मटार पनीर रेसिपी मराठी | matar paneer recipe in marathi

मटार पनीर रेसिपी मराठी | matar paneer recipe in marathi

एक उत्तर भारतीय डिश म्हणून मटर पनीर ( matar paneer recipe in marathi ) कडे पाहिले जाते. हिरवे मटार,पनीर, व विविध मसाल्यांच्या मदतीने बनवली जाते.तुम्ही मटार पनीर ह्या डिशला पोळी, भात,पराठा,नान, पुरी सोबत देखील सर्व्ह करू शकता.
या मटार पनीर ला अधिक घट्ट क्रिमी ,चटकदार, व स्वादिष्ट बनवण्यासाठी काजूच्या पेस्ट चा व क्रिम चा उपयोग केला जातो.
मटार पनीर बनवण्याच्या रेसिपी या आपल्याला आपल्याला कल्चर नुसार बऱ्याच आहेत पण आज आपण एकदम साधी आणि सोपी रेसिपी बघणार आहोत.

चला तर मी पाहुयात मटार पनीर ची रेसिपी.

मटार पनीर रेसिपी मराठी ( matar paneer recipe in marathi ingredients)

 • मटार पनीर बनवण्याससाठी लागणारी सामग्री:
 • 200 ते 250 ग्रॅम पनीर
 • 1 वाटी मटार (तुम्ही हिरवे किंवा फ्रोजन मटार देखील वापरू शकता)
 • 1 ते दीड छोटा ग्लास पाणी पाण्याचे प्रमाण हे तुम्हाला भाजीची consistency कितपत घट्ट किंवा पातळ लागणार यावर ठरवावी.
 • अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा हळद
 • दीड चमचा लाल तिखट(बेडगी मिरची पूड)
 • एक मोठा चमचा गरम मसाला
 • 2 चमचे मलई
 • अर्धा चमचा साखर
 • चवीनुसार मीठ
 • 2 ते 3 चमचे तेल किंवा तूप
 • गारनिशिंग साठी कोथिंबीर
 • 2 चमचे पनीर मसाला
 • एक चमचा धने पूड
 • अत्ता भाजी बनवण्यासाठी जी ग्रेव्ही लागते त्याच साहित्य बघुयात.
 • 3 मध्यम आकाराचे टोमॅटो
 • 3 मध्यम आकाराचे कांदे
 • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • आल्याचा बारीक तुकडा
 • 4 ते 5 लसूण पाकळ्या
 • 10 ते 12 काजू
 • 4 ते 5 काळ्या मिऱ्या
 • 2 ते 3 लवंगा
 • थोडीशी न कापलेली कोथिंबीर

मटार पनीर रेसिपी मराठी कृती

मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची म्हणजेच टोमॅटो,कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, काजू, यांची बारीक पेस्ट मिक्सर मधून करून घ्यावी पेस्ट बनवताना त्यात वणी घालू नये.कारण जर पेस्ट बनवताना आपण पाणी घातले तर तेलात मसाला टाकताना अंगावर शिंतोडे उडण्याची शक्यता असते.
आत्ता हा मसाला बारीक करून बाजूला ठेवा व एका कढईत 2 ते 3 चमचे तेल किंवा तूप टाका. त्यात अर्धा चमचा जिरे टाकून चांगले तडतडू द्या, त्यात 4 ते 5 काळ्या मिऱ्या व 2 ते 3 लवंगा व एक तमालपत्र घालावे. व चांगली फोडणी बसू द्यावी.

आत्ता त्या फोडणी दिलेल्या तेलात किंवा तुपात मिक्सर मध्ये बारीक केलेली पेस्ट टाका.
मसाला सतत हलवत राहायाचा नाहीतर मसाला खाली लागण्याची शक्यता असते.
मसाला हलवताना जर जास्त उडत असेल तर तुम्ही अर्ध झाकण ठेवून देखील मसाला परतू शकता.
मसाल्याला चांगलं तेल सुटेस पर्यंत मसाला परता त्यानंतर गॅस मंद आचेवर करा.जेव्हा मसाला आणि तेल हे वेगळं दिसायला लागेल अश्या वेळी समजा की तुमचा मसाला चांगला शिजला आहे.

चिकन दम बिर्याणी रेसिपी मराठी | chicken dum biryani recipe in marathi येथे वाचा

आत्ता त्यात सगळे कोरडे जिन्नस घाला जसेकी हळद,लाला तिखट,मीठ(चवीनुसार),गरम मसाला,पनीर मसाला, हे कोरडे जिन्नस त्या मसाल्यात चांगले मिसळा.जर तुम्हाला भाजी क्रिमी बनवायची असेल तर त्यात 2 चमचे मलई घाला. ते मिश्रण चांगले मिक्स करून घ्या व त्यात हिरवा वाटाणा घाला जर सोललेले मटार असतील तर ते मसाल्यात चांगले शिजवून घ्या हवा असेल तर थोडं पाणी देखील घालू शकता.
फ्रोजन मटर वापरत असाल तर शिजवण्याची गरज पडंत नाही.
आत्ता तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी त्यानुसार पाणी घाला व एक उकळी काढून घ्या.
उकळी काढल्यावर जर तुम्हाला भाजी घट्ट वाटली तर त्यात पाणी देखील घालू शकता.तोपर्यंत तुमचे मटार देखील शिजवून जातील.

आत्ता त्यात पनीर चे तुकडे घाला व 5 ते 10 मिनिटे पनीर त्यात शिजू द्या. ह्या वेळी गॅस मंद आचेवर ठेवावा. टॉमटो चा आंबटपणा कमी करण्यासाठी तुम्ही त्यात थोडी साखर देखील घालू शकता.
पनीर ला जास्त वेळ भाजीत शिजू देऊ नका. कडं जास्त शिजले तर ते एकत्र रबर सारखे चिवी होतात किंवा कडक होतात.

आत्ता गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर टाकून गारनिशिंग करा.
ह्या गरम भाजीला तुम्ही पुरी,पोळी, नान, भाता सोबत देखील सर्व्ह करू शकता.
तर मटार पनीर रेसिपी ( matar paneer recipe in marathi ) कशी वाटली नक्की कळवा.

Leave a Comment