिपी पत्ता कोबी पासून बनवण्यात येते. त्यामध्ये विविध मसाले तिखट आणि सॉस यांचे मिश्रण असलेली त्यामध्ये तळलेले गोबीचे छोटे गोळे टाकतात.

Veg Manchurian

व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी Veg Manchurian recipe in Marathi

रेसिपीचा प्रकार :

मंचूरियन रेसिपीचे मुख्यतः आपल्याला दोन प्रकार आढळून येतात. यामध्ये नॉनव्हेज मंचुरियन रेसिपी आणि व्हेज मंचुरियन रेसिपी. दोन्हीही मंचुरियन रेसिपी खूपच प्रसिद्ध असून हे दोन्हीही रेसिपी चायनीज फूड आहे. तर येथे आपण वीज मंचुरियन रेसिपी विषयी बोलणार आहोत. व्हेज मंचुरियन रेसिपी एक लोकप्रिय असून ती भारतात आता खूपच लोकप्रिय पावत आहे. तर चला मग बघू या व्हेज मंचुरियनसाठी लागणारे साहित्य व कृती.

वाढीव :

ही रेसिपी आपण 4 जणांकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

व्हेज मंचुरियन च्या पूर्वतयारी करता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागेल.

कुकिंग टाईम :

कुकिंग करिता 20 मिनिटे एवढा वेळ लागेल.

टोटल टाईम :

व्हेज मंचुरियन रेसिपी पूर्ण पणे तयार करण्याकरता आपल्याला 35 मिनिटे एवढा वेळ लागेल.

सामग्री :

व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे :

1) तीन कप किसलेली कोबी
2) दोन बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या
3) मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरलेले.
4) आले लसूण पेस्ट दोन चमचे
5) 2 कप मैदा (आवश्यकतेनुसार)
6) कॉर्नफ्लॉवर चार चमचे
7) लाल तिखट दोन चमचे
8) टोमॅटो सॉस चिली सॉस तीन चमचे
9) चवीनुसार मीठ
10) तळण्यासाठी तेल
11) एक कप पाणी

पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला अर्धी कोबी धुवून किसून घ्यायचे आहे. नंतर ती एका भांड्यात काढून घ्या व त्यामध्ये मैदा मीठ कॉर्नफ्लॉवर लाल तिखट घालून याचे मिश्रण तयार करून छोटे छोटे गोळे तयार करा.
  • तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा व तयार झालेले गोळे कढईमध्ये तळण्याकरिता हळूहळू टाकायचे आहे.
  • त्या गोळ्यांना लालसर रंग येईपर्यंत ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. तसेच ते कुरकुरीत झाले की बाहेर काढून घ्या.
  • सर्व गोळे तळून घेतल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, शिमला मिरची आणि चिमूटभर मीठ घाला.
  • हे मिश्रण घट्ट होण्याकरिता त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक कप पाणी मिक्स करून टाका.
  • नंतर त्यामध्ये कोबीचे तळलेले गोळे टाका.
  • व्हेज मंचुरियन तयार आहेत आता हे सर्व्ह करण्याकरता एका डिशमध्ये काढा व त्याच्या सजावटीसाठी पत्ता गोबी लांब कापलेली तसेच हिरवा कांदा बारीक चिरलेला यांनी त्याची सजावट करा.
  • घरच्या घरीच अशा पद्धतीने तुम्ही स्वादिष्ट आणि वाजवी दरात व्हेज मंचुरियन तयार करू शकता.

पोषक घटक :

व्हेज मंचुरियन हे कोबीपासून बनलेले असते त्यामुळे हा एक शरीरासाठी पोषक असा नाश्ता आहे. त्यामध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तसेच विटामिन सी देखील जास्त प्रमाणात असते. कोबी मध्ये फायबर असल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते. व्हेज मंचुरियन मध्ये कॅलरीज असते.

फायदे :

कोबीचे मंचुरियन हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले असे पोषक घटक असतात.

मंचुरियन रेसिपी खाल्ल्यामुळे तुमची भूक वाढते तसेच वजनही नियंत्रणात राहते.

कोबीमध्ये फायबर असल्यामुळे तसेच उच्च जीवनसत्व असल्याने ते आरोग्यवर्धक डिश आहे.

तोटे :

मंचूरियन हि रेसिपी जरी पौष्टिक असली तरीही त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस यांसारख्या चायनीज सॉसचा उपयोग केल्यामुळे आपल्याला घशाचा त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment