मूंग डाळ हलवा मराठी Moong Dal Halwa Recipe In Marathi

मूंग डाळ हलवा मराठी Moong Dal Halwa Recipe In Marathi  मूंग डाळ हलवा हा मूंग डाळ, काजू, बदाम, आणि खव्या पासून बनवला जातो. हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट आहार आहे. मूंग डाळ हळव्यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. भारतात विविध ठिकाणी मूंग डाळ हलवा हा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. हा भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. याचा उपयोग आपण सकाळी नाष्टा म्हणून करू शकतो. हलवा हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे.

आपण हॉटेल किंवा बेकरी वरती पाहीले असेल किती चवदार आणि स्वादिष्ट मूंग डाळ हलवा मिळतो. काही लोकांना मूंग डाळ हलवा खूप आवडतो, पण त्यांच्या परिसरात स्वादिष्ट मूंग डाळ हलवा मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहेत, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट मूंग डाळ हलवा कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण मूंग डाळ हलवा रेसिपी पाहणार आहोत.

Moong Dal Halwa Recipe

मूंग डाळ हलवा मराठी Moong Dal Halwa Recipe In Marathi

मूंग डाळ हलव्याचे प्रकार :

मूंग डाळ हलवा हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. जो विविध ठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे मूंग डाळ शिरा, मूंग डाळ हलवा. मूंग डाळ भजे, मूंग डाळ वडे, मूंग डाळ कचोरी हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मूंग डाळ हलवा रेसिपी ही आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

मूंग डाळ हलव्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

मूंग डाळ हलवा तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर हलवा रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

मूंग डाळ हलवा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

मूंग डाळ हलवा बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

मूंग डाळ हलव्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 250 ग्रॅम सोलेल मूंग डाळ.
2) 200 ग्रॅम तूप.
3) 250 ग्रॅम साखर.
4) 100 ग्रॅम खवा.
5) 1 ग्लास दूध.
6) 10 ते 12 काजू
7) 10 ते 12 बदाम.
8) थोडे मनुके.
9) थोडा पिस्ता.

पाककृती :

  • आवळा लोणचं मराठी
  • मूंग डाळ हलवा करण्या अगोदर रात्रभर मूंग डाळ चांगली भिजू घाला, आणि नंतर याचा उपयोग करा.
  • काजू, बदाम, पिस्ताचे बारीक तुकडे तयार करून घ्या, आणि एका वाटीत काढून ठेवा.
  • नंतर मूंग डाळ स्वच्छ धुऊन घ्या, आणि मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार करा.
  • नंतर गॅस चालू करून गॅस वरती एक खोल तळाची कढई ठेवा, त्यामध्ये आवश्यक तेवढे तूप टाकून गरम करा.
  • तूप गरम झाले की, यामध्ये बारीक केलेली मूंग डाळ टाका, आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • पहिले मूंग डाळ थोडी कढईला चिपकेल त्यामुळे ते सतत ढवळत रहा, आणि 10 मिनिट पर्यत मूंग डाळ चांगली होऊ द्या.
  • मूंग डाळ चांगली झाली की, कढईला चीपकणार नाही, आणि बाजूने थोडे तेल सोडेल तेव्हा आपली मूंग डाळ झाली समजावे.
  • नंतर यामध्ये मनुका, काजू, बदाम आणि पिस्ताचे तुकडे टाका, आणि एक मिनट चांगले भाजून घ्या.
  • नंतर यामध्ये दूध टाकून व्यवस्थित मिक्स करा, आणि दूध जोपर्यत पूर्ण आटत नाही, तो पर्यत शिजवत रहा.
  • नंतर यामध्ये खवा टाकून, चांगले मिसळून घ्या, नंतर चवीनुसार साखर टाका.
  • आणि पूर्ण मिक्स करा, सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे, नंतर मध्यम आसेवर 2 मिनिट हलवा शिजू द्या.
  • नंतर गॅस बंद करून, हलवा खाली काढून घ्या, हलव्यावर थोडे काजू, बदमचे तुकडे टाकून सजवा.
  • आता आपला स्वादिष्ट आणि गोड मूंग डाळ हलवा खाण्यासाठी तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये हलवा घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

हलव्यामध्ये असणारे घटक :

मूंग डाळ हलवा हा एक पौष्टिक पदार्थ आहेत, हा पदार्थ मूंग डाळ, तूप, काजू, बदाम यासारख्या पौष्टिक पदार्थ पासून बनवलेला आहे. यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रोटीन, चरबी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, मॅग्निशियॅम, फॉस्फरस, लोह, फॅट, कॅलरी हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

मूंग डाळ हलवा एक पौष्टिक आहार आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्निशियॅम सारखे घटक आहेत.

यामुळे आपले हाड, शरीर, मजबूत राहते, आणि शरीर निरोगी राहते.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, चरबी, फॅट यामुळे आपल्याला हृदय विकार होत नाही, आणि डोळे, त्वचा कोरडी राहते.

मूंग डाळ मधील सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

मूंग डाळ हलवा हा पौष्टिक आणि तेलकट पदार्थ आहे, आपण हलवा जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.

यामध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत, हे घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून मूंग डाळ हलवा आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला मूंग डाळ हलवा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment